गुहा - दि. २७ ऑक्टोबर २०१९
गुहा येथील गंगाधर बाबा छात्रलयातील अनाथ मुलांच्या सोबत दिवाळी साजरी करून देवळाली प्रवरा येथील आप्पासाहेब ढुस मित्र मंडळाच्या सदस्यांनी परिसरातील तरुणांसमोर नवीन आदर्श ठेवला आहे.
देवळाली प्रवरा येथील आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी नुकतीच बैठक पार पडली, त्यामध्ये सण २०१९ ची दिवाळी फटाके व प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी साजरी करण्यावर सर्व सदस्यांचे एकमत झाले, त्यामुळे फटाक्यांच्या शिल्लक रक्कमे मध्ये गुहा येथील गंगाधर बाबा छात्रालयातील अनाथ मुलांसाठी फळे देऊन त्यांचे सोबत दिवाळी साजरी करण्यात यावी यावर सर्वांचे एकमत झाले. व आज रविवारी दि. २७ ऑक्टोबर २०१९ राजी रात्री ०८.३० वाजता एकीकडे फटाके फोडून सर्वत्र दिवाळी साजरी होत असताना आप्पासाहेब ढुस मित्रमंडळाचे प्रसाद ढुस, सुशांत वारुळे, राहुल पाटोळे, अरबाज शेख, साहिल शेख, तुषार उर्हे, अक्षय पाटील, प्रदीप भांड, ऋषिकेश शिरसाठ, अजित गवळी आदी कार्यकर्त्यांनी अनाथ मुलांच्या सोबत दिवाळी साजरी करून तरुण पिढीसमोर आदर्श निर्माण केला.
या स्तुत्य उपक्रमा बद्दल गंगाधर बाबा छात्रलयाच्या वतीने पप्पू सपकाळ यांनी अनाथ मुलांच्या सोबत दिवाळी साजरी करून आप्पासाहेब ढुस मित्र मंडळाने तरुणांच्या समोर आदर्श निर्माण केला असे मांडून सर्व सदस्यांचे आभार मानले ..
Post a Comment