बि ए एम एस डाॅक्टरने घेतला गरोदर मातेचा बळी,
गंगापुर शहरात पुन्हा एकदा बि ए एम एस डाॅक्टरने घेतला गरोदर मातेचा बळी गंगापूर तालुक्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट आहे. वरिष्ठ अधिका-यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी होत आहे.
शहरातील ओमसाई हाँस्पीटल मधे 28 वर्षीय महीलेची प्रसुती झाल्यानंतर जास्त रक्त स्त्राव झाल्याने तीचा मृत्यू झाल्याची घटना पहाटे पाच वाजता घडली आशमा हमीद शेख असे महीलेने नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार गंगापुर शहरातील नवीन बस स्टँड जवळ असलेल्या डॉ अमीत गुंजाळ यांची पत्नी
डॉ. सौ. अर्जना गुंजाळ यांचे ओमसाई हाँस्पीटल मधे मन्सूरी काँलनी येथील आशमा हमीद शेख वय 28 वर्ष हीला प्रसुती करिता दाखल करण्यात आले होते डॉ अमीत गुंजाळ व डॉ. सौ. अर्जना गुंजाळ यांनी या महीलेची प्रसुती केली प्रसुती नंतर आशमास जास्त रक्त स्त्राव होत असल्याने डॉ गुंजाळ यांनी महीलेच्या नातेवाईकांना सागींतले आशमा हीला रक्तदाब वाढला आसुन औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला दिला यावर नातेवाईकांनी तत्काळ घाटी रुग्णालयात घेऊन गेले असता रात्री अडीच वाजता दाखल केले परंतु उपचार चालू असतांना आशमा हीचा मृत्यू झाला या घटनेची माहिती गंगापुर पोलीसांना दिल्यावरुण पोलीस उपनिरीक्षक अर्जुन चौधर व कर्मचाऱ्यांनी घाटी रुग्णालयात जाऊन पंचनामा केला यामध्ये आशमाच्या प्रसुतीनंतर अती रक्त स्त्राव झाल्याचा पंचनामा पोलिसांनी केल्याचे सांगितले
आशमा हीच्यावर औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात श्ववविच्छेदन करून मृतदेहास घेऊन नातेवाईक थेट गंगापुर पोलीस ठाणे गाठत जो पर्यंत डॉ. अमीत गुंजाळ व त्यांची पत्नी डॉ. सौ. अर्जना गुंजाळ यांच्याविरोधात मनुष्य वधाचा गुन्हा दाखल होऊन अटक होत नाही तो पर्यंत मृतदेह हलवणार असा पवित्रा घेत मोठा जमाव पोलीस ठाण्यात जमा झाला होता मात्र पोलिसांनी आश्वासन दिल्याने नातेवाईकांनी मृत आशमावर अंत्यसंस्कार करण्यासाठी घेऊन गेले.
Post a Comment