सिल्लाेड दि.२५
सिल्लाेड येथे बुधवार(दि.२५)राेजी झालेल्या महीला संवाद यात्रेस उदंड प्रतिसाद मिळाला.शिवसेनेचे सचीव तथा हाेम मिनिष्टर फेम आदेश बांदेकर यांच्याशी संवाद साधतांना महीलांच्या सक्षणासाठी कठाेर कायदे करण्याची मागणी यावेळी महीलांनी केली.शहरातील छस्तीस एकर प्रांगणात झालेल्या संवाद यात्रेस महीलांची लाक्षनीक उपस्थीती हाेती.
कार्यक्रमाची सुरवात छत्रपती शिवाजी महाराज ,शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे,माताेर्षी मिनाताई ठाकरे यांच्या प्रतिमा पुजनाने झाली. माजी मंत्री अब्दुल सत्तार ,आमदार अंबादास दानवे,जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी ,जिल्हापरीषदेच्या अध्यक्ष देवयाणी डाेणगावकर,जिल्हापरीषदेचे उपाध्यक्ष केशवराव तायडे,नगराध्यक्षा राजश्री निकम,उपजिल्हाप्रमुख रघुनाथ चव्हाण,तालुका प्रमुख किशाेर अग्रवाल, देवीदास लाेखंडे,जिल्हापरिषद सदस्य सिमा गव्हाणे,रेखा जगताप, महीला आघाडीच्या तालुकाप्रमुख रेखाताई वैष्णव,किसान सेनेचे सुरेश आहेर,शहर प्रमुख मच्छिंद्र घाडगे,सुदर्शन अग्रवाल आदिंची यावेळी उपस्थीती हाेती.
आदेश बांदेकर यांनी संवाद साधतांना महीलांना बाेलते केले.अनेक महीलांनी आम्ही तुम्हाला टिव्हीवरच आतापर्यंत पाहीले.आज प्रत्यक्ष तुम्हाला भेटन्याची संधी आल्याचा आनंद व्यक्त केला.सिल्लाेड शहराचा विकास माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी भरपुर केला फक्त शहरात मुलासाठी क्रिंडागणाची गरज व्यक्त केली.महीलांनी श्री.बांदेकर यांना प्रश्न विचारत संवादात प्रगल्बधतता आनली.
सुसंकृत्रपणा आवडल्याने शिवसेना निवडली !
दरम्यान एका शाळकरी मुलीने अभिनेता बांदेकर यांना आपण शिवसेना पक्षच का निवडला.यावर उत्तर देतांना बांदेकर यांनी मुबंईत लहानपनातच वावरतांना स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा राजकारणातील सुसंस्कृतपना मला भावला . राजकारण करतांना शिवसेनेचे समाजकारण न्याय देनारे असल्याने मी शिवसेना निवडल्याचे त्यांनी स्पष्ट केले.