Latest Post

कोपरगाव (तालुका प्रतिनिधी)  कोपरगाव शहरात जब्रेश्वराचे मंदिरालगत स्वामी समर्थ मंदिराच्या समोर दोन गटात (मावसभावासोबत) झालेल्या भांडणाचा जाब विचारल्याच्या कारणावरून दोन गटात झालेल्या हाणामारीत तिघे गंभीररित्या जखमी झाले आहेत. याबाबत राहुल संजय माळी (वय-18) रा. मोहिनीराजनगर याने आरोपी योगेश गायकवाड, पाप्या पूर्ण नाव माहित नाही. महेश गायकवाड, सचिन गायकवाड, विशाल गायकवाड, शंकर मोरे, निलेश पवार सर्व रा.गांधीनगर, कोपरगाव यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान, ही घटना भररस्त्यात तलवारी सारख्या हत्यारांचा वापर घडल्याने दोन्ही बाजूनी रस्ता बंद होऊन जाणार्‍या येणार्‍या प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते.पोलिसांनी अशा आरोपींचा कडक कारवाई करून बंदोबस्त करावा अशी मागणी शहरवासीयांनी केली आहे.सप्टेंबर रोजी दुपारी तीनच्या सुमारास फिर्यादी राहुल माळी याचा मावस भावासोबत झालेल्या भांडणाचा जाब विचारलेच्या कारणावरून यातील आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून पूर्व नियोजित कट करून फिर्यादीस फोन करून बोलावून घेऊन तू आम्हाला शिवीगाळ का केली असे म्हणून आरोपी योगेश गायकवाड याने राहुल माळी याच्या डोक्यात रॉड मारून आरोपी पाप्या याने फिर्यादीच्या पोटात दगड मारून फिर्यादीला खाली पाडले त्यास सुरज कैलास आव्हाड हा सोडविण्यास गेला असता आरोपी महेश गायकवाड याने सुरज याच्या डोक्यात तलवारी सारख्या हत्याराने वार केला.त्यामुळे तो जखमी झाला. ते पाहून विठ्ठल रोहकले हा मदतीसाठी आला असता आरोपी सचिन गायकवाड याने शॉकपच्या रॉडने पायावर मारून दुखापत केली.व बाकीच्या इतरांनी लाथाबुक्यांनी मारहाण करून आरोपीनी फिर्यादी व त्याच्या साथीदारांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे.याघटनेवरून कोपरगाव शहर पोलिसांनी गु.र.नं.326/2019 भादंवि.कलम.326,324,323,143,147,149,120,(ब)504,506,तसेच भारतीय हत्यार कायदा 4/25 प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.या घटनेत फिर्यादी राहुल माळी, सुरज आव्हाड,विठ्ठल लोहकरे रा.मोहिनीराजनगर हे गंभीररीत्या जखमी झाले आहेत.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप बोरसे करीत आहेत.

बुलढाणा - 22 सप्टेंबर
 बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यात असलेल्या दसरखेड एमआयडीसी मधील बैंजो केमिकल कंपनी ने रासायनिक युक्त पाणी नाल्यात सोडल्याने ते पाणी रणथम येथील तलावात पोहोचल्याने तलावातील पाणी दुषित झाले असून ग्रामस्थांचे आरोग्य या पाण्यामुळे धोक्यात आले आहे ग्रामस्थांना ईजा पोहचल्या असून अनेक  जनावरे दगावली असुन या केमिकल चा परिणाम शेतीवर ही दिसत असल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहे.
        गेल्या चार दिवसापासून या परिसरात संततधार पाऊस सुरू असल्याने बैंजो केमिकलने सोडलेले रासायनिक युक्त पाणी येथील तलावात पोहोचले या केमीकलने पाण्यात दुर्गंधी आली असून या पाण्यामुळे ग्रामस्थांना अँलर्जी,खाजेचे प्रकार, उलट्या,सुरू झाल्या असुन  याच परिसरातील तीन म्हशी, एक गाय,अठरा बकऱ्या, एक बैलजोडी दगावल्याने शेतकरी तथा ग्रामस्थ संतप्त झाले आहे या तलावातील पाणी पुढे पूर्णा नदी पात्रात जात असल्याने त्या ठिकाणी 22 गाव पाणीपुरवठा प्रादेशिक योजना असून दुर्गंधीयुक्त पाणी या योजनेच्या जँकवेल मध्ये गेल्यास दसरखेड, विवरा, तांदुळवाडी, तालसवाडा, धरणगाव, कुंड बु!!, कुंड खुर्द,रणथम, शिवनी, निंबोळी, तिघ्रा,भानगुरा, दुधलगाव, रणगांव, वाघोळा, नवीन दुधलगाव,चिंचोल, देवधाबा,गोराड, हिंगणा काजी, भालेगाव ,खडकी, चिखली आधी गावातील ग्रामस्थांचे आरोग्य सुद्धा धोक्यात येणार असल्याची शंका उपस्थित झाल्याने रणथम येथील सरपंच जयदीप पाटील,उपसरपंच उल्हास डमाळे,सुभाष राव पाटील, निना मेंहेंगे,चिखलीचे सरपंच राजेश कांडेलकर,आदींसमवेत ग्रामस्थांनी बैंजो कंपनीला जाब विचारण्यासाठी धडक दिली.यावेळी भाजपा नेते शिवचंद्र तायडे,हेमंतसिंह राजपूत, सुनिल रायपुरे शेतकऱ्यांची बाजू मांडली.या रसायनिक युक्त पाण्याची तात्काळ विल्हेवाट न लावल्यास ग्रामस्थांनी कंपनी पेटवून देण्याचा ईशारा दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.

प्रतिनिधी, सिल्लोड-उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंढे यांच्या पथकाला गुप्त खबऱ्या मार्फत मिळालेल्या माहितीनुसार डोंगरगाव(ता. सिल्लोड)येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये गोवंशाची कत्तल होत असल्याची माहिती मिळाली या माहिती आधारे उपवभिगागीय अधिकारी व त्यांच्या पथकाने रविवारी(दि.22)रोजी सकाळी साडे सहावाजेच्या सुमारास छापा मारून एका पत्र्याच्या शेडमध्ये गोवंशाची कत्तल करतांना तीन जणांना रंगेहात पकडले त्यांच्या ताब्यातून 1 लाख 20 हजार रुपयांचे सहा क्विंटल गोमांस 45 हजार रुपये किंमतीचे 5 जीवंत गोवंश असा एकूण 1 लाख 66 हजार रुपये किंमतीचा मुद्दे माल जप्त करून तीन आरोपीना अटक करण्यात आली आहे. या आरोपींच्या विरोधात सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात गोवंश कत्तल कायदा अधिनियमन कायद्याद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या धडाकेबाज  कारवाईने अवैध गोमांसाची तस्करी करणाऱ्याचे धाबे दणाणले आहे.

         या प्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, उपविभागीय अधिकारी सुर्दशन मुंढे आपल्या पथकासह गस्तीवर असतांना त्यांना एका गुप्त खबऱ्याने माहिती दिली की, डोंगरगाव(सिल्लोड)येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये गोवंशाची कत्तल चालू आहे.त्या माहितीच्या आधारे ते त्यांचे पथक व सिल्लोड शहर पोलीस ठाण्याचे फौजदार रविवारी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास डोंगरागात गेले असता त्यांनी पत्र्याच्या शेडमध्ये सुरु असलेल्या कत्तलखान्यावर छापा मारला असता तेथे गोवंशाची कत्तल चालु असल्याचे आढळून आले.आरोपी अन्सार सलीम कुरेशी(वय53),शेख युनुस शेख बुडन(38)शेख अख्तर शेख हबीब(25)यांना रंगेहात ताब्यात घेऊन त्यांनी विक्रीच्या उद्देशाने कत्तल केलेले सहा क्विंटल गोमांस व कतलीच्या इराद्याने आणलेली पाच जीवंत गोवंश ताब्यात घेतली. त्यांनंतर  पशुवैद्यकीय अधिकारी यांनी गोवंश मांसाचा पंचनामा करून या मांसाचे नमुने तपासणीसाठी पाठविले.त्यांनतर पंचाच्या समक्ष डम्पिंग ग्राऊंडवर खड्डा खोदुन हे मांस नष्ट करण्यात आले. जीवंत जनावरांना पळशी येथील गोशाळेत रवाना करण्यात आले आहे.ही कारवाई  उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंढे, शहर पोलीस ठाण्याचे 

श्रीरामपूर :-जनसामान्यांच्या मूलभूत गरजेंची पूर्तता करण्यासाठी सदैव अग्रेसर असलेले 'उम्मती फाउंडेशन' आणि 'पोस्ट ऑफिस,श्रीरामपूर' यांच्या संयुक्त विद्यमाने 'भव्य आधार कार्ड शिबीराचे' शुभारंभ नुकतेच काजीबाबा रोड, वार्ड क्रं.२ येथे करण्यात आले. आजच्या धकाधकीच्या जीवनात कुठल्याही शासकीय कामासाठी आधार कार्डचे असलेले अनन्यसाधारण महत्व ओळखून उम्मतीने या शिबीराचे आयोजन केले होते, त्यास जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
         यावेळी उम्मतीचे अध्यक्ष सोहेल बारूदवाला यांनी सांगीतले की श्रीरामपूर शहरात सध्या फक्त पोस्ट ऑफिस येथे आधार कार्डची सुविधा उपलब्ध असल्याने लोकांचे खूप हाल व्हायचे तसेच वेळेचा ही अपव्यय व्हायचा हे ओळखून सदर शिबीरासाठी उम्मतीने पुढाकार घेतला त्यास श्रीरामपूर पोस्ट ऑफिसचे अधीक्षक श्री.दिलीप सर्जेराव यांचे विशेष सहकार्य लाभले.  या शिबिराचा आबालवृद्धांबरोबरच रुग्णांनीही लाभ घेतला. वेळेची मर्यादा असल्याने सदर शिबीर यापुढेही प्रत्येक आठवड्याच्या शनिवारी सुरू राहील असे त्यांनी सांगितले.
       सदर शिबिराच्या यशस्वीतेसाठी उपाध्यक्ष फिरोज पठाण सर, सचिव डॉ.तौफिक शेख, युसुफभाई लखानी, शाकीफ शेख, नीरज शाह, समीर शेख, शाहरुख बागवान, डॉ अहतेशाम शेख, माजिद मिर्जा, फारूक मेमन, मोहसीन बागवान, दानिश पठाण, जकी शेख, आलीम बागवान,अफजल मेमन, मुनव्वर मलिक, शोएब, खालिद इत्यादींनी  प्रयत्न केले.

अजय बाेराडे / सिल्लोड
सिल्लोड तालुक्यातील सावखेडा बु . येथे पुर्णा नदिच्या पुरात वाहून गेलेला युवक  पंडित गोंगे यांचा मृतदेह आढळून आला असून सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येवून सावखेडा येथे त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार  करण्यात आले.

    बुधवार ( दि.18 ) रोजी सिल्लोड तालुक्यातील सावखेडा येथील पूर्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाला. यावेळी नदीला मोठ्या प्रमाणावर पाणी आले होते. आईचे औषध घेवून गावाकडे परतत असतांना पंडित गोंगे पुलावरून जात होते. त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते वाहून गेले. विशेष म्हणजे ते वाहून जात असताना तेथील लोक या घटनेची शूटिंग करीत होते. त्यांना वाचविण्यासाठी कोणीही मदत केली नव्हती. त्यांनतर अग्निशमन दलाच्या वतीने पंडित गोंगे यांचा शोध घेणे सुरू झाले होते. घटनेच्या तिसऱ्या दिवशी सकाळी बोरगाव सारवानी परिसरातील  पुर्णा पात्रात काटेरी झुडपात गावकऱ्यांना मृतदेह आढळून आला. याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान येथे दाखल झाले. मृतदेहाची बाहेर काढताच तो पंडित गोंगे च असल्याची ओळख झाली. सिल्लोड येथे शवविच्छेदन करून पंडित गोंगे यांच्यावर सावखेडा येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

कोल्हार/ प्रतिनिधी- राहुरी तालुक्यातील रामपूर भागातील लक्ष्मी वाडी परिसरात गेली चार दिवसापासून बिबट्याने धुमाकूळ घातला असून दोन शेळ्यांचा फडशा पाडल्याने नागरिकात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
रामपूर भागातील लक्ष्मीवाडी परिसरात कडवळ ,मका,बाजरी पिकामध्ये  बिबट्याचा मुक्काम असून ह्या बिबट्याने रामपूर येथील गट नंबर १२२ दशरथ ( दादु ) भोसले यांच्या स्वतःच्या मालकीची एक शेळी तर १४ नंबर अंगणवाडी शाळेजवळील संतोष शिवाजी साबळे यांची ही एक शेळी अशा दोन दिवसात लागोपाठ दोन शेळ्याचा बिबट्याने फडशा पाडल्याने परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
बिबट्याच्या धास्तीने शेतकर्‍यासह मजूर शेतात जाण्यासाठी धजावत नसल्याने मनुष्यावर बिबट्याने आक्रमक होण्यापूर्वीच किंवा शेळ्या-मेंढ्या वर जीवित हानी थांबवण्यासाठी वनविभागाने योग्य वेळीच पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करून नागरिकांना दिलासा मिळावा अशी मागणी रामपूर तंटामुक्ती अध्यक्ष रावसाहेब ( अण्णा ) पा. साबळे, पोलीस पा. बाजीराव साबळे, सरपंच अरुण भोसले, ज्ञानदेव लोखंडे, प्रमोद नालकर, योगेश शेटे,ऋषीकेश थेटे,विजय साबळे, रवी वर्पे, आप्पासाहेब थेटे, विजय नालकर, गौरव साबळे,पत्रकार विजय भोसले या रामपूर भागातील ग्रामस्थांनी केले आहे.

श्रीरामपूर ( प्रतिनिधी ) येथील नामांकित असे महाले प्रतिष्ठान संचलित जम्बो पोदार  किड्सच्या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय कराटे चॅम्पियन शिप  नुकतीच मुंबई येथे पार पडली  प्री-प्रायमरी स्तरावर विद्यार्थ्यांना राष्ट्रीय पातळीवर कराटे क्रीडा स्पर्धेमध्ये श्रीरामपूर सारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नेतृत्व करण्याची संधी उपलब्ध झालेली आहे .श्रीरामपूर तालुक्यासाठी ही अभिमानास्पद अशी कामगिरी आहे. महाले  प्रतिष्ठान संचलित जंबो किड्स च्या विद्यार्थ्यांनी वेळोवेळी आपल्या खेळातील हे नैपुण्य क्रीडांगणावर सिद्ध  केले असून याअगोदरही अनेकदा जिल्हा स्तरावर प्रतिनिधित्व केले आहे.
  आज रोजी   दिनांक १५ सप्टेंबर २०१९ रोजी राष्ट्रीय कराटे क्रीडा स्पर्धा मुंबई येथे संपन्न झाले या स्पर्धे मध्ये महाले प्रतिष्ठान संचलित पोद्दार जंबो किड्स मधील विद्यार्थी चि. जितेंद्र सोनार याने ब्राँझपदककुमारी *इशिता राऊत हिने ब्राँझपदक,कुमारी गारगी पवार हिने ब्राँझपदक* , *आयन शेख याने सिल्वर पदक आणि ब्राँझपदक* असे मिळवले या नेपुण्यपूर्व यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे महाले प्रतिष्ठानचे विद्यमान चेअरमन महाराष्ट्र हॉलीबॉल संघटनेचे उपाध्यक्ष श्री सचिन प्रकाश महाले शाळेच्या प्राचार्य सौ कतीरा, क्रीडाशिक्षक गौतम डे आदींनी विशेष अभिनंदन करून पुढील खेळास शुभेच्छा दिल्या.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget