प्रतिनिधी, सिल्लोड-उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंढे यांच्या पथकाला गुप्त खबऱ्या मार्फत मिळालेल्या माहितीनुसार डोंगरगाव(ता. सिल्लोड)येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये गोवंशाची कत्तल होत असल्याची माहिती मिळाली या माहिती आधारे उपवभिगागीय अधिकारी व त्यांच्या पथकाने रविवारी(दि.22)रोजी सकाळी साडे सहावाजेच्या सुमारास छापा मारून एका पत्र्याच्या शेडमध्ये गोवंशाची कत्तल करतांना तीन जणांना रंगेहात पकडले त्यांच्या ताब्यातून 1 लाख 20 हजार रुपयांचे सहा क्विंटल गोमांस 45 हजार रुपये किंमतीचे 5 जीवंत गोवंश असा एकूण 1 लाख 66 हजार रुपये किंमतीचा मुद्दे माल जप्त करून तीन आरोपीना अटक करण्यात आली आहे. या आरोपींच्या विरोधात सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात गोवंश कत्तल कायदा अधिनियमन कायद्याद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या धडाकेबाज कारवाईने अवैध गोमांसाची तस्करी करणाऱ्याचे धाबे दणाणले आहे.
या प्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, उपविभागीय अधिकारी सुर्दशन मुंढे आपल्या पथकासह गस्तीवर असतांना त्यांना एका गुप्त खबऱ्याने माहिती दिली की, डोंगरगाव(सिल्लोड)येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये गोवंशाची कत्तल चालू आहे.त्या माहितीच्या आधारे ते त्यांचे पथक व सिल्लोड शहर पोलीस ठाण्याचे फौजदार रविवारी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास डोंगरागात गेले असता त्यांनी पत्र्याच्या शेडमध्ये सुरु असलेल्या कत्तलखान्यावर छापा मारला असता तेथे गोवंशाची कत्तल चालु असल्याचे आढळून आले.आरोपी अन्सार सलीम कुरेशी(वय53),शेख युनुस शेख बुडन(38)शेख अख्तर शेख हबीब(25)यांना रंगेहात ताब्यात घेऊन त्यांनी विक्रीच्या उद्देशाने कत्तल केलेले सहा क्विंटल गोमांस व कतलीच्या इराद्याने आणलेली पाच जीवंत गोवंश ताब्यात घेतली. त्यांनंतर पशुवैद्यकीय अधिकारी यांनी गोवंश मांसाचा पंचनामा करून या मांसाचे नमुने तपासणीसाठी पाठविले.त्यांनतर पंचाच्या समक्ष डम्पिंग ग्राऊंडवर खड्डा खोदुन हे मांस नष्ट करण्यात आले. जीवंत जनावरांना पळशी येथील गोशाळेत रवाना करण्यात आले आहे.ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंढे, शहर पोलीस ठाण्याचे
Post a Comment