उम्मती फाउंडेशनच्या 'आधार कार्ड' शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद.

श्रीरामपूर :-जनसामान्यांच्या मूलभूत गरजेंची पूर्तता करण्यासाठी सदैव अग्रेसर असलेले 'उम्मती फाउंडेशन' आणि 'पोस्ट ऑफिस,श्रीरामपूर' यांच्या संयुक्त विद्यमाने 'भव्य आधार कार्ड शिबीराचे' शुभारंभ नुकतेच काजीबाबा रोड, वार्ड क्रं.२ येथे करण्यात आले. आजच्या धकाधकीच्या जीवनात कुठल्याही शासकीय कामासाठी आधार कार्डचे असलेले अनन्यसाधारण महत्व ओळखून उम्मतीने या शिबीराचे आयोजन केले होते, त्यास जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
         यावेळी उम्मतीचे अध्यक्ष सोहेल बारूदवाला यांनी सांगीतले की श्रीरामपूर शहरात सध्या फक्त पोस्ट ऑफिस येथे आधार कार्डची सुविधा उपलब्ध असल्याने लोकांचे खूप हाल व्हायचे तसेच वेळेचा ही अपव्यय व्हायचा हे ओळखून सदर शिबीरासाठी उम्मतीने पुढाकार घेतला त्यास श्रीरामपूर पोस्ट ऑफिसचे अधीक्षक श्री.दिलीप सर्जेराव यांचे विशेष सहकार्य लाभले.  या शिबिराचा आबालवृद्धांबरोबरच रुग्णांनीही लाभ घेतला. वेळेची मर्यादा असल्याने सदर शिबीर यापुढेही प्रत्येक आठवड्याच्या शनिवारी सुरू राहील असे त्यांनी सांगितले.
       सदर शिबिराच्या यशस्वीतेसाठी उपाध्यक्ष फिरोज पठाण सर, सचिव डॉ.तौफिक शेख, युसुफभाई लखानी, शाकीफ शेख, नीरज शाह, समीर शेख, शाहरुख बागवान, डॉ अहतेशाम शेख, माजिद मिर्जा, फारूक मेमन, मोहसीन बागवान, दानिश पठाण, जकी शेख, आलीम बागवान,अफजल मेमन, मुनव्वर मलिक, शोएब, खालिद इत्यादींनी  प्रयत्न केले.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget