अजय बाेराडे / सिल्लोड
सिल्लोड तालुक्यातील सावखेडा बु . येथे पुर्णा नदिच्या पुरात वाहून गेलेला युवक पंडित गोंगे यांचा मृतदेह आढळून आला असून सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येवून सावखेडा येथे त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले.
बुधवार ( दि.18 ) रोजी सिल्लोड तालुक्यातील सावखेडा येथील पूर्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाला. यावेळी नदीला मोठ्या प्रमाणावर पाणी आले होते. आईचे औषध घेवून गावाकडे परतत असतांना पंडित गोंगे पुलावरून जात होते. त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते वाहून गेले. विशेष म्हणजे ते वाहून जात असताना तेथील लोक या घटनेची शूटिंग करीत होते. त्यांना वाचविण्यासाठी कोणीही मदत केली नव्हती. त्यांनतर अग्निशमन दलाच्या वतीने पंडित गोंगे यांचा शोध घेणे सुरू झाले होते. घटनेच्या तिसऱ्या दिवशी सकाळी बोरगाव सारवानी परिसरातील पुर्णा पात्रात काटेरी झुडपात गावकऱ्यांना मृतदेह आढळून आला. याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान येथे दाखल झाले. मृतदेहाची बाहेर काढताच तो पंडित गोंगे च असल्याची ओळख झाली. सिल्लोड येथे शवविच्छेदन करून पंडित गोंगे यांच्यावर सावखेडा येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Post a Comment