रामपुर येथे बिबट्याचा धुमाकूळ-दोन शेळ्याचा फडशा

कोल्हार/ प्रतिनिधी- राहुरी तालुक्यातील रामपूर भागातील लक्ष्मी वाडी परिसरात गेली चार दिवसापासून बिबट्याने धुमाकूळ घातला असून दोन शेळ्यांचा फडशा पाडल्याने नागरिकात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
रामपूर भागातील लक्ष्मीवाडी परिसरात कडवळ ,मका,बाजरी पिकामध्ये  बिबट्याचा मुक्काम असून ह्या बिबट्याने रामपूर येथील गट नंबर १२२ दशरथ ( दादु ) भोसले यांच्या स्वतःच्या मालकीची एक शेळी तर १४ नंबर अंगणवाडी शाळेजवळील संतोष शिवाजी साबळे यांची ही एक शेळी अशा दोन दिवसात लागोपाठ दोन शेळ्याचा बिबट्याने फडशा पाडल्याने परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
बिबट्याच्या धास्तीने शेतकर्‍यासह मजूर शेतात जाण्यासाठी धजावत नसल्याने मनुष्यावर बिबट्याने आक्रमक होण्यापूर्वीच किंवा शेळ्या-मेंढ्या वर जीवित हानी थांबवण्यासाठी वनविभागाने योग्य वेळीच पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करून नागरिकांना दिलासा मिळावा अशी मागणी रामपूर तंटामुक्ती अध्यक्ष रावसाहेब ( अण्णा ) पा. साबळे, पोलीस पा. बाजीराव साबळे, सरपंच अरुण भोसले, ज्ञानदेव लोखंडे, प्रमोद नालकर, योगेश शेटे,ऋषीकेश थेटे,विजय साबळे, रवी वर्पे, आप्पासाहेब थेटे, विजय नालकर, गौरव साबळे,पत्रकार विजय भोसले या रामपूर भागातील ग्रामस्थांनी केले आहे.
Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget