मलकापुरची "बैंजो केमिकल"कंपनीला पेटवून देण्याचा ग्रामस्थांचा इशारा, रसायनयुक्त पाण्यामुळे नागरिक व जनावरांचे जीव धोक्यात,शेतीवरही परिणाम

बुलढाणा - 22 सप्टेंबर
 बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यात असलेल्या दसरखेड एमआयडीसी मधील बैंजो केमिकल कंपनी ने रासायनिक युक्त पाणी नाल्यात सोडल्याने ते पाणी रणथम येथील तलावात पोहोचल्याने तलावातील पाणी दुषित झाले असून ग्रामस्थांचे आरोग्य या पाण्यामुळे धोक्यात आले आहे ग्रामस्थांना ईजा पोहचल्या असून अनेक  जनावरे दगावली असुन या केमिकल चा परिणाम शेतीवर ही दिसत असल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहे.
        गेल्या चार दिवसापासून या परिसरात संततधार पाऊस सुरू असल्याने बैंजो केमिकलने सोडलेले रासायनिक युक्त पाणी येथील तलावात पोहोचले या केमीकलने पाण्यात दुर्गंधी आली असून या पाण्यामुळे ग्रामस्थांना अँलर्जी,खाजेचे प्रकार, उलट्या,सुरू झाल्या असुन  याच परिसरातील तीन म्हशी, एक गाय,अठरा बकऱ्या, एक बैलजोडी दगावल्याने शेतकरी तथा ग्रामस्थ संतप्त झाले आहे या तलावातील पाणी पुढे पूर्णा नदी पात्रात जात असल्याने त्या ठिकाणी 22 गाव पाणीपुरवठा प्रादेशिक योजना असून दुर्गंधीयुक्त पाणी या योजनेच्या जँकवेल मध्ये गेल्यास दसरखेड, विवरा, तांदुळवाडी, तालसवाडा, धरणगाव, कुंड बु!!, कुंड खुर्द,रणथम, शिवनी, निंबोळी, तिघ्रा,भानगुरा, दुधलगाव, रणगांव, वाघोळा, नवीन दुधलगाव,चिंचोल, देवधाबा,गोराड, हिंगणा काजी, भालेगाव ,खडकी, चिखली आधी गावातील ग्रामस्थांचे आरोग्य सुद्धा धोक्यात येणार असल्याची शंका उपस्थित झाल्याने रणथम येथील सरपंच जयदीप पाटील,उपसरपंच उल्हास डमाळे,सुभाष राव पाटील, निना मेंहेंगे,चिखलीचे सरपंच राजेश कांडेलकर,आदींसमवेत ग्रामस्थांनी बैंजो कंपनीला जाब विचारण्यासाठी धडक दिली.यावेळी भाजपा नेते शिवचंद्र तायडे,हेमंतसिंह राजपूत, सुनिल रायपुरे शेतकऱ्यांची बाजू मांडली.या रसायनिक युक्त पाण्याची तात्काळ विल्हेवाट न लावल्यास ग्रामस्थांनी कंपनी पेटवून देण्याचा ईशारा दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.
Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget