Latest Post

कोल्हार  : दरवर्षी प्रमाणे याही वर्षी हिंदी दिनानिमित्त आर्ट,सायन्स,काॅमर्स काॅलेज,कोल्हार येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी हिंदी राष्ट्रभाषा जनजागृतीसाठी हिंदी संभाषण स्पर्धा, निबंध स्पर्धा,वाद-विवाद स्पर्धा व आदी उपक्रम राबविण्यात आले. आर्ट,सायन्स व काॅमर्स काॅलेज कोल्हार हिंदी विभाग यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी ज्या विद्यार्थ्यांनी स्पर्धांमधे मधे भाग घेतला होता त्यांना प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह व पुष्प चिन्ह प्रमुख मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून साहय्यक निर्देशक श्री.संजयजी शुक्ला,प्राचार्य एस.एन.शिंगोटे सर,उपप्राचार्या अर्चना विखे,नवले सर,हिंदी विभाग प्रमुख प्रविण तुपे सर,विखे सर,रूद्राक्ष सर आदि उपस्थित होते. यावेळी बोलताना संजयजी शुक्ला यांनी हिंदी विषयाचे महत्त्व व हिंदी विभागा मधे असणार्या सर्व रोजागारा विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. व आभार प्रदर्शन इंग्रजी विभाग प्रमुख विखे सर यांनी मानले कार्यक्रमास सर्व  शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रतिनिधी : निखील भोसले

सिल्लोड, प्रतिनिधी : बुधवारी पूर्णा नदीच्या पुरात वाहून गेलेल्या तरुणाचा गुरुवारी अग्निशामक दलाचे जवान, महसूल, पोलिस प्रशासन व ग्रामस्थांनी दिवसभर नदीत शोध घेतला. परंतु त्यांना मृतदेह शोधन्यात यश आले नाही. आज शुक्रवारी सकाळी पुन्हा शोधकार्य हाती घेण्यात येणार आहे, अशी माहिती नायब तहसीलदार किरण कुळकर्णी यांनी दिली.
       बुधवारी सकाळी आमठाणा, घाटनांद्रा परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने पूर्णा नदीला मोठा पूर आला होता. या नदी काठावरील सावखेडा येथील पंडित पांडू गोंगे (32) हा तरुण बोरगाव् बाजार येथे मेडिकल औषध घेण्यासाठी पूर्णा नदीवरील पुलावरुन जात असताना पाय घसरल्याने पाण्यात पडला व पुरात वाहून गेला. त्याचा बराच शोध घेतला. परंतु पाण्याचा ओघ वाढल्याने त्याचा मृतदेह मिळाला नाही.
     गुरुवारी नायब तहसीलदार किरण कुळकर्णी, ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विश्वास पाटील, उपनिरीक्षक विलास आडे, विष्णू पल्हाळ, देवीदास जाधव, मुश्ताक शेख, मंडळ अधिकारी दांडगे, तलाठी, अग्निशामक दलाचे पाच जवान यांच्यासह ग्रामस्थांनी दिवसभर नदीत शोध घेतला. पण त्यांना मृतदेह शोधन्यात यश आले नाही.
    बुधवारी सकाळी आमठाणा, चारनेर, केळगाव, अंभई,  घाटनांद्रा परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने दाणादान उडाली. या पावसामुळे जोत्याखाली असलेला चारनेर- पेंडगाव प्रकल्पासह छोटे- मोठे जलसाठे तुडुंब भरले आहेत. खरीप हंगामा सोबत रबी हंगाम येणार असल्याने शेतकऱ्यांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. 
आमठाणा मंडळात अतिवृष्टी
  बुधवारी सर्वाधिक पाऊस आमठाणा मंडळात 95 मिमी झाला. त्या खालोखाल अजिंठा 62, बोरगाव बाजार 45, भराडी 40, अंभई  36, गोळेगाव 30, तर सर्वाधिक कमी सिल्लोड व निल्लोड मंडळात 6 मिमी पाऊस झाला. 

शिर्डी प्रतिनिधी:- एडिशनल एस पी काळे याँच्या मार्गदर्शना ख़ाली श्रीरामपुर पोलिसांनि श्रीरामपुर येथिल दारूच्या अड़्यावर शहर पोलिसांनि जंबो कारवाई करूण मोठया प्रमानात दारू जप्त करुण मोठि करवाई करण्यात आली असल्याने पोलिसाँचे सर्वत्र कौतुक होत आहें तसिच करवाई साइबाबांच्या पावन भूमि शिर्डीत ही होन्याचीं गरज आहें शिर्डीत दररोज़  साइबाबांच्या दर्शना साठि लाखों भाविक येतात  परंतु शिर्डीत प्रवेश करतानाच साईभक्तांना हया तळीरामाँचा सर्व प्रथम दर्शन होते शिर्डीत हे तीर्थ षेत्र असल्याने शिर्डीत आधी पासुणच दारू बंदी असतांनाही येथे सर्रास दारू विक्रि अनाधिकृत पणे केली जाती परंतु त्यांच्यावर जंबो तर सोडा साधीं करवाईही लवक़र होत नाही तेव्हा अडिशनल एस पी यांनी शिर्डी कड़े जास्त लक्ष देन्याचीं गरज निर्माण झाली आहें अशी साईभक्तांचि मागनी आहें जेने करूण शिर्डीचीं पवित्रता आबाधित राहिल.


बुलढाणा - 19 सितंबर
बुलढाणा जिले के ग्राम देवलगाव महि के पास में वर्ष 2000 में गाव तालाब का निर्माण जिला परिषद के सिंचाई विभाग द्वारा किया गया था जिसमे कुछ किसानों की ज़मीन संपादित की गई किंतु किसानों को संबंधित विभाग ने मुआवजा कम दिया था.अधिक मुआवज़ा मिले इसके लिए प्रशासन के चक्कर काटने पर भी किसानों की मुआवजे की मांग पूरी ना होने पर आखिर 4 किसानों ने बुलढाणा कोर्ट में 2010 में न्याय के लिए गुहार लगाई जिसका फैसला 2018 में आया जिसमे किसानों को अतिरिक्त मुआवजा दिए जाने का फरमान था किंतु कोर्ट का आदेश होने पर भी किसानों को न्याय नही मिलने पर किसान फिर से कोर्ट में मुआवज़े की रकम वसूली के लिए रुजू हुए जिस पर कोर्ट ने गंभीर कदम उठाते हुए बुलढाणा जिलाधीश कार्यालय का साहित्य ज़ब्त करने का आदेश दिया.आज 19 सितंबर को कोर्ट का बेलिफ़ पीड़ित किसानों के साथ बुलढाणा जिलाधीश कार्यालय पहोंचा किंतु जिलाधीश श्रीमती निरुपमा डांगे मुम्बई गई हुई थी तब कोर्ट बेलिफ़ ने कार्यालय में मौजूद संगणक,प्रिंटर,कुर्सी ज़ब्त कर किसानों के सुपुर्द कर दिया ये कार्रवाई शाम 7 बजे तक चली.हालांकि किसानों को निवासी उपजिलाधीश घुगे तथा अन्य कर्मी समझाते रहे लेकिन किसान अपनी जप्ती की मांग पर डटे हुए थे जिनके कडे तेवर देख कर बाद में उन्हें साहित्य ले जाने दिया गया.

माननीय उपायुक्त श्री प्रसाद सुर्वे तसेच श्री पराग नवलकर अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क अहमदनगर व सी पी निकम उपाधीक्षक अहमदनगर यांचे मार्गदर्शनाखाली दिनांक १९ /०९/२०१९ रोजी  पहाटे ०२.०० वाजताच्या सुमारास निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक २श्रीरामपूर व स्टाप यांनी हिंदुस्तान पेट्रोल पंपच्या मागील बाजूस मांजरी शिवार तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर याठिकाणी मिळालेल्या गुप्त बातमीनुसार स्टाफ सह दारूबंदी गुन्हा याकामी छापा मारला असता  विदेशी व देशी  मद्याचे ७४ बॉक्स मिळून आले त्याची किंमत अंदाजे ०३,२९,१८४/- रुपयेचा दारूबंदी गुन्हयाचा मुद्देमाल हस्तगत केला सदर गुन्ह्यात  आरोपी  नामे अशोक  तुकाराम विटनोर यास अटक केली  सदर आरोपीविरुद्ध मुंबई दारूबंदी कायदा १९४९ चे कलम ६५ (अ), (ई) ८०(१) अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीला माननीय न्यायालय राहुरी यांच्यासमोर हजर केले.       सदर कारवाई ही निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक 2 श्रीरामपूरचे श्री अनिल पाटील निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक 2, पी बी अहिरराव दुय्यम निरीक्षक, के यु छत्रे दुय्यम निरीक्षक , ए सी खाडे दुय्यम निरीक्षक ,नम्रता वाघ दुय्यम निरीक्षक, कॉन्स्टेबल स्टाफ श्री राजेंद्र कदम, विकास कंठाळे, दीपक बर्डे, प्रवीण साळवे,   व महिला जवान वर्षा जाधव यांनी कारवाई केली सदर गुन्ह्याचा पुढील तपास श्री अनिल पाटील निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क क्रमांक 2 श्रीरामपूर हे करत आहेत

राहुरी प्रतिनिधी,
राहुरी शहरात त्वरीत ग्रामीण रूग्णालय व्हावे या मागणीसाठी आज दिनांक १८ सप्टेंबर रोजी नगरपरिषद कार्यालया समोर आरपीआय आठवले गटाच्या वतीने तालुकाध्यक्ष विलास साळवे यांच्या नेतृत्वाखाली घंटानाद आंदोलन करण्यात आले. तसेच त्या मागणीचे निवेदन नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांना देण्यात आले.
         गेल्या अनेक वर्षापासून राहुरी येथील ग्रामीण रूग्णालयाचा प्रश्न प्रलंबित आहे. आज पर्यंत विविध संघटनांच्या वतीने अनेक आंदोलने करण्यात आली. मात्र रूग्णालयाचा प्रश्न अद्याप मार्गी लागला नाही. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने तालुकाध्यक्ष विलास साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली २३ जुलै २०१९ रोजी प्राणांतीक आमरण उपोषण केले होते. त्यावेळी आमदार शिवाजी कर्डीले, नगराध्यक्ष प्राजक्त तनपूरे, तहसीलदार फसिओद्दीन शेख, बांधकाम अभियंता फुलचंद जाधव, भूमी अभिलेख उप अधिक्षक थोरात यांनी उपोषण कर्त्यांशी चर्चा करून लवकरच ग्रामीण रूग्णालयाचा प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन देऊन उपोषणा पासून परावृत्त करण्यात आले होते. मात्र दोन महिने उलटल्या नंतरही ग्रामीण रूग्णालयाच्या प्रश्ना बाबत काहीच हालचाली झाल्या नाहीत. त्यामुळे दिनांक १९ सप्टेंबर रोजी आरपीआय चे तालुकाध्यक्ष विलास साळवे यांच्या नेतृत्वाखाली घंटानाद आंदोलन करून नगरपरिषद प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला. यावेळी विलास साळवे यांनी सांगितले की, ज्या ठिकाणी रूग्णालयास मंजूरी दिली. त्याच जागी रूग्णालय होते. या शासनाच्या नियमांची आम्हाला माहिती आहे. नगराध्यक्ष यांच्या कडून आमची दिशाभूल केली जात आहे.
         तसेच ग्रामीण रूग्णालयासाठी आलेला सुमारे १८ कोटीचा निधी पालिकेच्या निष्काळजीपणा मुळे धूळखात पडला आहे. असे अरूण साळवे यांनी सांगून पालिका प्रशासनावर गंभीर आरोप करत, पालिका प्रशासनच याला जबाबदार असल्याचे सांगितले.
        यावेळी नगराध्यक्ष प्राजक्त तनपूरे यांनी आंदोलकांची भेट घेऊन चर्चा केली. तसेच ग्रामीण रूग्णालय शहरातच झाले पाहिजे. आम्ही रूग्णालयाची इमारत शहरा बाहेर जाऊ देणार नाही. ग्रामीण रूग्णालय शहरातच झाले पाहिजे, यासाठी पालिका प्रशासन प्रयत्नशील आहे. असे परखड मत तनपूरे यांनी व्यक्त केले. यावेळी प्रविण लोखंडे यांनी नगराध्यक्ष प्राजक्त तनपूरे व मुख्याधिकारी श्रीनिवास कुरे यांच्याशी चर्चा करून रूग्णालयाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा असे सांगितले. यावेळी आंदोलन कर्त्यांनी नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन आंदोलन मागे घेतले.

ओझर प्रतिनिधी: एकात्मिक बाल विकास सेवा योजना निफाड २ च्या अंतर्गत येणार्या ओझर येथील रामजी नगर 27516140526 या अंगणवाडी मध्ये पोषण अभियान उपक्रमा अंतर्गत झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अन्याय अत्याचार निर्मुलन समितीचे प्रदेश अध्यक्ष मा.रविंद्रदादा जाधव हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ओझर प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सहाय्यक श्री.अनिलजी राठी, आरोग्य सेवक श्री.सुरज हरगोडे, सामाजिक कार्यकर्त्या माधुरी जाधव, ह्या उपस्थित होत्या. या वेळी शिक्षणाची दैवत सावित्रीमाई फुले यांचे प्रतीमेचे पुष्पहार अर्पण करुन व्दीपप्रज्वलन करुन उद्घाटन करण्यात आले.
या वेळी कीशोरीवयीन कु.प्रज्ञा गौतम निकम, कु.भारती अशोक गवारे यांनी अतिषय सुंदर काढलेल्या रांगोळी प्रदर्शनाची पाहणी करुन कौतुक करण्यात आले.
या वेळी अंगणवाडी कार्यकर्ती श्रीमती सुनिताताई निकम व मदतनीस श्रीमती प्रणिता कापडणे यांनी कुपोषण मुक्त भारत या संकल्पनेवर भर देवुन बालकांना विविध प्रकारच्या हिरव्या पालेभाज्या, फळे व जंगली भाज्याचे अनेक चवदार पदार्थ बनवून ठेवुन सर्व बालकांना उपस्थितांना चव दीली. या वेळी रांगोळी प्रदर्शनात  "बेटी बचाव बेटी पढाओ"  सामाजिक स्वच्छता, व्यसनमुक्ती, अक्षय पात्र योजना, या संदर्भात सामाजिक प्रबोधन केले.
या वेळी चाळीस बालकांना शाळेच्या पाट्या व पेंन्सिलचे वाटप करण्यात आल्या. उत्कृष्ट अंगणवाडी कार्यकर्ती म्हणून मा.रविंद्रदादा जाधव यांचे अन्याय अत्याचार निर्मुलन समितीच्या वतीने श्रीमती सुनिता यांना शाल, स्मृतिचिन्ह, नारळ, पुष्प देवुन गौरवण्यात आले. तसेच या वेळी कौशल्याबाई जाधव, इंदुबाई गटकळ,  इंदुबाई कोरडे, शारदाबाई जाधव, लताबाई जाधव या पाच जेष्ठ महीलांचा नारळ व गुलाबपुष्पे ब्लाऊजपीस देवुन रविंद्रदादा जाधव व अनिलजी राठी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास अंगणवाडी कार्यकर्ती सविता चौधरी, सुनंदा जाधव, सुरेखा म्हैसधुनी, स्थानिक नागरीक माया जाधव, मनिषा जाधव, अंजना जाधव, छाया जाधव, भारती टोंगारे,  आदींसह असंख्य महिला उपस्थित होते. सुत्रसंचालन अंगणवाडी कार्यकर्ती सुनिता निकम यांनी केले तल आभार मदतनिस प्रणिता कापडणे यांनी मानले.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget