Latest Post

सिल्लोड, प्रतिनिधी : तालुक्यातील वडाळा येथील डेंग्यू सदृश तापाची लागन आटोक्यात असून सोमवारी जिल्हा आरोग्य व आमठाणा केंद्र असे दोन पथक गावात ठान मांडून होते अशी माहिती आमठाणा केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश राठोड यांनी दिली. जिल्हा आरोग्य पर्यवेक्षक बोराडे व त्यांच्या पथकाने रुग्णांची तपासणी करुण रक्ताचे नमुने घेतले.

       सोमवारी आरोग्य सहायक संचालक डॉ. भटकर, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कुंडलीकर, डॉ. जयश्री शेळके यांनी भेट देऊन आढावा घेतला व पथकातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांना सुचना केल्या. गावात गेल्या दहा- पंधरादिवसांपासून डेंग्यू सदृश तापाची लागन झाल्याने अनेक नागरिक तापाने फणफणत आहे. यात शनिवारी दोन महिलांचा तर रविवारी एका शालेय विद्यार्थिंचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली होती. यानंतर आरोग्य विभाग खडबडून जागे झाले. दोन दिवसांपासून आमठाणा केंद्राचे पथक गावात ठान मांडून आहे, तर सोमवारी जिल्हा आरोग्य पथकाने गावात जाऊन औषधोपचार केले.

    दरम्यान सोमवारी पंचायत समितीचे सभापती ज्ञानेश्वर तायडे, गटविकास अधिकारी प्रकाश दाभाडे, पंचायत समिती सदस्य काकासाहेब राकडे यांनी भेट देऊन पाहणी केली व आढावा घेतला. गावातील परिस्थिती नियंत्रणात असून पथक गावात ठान मांडून आहे. आरोग्य विभागाचे बारकाईने लक्ष असून नागरिकांनी मनात भीती बाळगु नये असे आवाहन डॉ. योगेश राठोड यांनी केले आहे.

*साफसफाईचे काम घेतले हाती*

       गावाशेजारी मोठ्या प्रमाणात गाजर गवत तसेच सांड पाण्याचे डबके साचलेले होते. यामुळे डासांचा सुळसुळाट वाढला व डेंग्यू सारख्या साथीच्या रोगाची लागन झाली. रविवारी तत्काळ आरोग्य विभागाने धूर फवारणी केली. सोमवारी ग्रामपंचायतीने गाजर गवतावर तननाशक औषधाची फवरणी केली. शिवाय सांड पाण्याने साचलेल्या डबक्यांचा निचरा केला अशी माहिती सरपंच नवनाथ डाखुरकर यांनी दिली.

औरंगाबाद : मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात एका याचिकेवर सुनावणी चालू असताना न्यायालयीन कामकाजाचे ‘व्हिडीओ चित्रीकरण’ करणारे डॉ. विक्रम श्रीधरराव देशमुख यांना न्या. रवींद्र व्ही. घुगे यांनी ५० हजार रुपये दंड ठोठावला. दंडाची ही रक्कम २५ सप्टेंबरपर्यंत खंडपीठात जमा न केल्यास त्यांच्याविरुद्ध ‘उच्च न्यायालयाच्या अवमानाची कारवाई’ केली जाईल, असे खंडपीठाने आदेशात म्हटले आहे.नांदेड जिल्ह्यातील गंगाबाई रामराव कप्पावार यांच्या पतीने सरकारी जागेवर अतिक्रमण केल्यामुळे नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी गंगाबाईला सरपंचपदी अपात्र घोषित केले होते. रिक्त झालेल्या सरपंच पदाच्या निवडीसाठी जिल्हाधिकाºयांनी १२ सप्टेंबर २०१९ ला ‘विशेष बैठक’ आयोजित केली होती. म्हणून गंगाबाई यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करुन तात्काळ सुनावणी घेण्याची विनंती केली होती. खंडपीठाने न्यायालयीन कामकाजाची वेळ संपल्यानंतर ११ सप्टेंबरला सुनावणी घेतली.सुनावणी चालू असताना एक व्यक्ती मोबाईलद्वारे व्हिडीओ चित्रीकरण करीत असल्याचे बेन्च क्लर्कने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. न्यायालयाने तत्काळ मोबाईल ताब्यात घेऊन त्यातील व्हीडीओ चित्रीकरण तपासले. सदर व्यक्ती हा याचिकाकर्तीच्या पतीचा मित्र डॉ. विक्रम श्रीधरराव देशमुख असल्याचे त्याने खंडपीठास सांगितले व त्याचे आधार कार्ड सादर केले. खंडपीठाने त्याला ७ दिवस कारावास किंवा एक लाख रुपये दंड भरण्याची तयारी आहे काय, असे त्याच्या वकीलामार्फत विचारले. डॉ. देशमुखने पुन्हा चूक कबूल करुन क्षमा याचना केली. तसेच ५० हजार रुपये दंड भरण्याची तयारी दर्शविली.

मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर पावसाने विश्रांती घेतली आहे़ पर्यटकांची गैरसोय होऊ नये म्हणून पाटबंधारे खात्याने धरण बघण्याची सर्वांना संधी उपलब्ध करून दिली आहे.
राहुरी :  मुळा धरणाचा नदी पात्रात होणारा विसर्ग  सोमवारी बंद होण्याची शक्यता आहे.मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर पावसाने विश्रांती घेतली आहे़ पर्यटकांची गैरसोय होऊ नये म्हणून पाटबंधारे खात्याने धरण बघण्याची सर्वांना संधी उपलब्ध करून दिली आहे.  मुळा धरणात सध्या २५ हजार ७००  दशलक्ष घनफूट पाणी साठ्याची नोंद झाली आहे़ सध्या धरणाच्या ११ मो-यातून २००० क्युसेकने पाण्याचे आवर्तन नदीपात्रात सुरू आहे़ धरणातून जायकवाडीकडे २ हजार ३००  दशलक्ष घनफूट  पाणी वाहून गेले आहे़ धरणाच्या उजव्या कालव्यातून २ हजार २०० क्सुसेकने पाण्याचे आवर्तन सुरू आहे़ याशिवाय डाव्या कालव्यातून १४० क्युसेकने पाण्याचे आवर्तन सुरू आहे़मुळा धरणावर पावसाने विश्रांती घेतल्याने पाण्याची आवक घटली आहे़ २५ हजार ७००  दशलक्ष घनफूट  पाणीसाठा कायम ठेऊन नदी पात्रात पाणी सोडण्याचे धोरण पाटबंधारे खात्याने घेतले आहे़ कोतूळ येथे केवळ २ मिलीमीटर पावसाची नोंद झाली़ मुळा नदीपात्रातून दोनदा पाणी सोडल्यामुळे नदी काठी असलेल्या विहिरींच्या पाण्याची पातळी वाढली आहे़ मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्राबरोबरच लाभ क्षेत्रावरही पावसाने विश्रांती घेतली आहे़ त्यामुळे धरणाचे दोन्ही कालवे बंद आहेत़ मान्सून परतण्याच्या मार्गावर आहे़ त्यामुळे शेतकºयांचे लक्ष आभाळाकडे वेधले आहे़ लाभ क्षेत्रावर पाऊस घटल्याने खरीप हंगाम धोक्यात आला आहे़ पावसाअभावी मुळा धरणाच्या दोन्ही कालव्यातून ५ हजार दशलक्ष घनफूट  पाणी सोडावे लागले आहे़

राहाता (तालुका प्रतिनिधी) अस्तगाव माथ्याजवळ भरधाव हुंडाई कारने पिंपरी निर्मळच्या दोन शेतकर्‍यांना मागील बाजूने धडक देऊन फरफटत नेल्याने दोघांचाही घटनास्थळी मृत्यू झाला. ही घटना 4 वाजेच्या सुमारास अस्तगाव माथ्याजवळ हॉटेल साई किरणजवळ घडली. या भिषण अपघातात निर्मळ पिंपरी येथील बाळासाहेब गोरक्षनाथ निर्मळ (वय 45) व विलास सोपान निर्मळ (वय 47) हे दोघे घटनास्थळीच मयत झाले. दोन्ही मयत पिंपरी निर्मळ येथील डाळिंब उत्पादक शेतकरी असून ते दोघे मोटारसायकलवरून राहाता बाजार समितीमध्ये जात असताना हॉटेल साई किरणसमोर बाभळेश्वरकडून राहात्याकडे भरधाव वेगात जाणार्‍या एमएच-17 बीएक्स-0081 या हुंडाई कारने त्यांना मागील बाजूने जोराची धडक देत 50 फूट फरपटत पुढे नेले. यातील बाळासाहेब निर्मळ यांचा जागीच मृत्यू झाला तर विलास हा गंभीर जखमी झाला होता. वेळीच वैद्यकीय मदत न मिळाल्याने त्याचाही मृत्यू झाल्याचे नातेवाईकांनी सांगितले यातील दोन्ही मृतदेह लोणी येथील प्रवरा रूग्णालयात नेण्यात आले. तसेच अपघातग्रस्त वाहने राहाता पोलीस ठाण्यात आणण्यात आली असून रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.

आजोबाकडून मतिमंद अल्पवयीन नातीचा विनयभंग
सिन्नर . घरात एकटी असणाऱ्या 14 वर्षीय मतिमंद मुलीचा चुलत आजोबानेच विनयभंग केल्याची घटना शनिवारी (दि 14) दुपारी 3 वाजेच्या सुमारास सिन्नर तालुक्यात घडली.या प्रकरणी वावी पोलीस ठाण्यात 66 वर्षीय आजोबा विरोधात पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भास्कर तुकाराम निकम रा. पांगरी यांनी सदर अल्पवयीन मुलगी घरात एकटी असताना तिचा विनयभंग केला.मतिमंद असल्याने या मुलीला कोणताही प्रतिकार करता आला नाही. नेमक्यावेळी तिचे वडील घरात आल्याने हा प्रकार उघडकीस आला. आपण पकडले जाऊ या भीतीने निकम यांनी तेथून धूम ठोकली.मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी विनयभंग व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपअधीक्षक माधव पडिले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक रणजित गलांडे याप्रकरणी तपास करीत आहेत

औरंगाबाद प्रतिनिधी/  फिरोज शेख
आज दि ,रोज सहारा ग्रुप च्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे रविवार दि रोज आज सकाळी 10:00 वाजल्यापासून शिबिराला सुरवात झाली होती एम जी एम कॉलेज समोर जिल्ला हॉस्पिटल औरंगाबाद येथे घेण्यात आले आहे घाटी रूग्णालयात रक्ताचा तुटावा निर्माण होत आसल्याचा लक्षात येताच सहारा ग्रुप च्या वतिने रक्तदान शिबिराचे आयोजन केले व 350 उन अधिक रक्तदात्यांनी या शिबिरात रक्तदान केले या वेळी मुंन्सी  भैय्या पटेल साजिद पटेल आझर पटेल आसमद पटेल सुभान पटेल वसीम पटेल आमेर पटेल शेख काझी आसिफ पटेल आदी मान्यवर व मित्र परिवार उपस्थित होते

सिल्लोड /  प्रतिनिधी : तालुक्यातील वडाळा येथील साक्षी साईनाथ शेळके (19) या शालेय विद्यार्थिंचा रविवारी सकाळी 4 वाजेच्या सुमारास औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला. डेंग्यु सदृश आजाराची साक्षी तिसरा बळी ठरली. यापूर्वी शनिवारी दोन महिलांचा उपचार सुरु असतांना मृत्यू झाला होता. दरम्यान रविवारी आमठाणा आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश राठोड 20 आरोग्य कर्मचाऱ्यांसह गावात दुपारी 4 वाजेपर्यंत ठान मांडून होते.

     वडाळा गावात डेंग्यु सदृश तापाची लागन झाल्याने अनेक रुग्ण तापाने फणफणत आहे. असे असताना आमठाणा आरोग्य केंद्रांच्या पथकाने सहा- सात दिवसांपूर्वी गावात येऊन रुग्णांवर उपचार केले व दोन- तीन दिवसांनी परत येऊ म्हणून गेले. यानंतर तापाची लागन वाढतच गेली व आरोग्य पथक ही फिरकले नाही. यामुळे डेंग्यु सदृश तापाने फणफणत असलेल्या चार जणांना औरंगाबाद येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. यातील दैवशाला बबलू शेळके (22), कडूबाई शेषराव मानकर (50) या महिलांना घाटीत, तर साक्षी साईनाथ शेळके (19), किरण सुधाकर शेळके (6) या मुलांना खाजगी रुग्णालयात दाखल केले होते.

      यातील दैवशाला बबलू शेळके या महिलेचा शनिवारी दुपारी 11 वाजेच्या सुमारास, तर कडूबाई शेषराव मानकर या महिलेचा शनिवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास उपचार सुरु असताना मृत्यू झाला. रविवारी सकाळी साक्षीचा ही उपचार सुरु असताना मृत्यू झाला. डेंग्यु सदृश आजाराने रविवारी तिसरा बळी घेतला. साक्षी इयत्ता 8 वीत शिक्षण घेत होती.

     आठ- दहा दिवसांपासून डेंग्यु सदृश आजारामुळे अनेक रुग्ण तापाने फणफणले. यात दररोज रुग्णांची भर पडत राहिली. त्यात दोन दिवसात दोन महिला व एक शालेय विद्यार्थिंचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

     दरम्यान तिन जणांचा मृत्यू झाल्यानंतर रविवारी आरोग्य विभागाला खडबडून जाग आली. वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश राठोड 20 आरोग्य कर्मचाऱ्यांसह गावात सकाळीच दाखल झाले. शाळेत 350 नागरिकांची पथकाने तपासणी केली. शिवाय 55 नागरिकांचे रक्ताचे नमूने घेऊन तपासणीसाठी पाठवले असल्याची माहिती राठोड यांनी दिली. गावात डासांचा सुळसुळाट वाढल्याने धूर फवारणी करण्यात आली असल्याचे ही त्यांनी सांगितले. दरम्यान गावाशेजारी गाजर गवत, सांडपाणी साचल्याने घाणीचे साम्राज्य पसरले. यामुळे डासांचा सुळसुळाट वाढला व या आजाराची लागन झाल्याची चर्चा नागरिकांमधून केली जात आहे.

*तालुका, जिल्हा आरोग्य अधिकारी फिरकलेच नाही*

     एकीकडे डेंग्यु सदृश आजराने गावात थैमान घातल्याने तिघांचा मृत्यू झाला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता तत्काळ गावाला जिल्हा हिवताप अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांनी भेट देणे गरजेचे होते. परंतु जिल्हा हिवताप अधिकारी तर सोडाच तालुका आरोग्य अधिकारी ही गावाकडे फिरकले नाही. यामुळे नागरिकांमधून रोष व्यक्त केला जात आहे. या संधर्भात दोन्हीं अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही. यावरुन आरोग्य विभागाला घटनेचे किती गांभीर्य आहे हे सिध्द होते.

*...अन आजोबाला रडू कोसळले*

   या बाबत मयत साक्षीचे आजोबा दामू शेळके यांच्याशी संपर्क साधला असता गावात डेंग्यु सदृश आजाराची लागन झालेली असतांना देखील तज्ञ डॉक्टर आले नाही. या आजाराने माझ्या नातीचा जिव घेतला. माझी नात शाळेत खूप हुशार होती. गुणी होती, अशा आठवणी सांगत असतांना त्यांना रडू कोसळले.

*कोट*

    नागरिकांना कोरडा दिवस पाळावा. पाणी गाळून व उकळून प्यावे. परिसर स्वच्छ ठेवावा. ताप येताच रुग्णाला आरोग्य केंद्रात तत्काळ उपचारासाठी दाखल करावे. डेंग्यु सदृश आजार लवकर बरा होतो. नागरिकांनी मनात भीती बाळगू नये.

                           डॉ. योगेश राठोड

             वैद्यकीय अधिकारी आरोग्य केंद्र आमठाणा






   

   



     


     

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget