वडाळा येथील साक्षी साईनाथ शेळके (19) या शालेय विद्यार्थिंचा उपचार सुरु असताना डेंग्यू मुळेमृत्यू

सिल्लोड /  प्रतिनिधी : तालुक्यातील वडाळा येथील साक्षी साईनाथ शेळके (19) या शालेय विद्यार्थिंचा रविवारी सकाळी 4 वाजेच्या सुमारास औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला. डेंग्यु सदृश आजाराची साक्षी तिसरा बळी ठरली. यापूर्वी शनिवारी दोन महिलांचा उपचार सुरु असतांना मृत्यू झाला होता. दरम्यान रविवारी आमठाणा आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश राठोड 20 आरोग्य कर्मचाऱ्यांसह गावात दुपारी 4 वाजेपर्यंत ठान मांडून होते.

     वडाळा गावात डेंग्यु सदृश तापाची लागन झाल्याने अनेक रुग्ण तापाने फणफणत आहे. असे असताना आमठाणा आरोग्य केंद्रांच्या पथकाने सहा- सात दिवसांपूर्वी गावात येऊन रुग्णांवर उपचार केले व दोन- तीन दिवसांनी परत येऊ म्हणून गेले. यानंतर तापाची लागन वाढतच गेली व आरोग्य पथक ही फिरकले नाही. यामुळे डेंग्यु सदृश तापाने फणफणत असलेल्या चार जणांना औरंगाबाद येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. यातील दैवशाला बबलू शेळके (22), कडूबाई शेषराव मानकर (50) या महिलांना घाटीत, तर साक्षी साईनाथ शेळके (19), किरण सुधाकर शेळके (6) या मुलांना खाजगी रुग्णालयात दाखल केले होते.

      यातील दैवशाला बबलू शेळके या महिलेचा शनिवारी दुपारी 11 वाजेच्या सुमारास, तर कडूबाई शेषराव मानकर या महिलेचा शनिवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास उपचार सुरु असताना मृत्यू झाला. रविवारी सकाळी साक्षीचा ही उपचार सुरु असताना मृत्यू झाला. डेंग्यु सदृश आजाराने रविवारी तिसरा बळी घेतला. साक्षी इयत्ता 8 वीत शिक्षण घेत होती.

     आठ- दहा दिवसांपासून डेंग्यु सदृश आजारामुळे अनेक रुग्ण तापाने फणफणले. यात दररोज रुग्णांची भर पडत राहिली. त्यात दोन दिवसात दोन महिला व एक शालेय विद्यार्थिंचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

     दरम्यान तिन जणांचा मृत्यू झाल्यानंतर रविवारी आरोग्य विभागाला खडबडून जाग आली. वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश राठोड 20 आरोग्य कर्मचाऱ्यांसह गावात सकाळीच दाखल झाले. शाळेत 350 नागरिकांची पथकाने तपासणी केली. शिवाय 55 नागरिकांचे रक्ताचे नमूने घेऊन तपासणीसाठी पाठवले असल्याची माहिती राठोड यांनी दिली. गावात डासांचा सुळसुळाट वाढल्याने धूर फवारणी करण्यात आली असल्याचे ही त्यांनी सांगितले. दरम्यान गावाशेजारी गाजर गवत, सांडपाणी साचल्याने घाणीचे साम्राज्य पसरले. यामुळे डासांचा सुळसुळाट वाढला व या आजाराची लागन झाल्याची चर्चा नागरिकांमधून केली जात आहे.

*तालुका, जिल्हा आरोग्य अधिकारी फिरकलेच नाही*

     एकीकडे डेंग्यु सदृश आजराने गावात थैमान घातल्याने तिघांचा मृत्यू झाला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता तत्काळ गावाला जिल्हा हिवताप अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांनी भेट देणे गरजेचे होते. परंतु जिल्हा हिवताप अधिकारी तर सोडाच तालुका आरोग्य अधिकारी ही गावाकडे फिरकले नाही. यामुळे नागरिकांमधून रोष व्यक्त केला जात आहे. या संधर्भात दोन्हीं अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही. यावरुन आरोग्य विभागाला घटनेचे किती गांभीर्य आहे हे सिध्द होते.

*...अन आजोबाला रडू कोसळले*

   या बाबत मयत साक्षीचे आजोबा दामू शेळके यांच्याशी संपर्क साधला असता गावात डेंग्यु सदृश आजाराची लागन झालेली असतांना देखील तज्ञ डॉक्टर आले नाही. या आजाराने माझ्या नातीचा जिव घेतला. माझी नात शाळेत खूप हुशार होती. गुणी होती, अशा आठवणी सांगत असतांना त्यांना रडू कोसळले.

*कोट*

    नागरिकांना कोरडा दिवस पाळावा. पाणी गाळून व उकळून प्यावे. परिसर स्वच्छ ठेवावा. ताप येताच रुग्णाला आरोग्य केंद्रात तत्काळ उपचारासाठी दाखल करावे. डेंग्यु सदृश आजार लवकर बरा होतो. नागरिकांनी मनात भीती बाळगू नये.

                           डॉ. योगेश राठोड

             वैद्यकीय अधिकारी आरोग्य केंद्र आमठाणा






   

   



     


     
Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget