वडाळा येथील डेंग्यू सदृश तापाची लागन आटोक्यात

सिल्लोड, प्रतिनिधी : तालुक्यातील वडाळा येथील डेंग्यू सदृश तापाची लागन आटोक्यात असून सोमवारी जिल्हा आरोग्य व आमठाणा केंद्र असे दोन पथक गावात ठान मांडून होते अशी माहिती आमठाणा केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश राठोड यांनी दिली. जिल्हा आरोग्य पर्यवेक्षक बोराडे व त्यांच्या पथकाने रुग्णांची तपासणी करुण रक्ताचे नमुने घेतले.

       सोमवारी आरोग्य सहायक संचालक डॉ. भटकर, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कुंडलीकर, डॉ. जयश्री शेळके यांनी भेट देऊन आढावा घेतला व पथकातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांना सुचना केल्या. गावात गेल्या दहा- पंधरादिवसांपासून डेंग्यू सदृश तापाची लागन झाल्याने अनेक नागरिक तापाने फणफणत आहे. यात शनिवारी दोन महिलांचा तर रविवारी एका शालेय विद्यार्थिंचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली होती. यानंतर आरोग्य विभाग खडबडून जागे झाले. दोन दिवसांपासून आमठाणा केंद्राचे पथक गावात ठान मांडून आहे, तर सोमवारी जिल्हा आरोग्य पथकाने गावात जाऊन औषधोपचार केले.

    दरम्यान सोमवारी पंचायत समितीचे सभापती ज्ञानेश्वर तायडे, गटविकास अधिकारी प्रकाश दाभाडे, पंचायत समिती सदस्य काकासाहेब राकडे यांनी भेट देऊन पाहणी केली व आढावा घेतला. गावातील परिस्थिती नियंत्रणात असून पथक गावात ठान मांडून आहे. आरोग्य विभागाचे बारकाईने लक्ष असून नागरिकांनी मनात भीती बाळगु नये असे आवाहन डॉ. योगेश राठोड यांनी केले आहे.

*साफसफाईचे काम घेतले हाती*

       गावाशेजारी मोठ्या प्रमाणात गाजर गवत तसेच सांड पाण्याचे डबके साचलेले होते. यामुळे डासांचा सुळसुळाट वाढला व डेंग्यू सारख्या साथीच्या रोगाची लागन झाली. रविवारी तत्काळ आरोग्य विभागाने धूर फवारणी केली. सोमवारी ग्रामपंचायतीने गाजर गवतावर तननाशक औषधाची फवरणी केली. शिवाय सांड पाण्याने साचलेल्या डबक्यांचा निचरा केला अशी माहिती सरपंच नवनाथ डाखुरकर यांनी दिली.
Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget