पाण्याने भरलेली विहिरीत पडलेल्या बिबट्यास वन विभागाने दिले जीवदान
बुलडाणा - 15 सप्टेंबर
रात्रीच्या दरम्यान शेतातील विहिरीत पडलेल्या बिबट्यास गावकऱ्यांच्या मदतीने वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सुखरूप बाहेर काढून जीवदान दिले आहे.
विहिरित बिबट पडल्याची घटना आज रविवार दि.15 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजेदरम्यान मोहना खुर्द ता. मेहकर येथे समोर आली.शंकरराव लाटे यांची मोहना खुर्द शिवारात शेती असून या शेतातील विहिरीत काल शनिवार रात्रीच्या दरम्यान एक ते दोन वर्षाचा बिबट्या पडला होता. आज सकाळी या विहिरीवर पाणी आणण्यासाठी तुषार ताकतोडे हा युवक गेला असता त्याला विहिरीत लोखंडी कडीला दोन पाय अडकून बिबट्या लटकलेला दिसून आला त्यामुळे त्याने घाबरून जात शेजारील शेतातील लोकांना याची माहिती सांगितली. त्यानंतर शेतमालक शंकरराव लाटे तसेच वनपाल एस. वाय.बोबडे यांना माहिती देण्यात आल्यानंतर उपवन संरक्षक बुलडाणा संजय माळी, सहाय्यक वनसंरक्षक मेहकर संदीप गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिक्षेत्र अधिकारी पी.आर.तोंडीलायता,वनपाल एस. वाय. बोबडे, वनरक्षक के.बी. धनगर यांनी घटनास्थळी पोहोचत गावकऱ्यांच्या मदतीने बिबट्यास विहिरीतून सुखरूप बाहेर काढले. सदर बिबट्यास विहिरीतुन बाहेर काढताच त्याने जंगलाच्या दिशेने धुम ठोकली.बिबट्या विहिरीत पडलेला असल्याची माहिती पसरताच बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.