आयुष्यमान भारत योजनेच्या लाभार्त्यांना अब्दुल सत्तार यांच्याहस्ते ई - कार्ड चे वाटप

सिल्लोड (  प्रतिनिधी ) दि.13, गरिबांना आरोग्याच्या मोफत सुविधा मिळाव्यात यासाठी सरकारने आयुष्यमान भारत ही योजना आणली आहे. मोठ्या लोकांना आजार झाल्यास त्यांना सर्वकाही शक्य होते. मात्र गरिबांना जर मोठा आजार झाला तर त्यांच्याकडे उपचारासाठी पैसा नसतो. 2011 च्या आर्थिक निकषावर हा लाभ देण्यात येणार असून आयुष्यमान भारत चे कार्ड दाखविल्यास मोठ्या दवाखान्यात त्यांच्यावर उपचार होणार असल्याने आयुष्यमान भारत ही गरिबांसाठी खऱ्या अर्थाने जीवनदायी योजना ठरत असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केले.
  सिल्लोड नगर परिषदेच्या वतीने शहरातील लाभार्थ्यांना आयुष्यामान भारत योजनेच्या ई - कार्ड चे माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते वाटप करण्यात आले. याप्रसंगी अब्दुल सत्तार बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष केशवराव तायडे,नगराध्यक्षा राजश्री निकम , उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, शिवसेना उपजिल्हा प्रमुख रघुनाथ चव्हाण, तालूका प्रमुख किशोर अग्रवाल, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अर्जुन गाढे, उपसभापती तथा न.प. चे गतनेते नंदकिशोर सहारे, माजी जि. प. सदस्य देविदास लोखंडे, जिल्हा नियोजन समिती सदस्य सुदर्शन अग्रवाल आदींची प्रमुख उपस्थिती होती.


पूढे बोलताना अब्दुल सत्तार म्हणाले की, या योजनेच्या फॉर्म साठी सरकारने 50 रुपये नाममात्र शुल्क आकारले होते. यामध्ये सिल्लोड नगर परिषदेने 20 रुपये शुल्क भरणार असून लाभार्त्यांना केवळ 30 रुपये शुल्क भरायचे आहे.
  या योजनेसाठी सरकारने आपला विमा भरला असल्याने लाभार्त्यांना मोफत उपचार मिळणार आहे. एकूण 1250 उपचारांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे. तसेच लहान मुलांना जर कर्करोग झाला असेल तर त्याचा ही उपचार या योजनेत होईल आणि जर ज्येष्ठ नागरिकांचे गुढगे - पाय दुखत असेल तर गरज भासल्यास सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया या योजनेत होणार असल्याचे अब्दुल सत्तार यांनी स्पष्ठ केले.

   नगर परिषदेच्या बाबतीत बोलत आतांना अब्दुल सत्तार म्हणाले की , शहरात विविध ठिकाणी गरिबांना घेरे बांधून देण्यासाठी नगर परिषदेने जागा आरक्षित केली आहे . प्रधान मंत्री आवास योजनेच्या माध्यमातून प्रत्येक बे घरांना आम्ही घरे देणार असल्याचे सांगितले. खडकपूर्णा  पाणी पुरवठा योजनेचे काम प्रगती पथावर असून लवकरच ही योजना कार्यान्वित होईल. ही योजना कार्यान्वित होताच शहरात भूमिगत गटारी आणि शहराच्या परिसरात औद्योगिक क्षेत्र निर्मितीला चालना मिळणार असल्याचे अब्दुल सत्तार यांनी स्पष्ठ केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाजार समितीचे उपसभापती तथा नगर परिषदेतील गटनेते नंदकिशोर सहारे यांनी केले. प्रकल्प समनव्यक देवेंद्र सूर्यवंशी यांनी सूत्र संचालन केले तर मुख्याधिकारी सय्यद रफिक यांनी उपस्थितांचे आभार मानले.

कार्यक्रमास बाजार समितीचे संचालक नरसिंग चव्हाण , सतिष ताठे, दामुअन्न गव्हाणे, सुरेश आहेर, युवा सेना शहर प्रमुख शिवा टोम्पे, रवी रासने, दशरथ बर्डे, श्रवण गिरी, जिल्हा परिषद सदस्या सीमा गव्हाणे, अजंठा सरपंच दुर्गाबाई पवार, पंचायत समितीच्या माजी सभापती रेखा जगताप ,  स्वाती जवखेडे, पंचायत समिती सदस्य शेख सलीम, आसिफ देशमुख, धर्यशील तायडे, शांतीलाल बसय्ये, सरपंच रवि काळे, राम कटारिया, नगरसेवक शंकरराव खांडवे, आसिफ बागवान, विठ्ठल सपकाळ, शेख बाबर, सुनील दुधे,मतीन देशमुख, रातनकुमार डोभाळ, जुम्मा खा पठाण, सुधाकर पाटील, अनिस कुरेशी, प्रशांत क्षीरसागर, सत्तार हुसेन, राजू गौर, आरेफ पठाण, जितू आरके, मोईन पठाण,  मनोज झंवर, अकील वसईकर , शिवा गौर, सुभाष करवंदे, भास्कर आहेर,आदींसह महिला बचत गटाच्या पदाधिकारी, योजनेचे लाभार्थी व महिला पुरुषांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget