रास्ट्रभाषा ,रास्ट्रवाद रास्ट्रगित हे स्वातन्त्र भारताचे तिन बिनबिंदु
भराडी प्रतिनिधि, भारत या रास्ट्रा रास्ट्रातिल नागरिकाना सर्वच बाबतित एक करण्याचे काम रास्ट्रभाषा म्हणुन हिंदी करते तर रास्ट्रभाषा, रास्ट्रवाद ,रास्ट्रध्वज हे तिन मानबिंदु असल्याने हिंदिला महत्वपूर्ण स्तान भारतात असल्याचे मनोगत आदर्श ,सेवानिवृत्त शिक्षक श्री.पी. डी. सुरडकर यांनी हिंदी दिनानिमित्त येथिल ज्ञानविकास प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात केले.
श्री. सुरडकर यांनी 'तू है हिंदी मेरी तू है मेरी जान है!
सारे जग मे तु भारत की पहचान है!
या कवितेच्या ओऴी तालासुरात गाऊन मुलाना उत्साहित केले.
पुढे बोलतानी श्री. सुरडकर म्हणाले की ,हिंदी साहित्याचा इतिहास खुप जुना असुन त्याला संत कबिर, तुलसिदास तर आधुनिक तत्वज्ञानी निरज यांचा संदर्भ येतो. यावेऴी त्यानी विविध हिंदी लेखक, कवी, साहित्यतज्ञानचा संदर्भ देत हिंदि विषयात रुची वाढेल याकरिता विद्यार्थी, शिक्षकानचे उदबोधन केले.
भारतीय संविधानाने 14 सप्टेंबर 1949 रोजी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा दिला.म्हणून दरवर्षी आपण 14 सप्टेंबर या दिवशी हिंदी दिवस साजरा करतो. हिंदी भाषा भारतात अनेकते मधून एकतेला प्रस्थपित करणारी मुख्य भाषा म्हणून ओळखली जाते.
हिंदी दिनानिमित्त 'हिंदीका व्यावहारिक जिवन मे महत्व ' या विषयावर आयोजित निबंध स्पर्धेत प्राथमिक गटातून (इ.5 वी ते 7 वी) प्रथम येणारी अपर्णा पोपट वाघ 301,द्वितीय मदार सोहेल 201,तृतीय पठाण रेहान खान 101रु यांना रोख बक्षिसे देण्यात आली. तसेच माध्यमिक गट (इ.8 वी ते10 वी) मधून प्रथम येणारी स्वाती आग्रे 301, द्वितीय भावेश काकडे 201, तसेच तृतीय आरती साळवे हिला 101रु देण्यात आले.
तसेच 'शालेयस्तरपर छात्रोको मिलनेवाले अंतर्गत गुण हानिकारक या लाभकारक' या विषयावर घेण्यात आलेल्या वादविवाद स्पर्धामध्ये प्राथमिक गटातून प्रथम येणाऱ्या गणेश मरमट याला बक्षीस म्हणून 301 रु, द्वितीय अपर्णा वाघ हिला 201,आणि तृतीय येणाऱ्या उमेश नेव्हारे याला 101 रु.दिले गेले.
तसेच माध्यमिक गटातून प्रथम येणारी शिवानी शिंदे हिला 301, द्वितीय कावेरी गोंगे 201,आणि तृतीय निकिता पंडितला 101 रु. दिले गेले.
या स्पर्धेत नंदिनी शिंदे, नेतल सोनसिंग राठोड, मयुरी प्रकाश काकडे,दिनेश काकडे,दिव्या चिकणे, वैष्णवी जल्हाऱ, रोहिणी शिंदे,निकिता बारवाल,चंचल थोरात, निकिता राजपूत,सोनल महाजन,रोहित वाणी,ऋषिकेश मनगटे,दीपाली साळवे इ.विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाचे परीक्षण सहशिक्षक श्री. सोनवणे ए.डी, सोनोने डी. एम. व श्रीमती टाकळकर ए. पी. यांनी केले. तर सूत्रसंचालन श्री. गव्हाणे व्हि. एच. यांनी आणि शेवटी आभार शाळेचे मुख्याध्यापक श्री. जाधव आर.एस. यांनी केले.
कार्यक्रम यशस्वितेसाठी शिक्षकवृंद, शालेय वाहन चालक मालक, पालक हजर होते.
Post a Comment