सिल्लोड ( प्रतिनिधी ) दि.14, दीनदयाळ अंत्योदय योजना , राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत सिल्लोड नगर परिषद अंतर्गत शहरातील महिला बचत गटांना प्रति गट 10 हजार या प्रमाणे फिरता निधी चे वाटप माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष केशवराव तायडे, नगराध्यक्षा राजश्री निकम, उपनगराध्यक्ष अब्दुल समीर,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अर्जुन गाढे, उपसभापती तथा नगरपरिषदेचे गटनेता नंदकिशोर सहारे, संचालक दामुअण्णा गव्हाणे, शिवसेना तालूका प्रमुख किशोर अग्रवाल, जिल्हा परिषद सदस्या सीमा गव्हाणे , मुख्याधिकारी सय्यद रफिक, आदींची प्रमुख उपस्थिती होती.
सिल्लोड नगर परिषदेच्या वतीने महिला बचत गटाच्या माध्यमातून सबलीकरण व सक्षमीकरणा चे काम अविरतपणे सुरू आहे. बचत गटांच्या माध्यमातून आर्थिक बचत आणि त्यातून होणारे फायदे तसेच यासाठी सरकार कडून मिळत असलेल्या सुविधांसाठी नगर परिषदेच्या वतीने महिलांमध्ये जनजागृती करण्यात येते.
दीनदयाळ अंत्योदय योजना , राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत शहरातील महिला बचत गटांना यापूर्वी 19 आणि शुक्रवार ( दि.13 ) रोजी 13 अशा एकूण 32 महिला बचत गटांना प्रति गट 10 हजार रुपये या प्रमाणे 3 लाख 20 हजार रुपयांचा फिरता निधी माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते वाटप करण्यात आला आहे.
कार्यक्रमास नगरसेवक शकुंताबाई बन्सोड, शंकरराव खांडवे, आसिफ बागवान, विठ्ठल सपकाळ, शेख बाबर, सुनील दुधे,मतीन देशमुख, रातनकुमार डोभाळ, जुम्मा खा पठाण, सुधाकर पाटील, अनिस कुरेशी, प्रशांत क्षीरसागर, सत्तार हुसेन, राजू गौर, आरेफ पठाण, जितू आरके, मोईन पठाण, मनोज झंवर, अकील वसईकर ,सांडू मिर्झा, रईस मुजावर, शेख मोहसीन, शेख सलीम , उपमुख्याधिकारी अजहर पठाण, प्रकल्प समनव्यक देवेंद्र सूर्यवंशी, समुदाय संघटक हरीश पैठणे, सुनीता श्रीखंडे ( आरके ) यांच्यासह महिला बचत गटांचे पदाधिकारी , सदस्य व महिला पुरुषांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Post a Comment