सिल्लोड, : डेंग्यु सदृश आजराने दोन महिलांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना तालुक्यातील वडाळा येथे घडली. डेंग्यु सदृश आजराची लागन झालेल्या महिलांवर औरंगाबाद घाटी रुग्णालयात उपचार सुरु असतांना एका महिलेचा शनिवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास, तर दुसऱ्या महिलेचा रात्री 8 वाजेच्या सुमारास मृत्यू झाला.
दैवशाला साेमिनाथ शेळके (22), कडूबाई शेषराव मानकर (50) दोघे रा. वडाळा असे मृत्यू झालेल्या महिलांची नावे आहेत.
या बाबत अधिक माहिती अशी की, वडाळा गावात डेंग्यु सदृश तपाची लागन झाल्याने अनेक रुग्ण तापाने फणफणत होते. ही माहिती आमठाणा आरोग्य केंद्राला दिल्याने तेथील आरोग्य पथकाने सहा- सात दिवसांपूर्वी गावात येऊन रुग्णांवर उपचार केले व दोन- तीन दिवसांनी परत येऊ म्हणून गेले. यानंतर तापाची लागन वाढतच गेली व आरोग्य पथक ही फिरकले नाही. यामुळे लागन झालेल्या वरील दोन महिलांना तीन दिवसांपूर्वी औरंगाबाद घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यात रुख्मणबाई या महिलेचा शनिवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास तर कडूबाई या महिलेचा रात्री 8 वाजेच्या सुमारास उपचार दरम्यान मृत्यू झाला.
याच गावातील साक्षी साईनाथ शेळके (19), किरण सुधाकर शेळके (6) या दोन मुलांना ही या आजाराची लागन झाल्याने त्यांच्यावर औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे कळते.
गावात तापाची लागन झाल्याची माहिती देऊन ही आरोग्य विभागाने गांभीर्याने घेतले नाही. एकदा उपचार करुण गेलेले पथक त्यानंतर फिरकलेच नाही. यामुळे लागन वाढत गेली. आरोग्य विभागाने वेळीच दखल घेतली असती तर कदाचित महिला दगावल्या नसत्या.-
शिवाजी शेळके, उपसरपंच, वडाळा
आरोग्य केंद्राच्या पथकाने गावात जाऊन रुग्णांवर उपचार केले. गावा शेजारी गाजर गवत तसेच गटार तुंबल्याचे पथकास निदर्शनास आले होते. यामुळे ग्रामपंचायत कार्यालयाला परिसर स्वच्छ करण्याचे लेखी पत्र ही दिले होते. रविवारी सकाळीच गावात रुग्णवाहिकेसह डॉक्टरांचे पथक जाणार आहे
डॉ. योगेश राठोड वैद्यकीय अधिकारी आरोग्य केंद्र आमठाणा.
Post a Comment