Latest Post

आवाजाची मर्यादा व अन्य नियमांचे पालन मात्र सर्व मंडळांना करावेच लागेल, अन्यथा पोलिसी कारवाई होईल. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली
पुणे : गणेश मंडळांना यंदाच्या वर्षी त्यांचे देखावे रात्री १२ पर्यंत खुले ठेवण्याची परवानगी दोन दिवसांनी वाढवून देण्यात आली. यापुर्वी फक्त ४ च दिवस देखावे रात्री १२ पर्यंत खुले ठेवता येत होते. आता ७ ते १२ सप्टेंबरपर्यंत म्हणजे ६ दिवस देखावे रात्री १२ वाजेपर्यंत खुले ध्वनीवर्धकासहित खुले ठेवता येतील. आवाजाची मर्यादा व अन्य नियमांचे पालन मात्र सर्व मंडळांना करावेच लागेल, अन्यथा पोलिसी कारवाई होईल. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली. गणेशोत्सवाच्या आधी दोन वेळा पुण्यात येऊन गेलो. काही सार्वजनिक मंडळांच्या कार्यक्रमास उपस्थित होते. देखावे तयार करायचे व रात्री १० वाजताच बंद करायचे याबाबत मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी दिसली. त्यामुळे प्रशासनाबरोबर बोलून दिवस वाढवून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, ध्वनीवर्धकाची मर्यादा तसेच अन्य नियम पाळावेच लागतील असे ते म्हणाले.किती मर्यादापर्यंत आवाज ठेवायचा याबाबत सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले आहेत. त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलिसांवर टाकण्यात आली आहे. ती त्यांनी पार पाडली नाही तर त्यांच्यावर कारवाई होईल असेही न्यायालयाच्या आदेशात म्हटले आहे. त्यामुळे आवाजाची मयार्दा कमी ठेवावीच लागेल अन्यथा पोलिस कारवाई करतील असेही, पाटील यांनी सांगितले.पुणे : गणेश मंडळांना यंदाच्या वर्षी त्यांचे देखावे रात्री १२ पर्यंत खुले ठेवण्याची परवानगी दोन दिवसांनी वाढवून देण्यात आली. यापुर्वी फक्त ४ च दिवस देखावे रात्री १२ पर्यंत खुले ठेवता येत होते. आता ७ ते १२ सप्टेंबरपर्यंत म्हणजे ६ दिवस देखावे रात्री १२ वाजेपर्यंत खुले ध्वनीवर्धकासहित खुले ठेवता येतील. आवाजाची मर्यादा व अन्य नियमांचे पालन मात्र सर्व मंडळांना करावेच लागेल, अन्यथा पोलिसी कारवाई होईल. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली. गणेशोत्सवाच्या आधी दोन वेळा पुण्यात येऊन गेलो. काही सार्वजनिक मंडळांच्या कार्यक्रमास उपस्थित होते. देखावे तयार करायचे व रात्री १० वाजताच बंद करायचे याबाबत मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी दिसली. त्यामुळे प्रशासनाबरोबर बोलून दिवस वाढवून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, ध्वनीवर्धकाची मर्यादा तसेच अन्य नियम पाळावेच लागतील असे ते म्हणाले.किती मर्यादापर्यंत आवाज ठेवायचा याबाबत सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले आहेत. त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलिसांवर टाकण्यात आली आहे. ती त्यांनी पार पाडली नाही तर त्यांच्यावर कारवाई होईल असेही न्यायालयाच्या आदेशात म्हटले आहे. त्यामुळे आवाजाची मयार्दा कमी ठेवावीच लागेल अन्यथा पोलिस कारवाई करतील असेही, पाटील यांनी सांगितले

जळगाव/ धुळे  - राज्यातील राजकारणात गाजलेल्या जळगाव घरकुल घोटाळ्याप्रकरणी माजी सुरेशदादा जैन, प्रदीप रायसोनी यांच्यासह 48 आरोपींना धुळे न्यायालयाने दोषी ठरवले आहे. सर्व आरोपींना ताब्यात घेण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहे.  दरम्यान, आज दुपारी धुळे न्यायालयामध्ये सर्व आरोपींना शिक्षा सुनावण्यात येईल.

राहुरी प्रतिनिधी,
सबका साथ सबका विकास, सबका विश्वास हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ब्रीदवाक्य असल्याने ते भारतीय राज्यघटना व वंचितांच्या आरक्षणाला कदापि हात लावणार नाहीत, असा विश्वास केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे.
          तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अहमदनगर जिल्ह्याच्या वतीने व सुरेंद्रभाऊ थोरात मित्र मंडळाच्या वतीने आठवले व इतर मान्यवरांचा भव्य नागरी सत्कार व कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सचिव श्रीकांत भालेराव हे होते. नामदार आठवले म्हणाले, महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात महापुराने हाहाकार माजवला आहे. मात्र नगर जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याचे चित्र आहे. हे महायुतीचे शासन सर्वांची काळजी घेणारे शासन आहे. याबाबत कोणीही चिंता करण्याचे कारण नाही. रिपाइंचा गावा गावांमधील कार्यकर्ता हा बहुजन वंचित समाजाला बरोबर घेऊन जाणार आहे. त्यामुळेच आज केंद्रात व राज्यात सरकारमध्ये आम्हाला मानाचे स्थान आहे. कोणतीही निवडणूक लढवायची असेल तर दलितां बरोबर बहुजन व मराठा समाजाला देखील सोबत घेऊन आमचे कार्यकर्ते चालत आहेत. बहुजन दलित व मराठा एकत्र आल्यास कोणाचीही दानादान उडवण्याची ताकत रिपाइंच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला मानणारे आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, ही मागणी आम्ही देखील केली होती. या समाजामध्ये आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणारे अनेक कुटुंब आहेत. येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीला नक्कीच पराभवाला सामोरे जावे लागणार आहे. असे त्यांनी यावेळी सांगितले. श्रीरामपूर विधानसभा मतदार संघाबाबत बोलताना ते म्हणाले कि, या मतदार संघांमध्ये अनेकजण रिपाईकडून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. सुरेंद्र थोरात यांचे वडील पहिल्यापासून आमच्याबरोबर राहिले आहे. सुरेंद्र देखील जिल्हाध्यक्ष म्हणून चांगले काम करीत आहेत. याबाबत योग्य वेळी निर्णय घेऊ. हरेगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्यासाठी जागेच्या केल्या गेलेल्या प्रस्तावाच्या संदर्भामध्ये शिफारस करणार आहे. तसेच इंग्लंड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक कोणत्याही परिस्थितीत केले जाणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. म्हाडाचे नाशिक विभागाचे अध्यक्ष शिवाजीराव ढवळे म्हणाले, रिपाइं एका जाती पूर्ती मर्यादित नाही. हे सुरेंद्र थोरात यांनी आपल्या कामातून दाखवून दिले आहे. रिपाइंची मोठी ताकत श्रीरामपूर मतदार संघांमध्ये वाढल्यामुळे याठिकाणी पक्षाचा आमदार निवडून येऊ शकतो. हा मतदार संघ शिवसेनेकडे आहे मी या पक्षाचा कार्यकर्ता आहे. मात्र तडजोड होऊन हा मतदार संघ रिपाइंला मिळाला तर एकलव्य संघटना पूर्ण ताकतीने रिपाइंच्या उमेदवाराच्या मागे उभी राहील. 
         यावेळी कार्यक्रमाचे आयोजक व रिपाईचे जिल्हाप्रमुख सरेंद्र थोरात म्हणाले कि, नामदार आठवले यांनी या मेळाव्यास येऊन मनाचा मोठेपणा दाखवला आहे. रिपाई या मतदार संघामध्ये सर्व जाती धर्माच्या नागरिकांच्या समस्या सोडवण्यात अग्रेसर असल्याने या मतदार संघांमध्ये पक्षाची ताकत वाढलेली आहे. त्यामुळे नामदार आठवले यांनी या मतदार संघात आपला उमेदवार उभा करावा. त्याला नक्कीच निवडून आणू असा विश्वास व्यक्त केला. यावेळी नामदार रामदास आठवले, म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव ढवळे, चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश भांड, राजाभाऊ अहिरे यांच्यासह सत्कार मूर्तीचा एकत्रितपणे पुष्पहार देऊन सन्मान करण्यात आला. श्रीकांत भालेराव, विजय वाकचौरे, काकासाहेब खंबाळकर, दीपक गायकवाड, श्रावण वाघमारे, शाम गोसावी, नगर दक्षिण जिल्हाप्रमुख सनील साळवे, भीमराज बागूल, दिनकर धीवर, बाळासाहेब जाधव, तालुकाध्यक्ष विलास नाना साळवे, विजय जगताप, संजय कांबळे, प्रकाश लोंढे, पवन साळवे, गोविंद दिवे आदींसह मान्यवरांची भाषणे झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अहमदनगर जिल्हा रिपाई व सुरेंद्र थोरात मित्र मंडळ यांनी विशेष परिश्रम घेतले. तर सूत्रसंचालन पत्रकार रफिक शेख व श्रीकांत जाधव यांनी केले.

आ.अब्दुल सत्तार यांच्या हस्ते महिला बचत गटांना फिरता निधीचे वाटप ;
सिल्लोड (प्रतिनिधी)दि 29
बचत गटांच्या माध्यमातून महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याची गरज असल्याचे मत माजीमंञी आ. अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केले. सिल्लोड शहरातील राजश्री शाहू महाराज मंगल कार्यालयात दीनदयाळ अंत्योदय योजना - राष्ट्रीय नागरी उपजीविका अंतर्गत शहरातील एकोणाविस महिला बचत गटांना प्रत्येकी दहा हजार रुपयांचा फिरता निधीचे वाटप करण्यात आले, यावेळी माजीमंञी आ.अब्दुल सत्तार बोलत होते. नगरपरिषद अंतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी नगराध्यक्षा राजश्री निकम ,गटनेते नंदकिशोर सहारे,मुख्याधिकारी सय्यद रफिक,डाँ. मोरे, नगरसेवक विठ्ठलराव सपकाळ, राजु गौर, सुधाकर पाटील, सत्तार हुसैन, राम कटारिया, संजय फरकाडे, चांद मिर्झा, आरेफ पठाण, माणसिंग राजपूत, संदीप पाटील, गोलू कटारिया, सुशिल गोसावी, गणेश डकले आदी मान्यवरांसह बचत गटांच्या महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवेंद्र सुर्यवंशी यांनी केले.

सामूहिक बलात्कार प्रकरण:तपास अहवाल सादर करण्याचे महिला आयोगाचे पोलिसांना आदेश 
मुंबई:चेंबूर सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या मृत्यूनंतर या प्रकरणाची दखल राज्य महिला आयोगाने घेतली.
चेंबूर सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या मृत्यूनंतर या प्रकरणाची दखल राज्य महिला आयोगाने घेतली.  या प्रकरणाचा तपास अहवाल शनिवारी सादर करा, असे आदेश आयोगाने चुनाभट्टी पोलिसांना दिले. गुन्ह्य़ात हत्येचे कलम जोडण्याची सूचनाही आयोगाने पोलिसांना केली.

जालना येथून दोन महिन्यांपूर्वी मुंबईत नातेवाईकांकडे वास्तव्यास आलेल्या १९ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याचा गुन्हा चुनाभट्टी पोलीस ठाण्यात दाखल आहे. दुर्धर आजाराने प्रकृती खालावली म्हणून या तरुणीला औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले.  या तरुणीवर लैंगिक अत्याचार घडल्याचे तेथील डॉक्टरांच्या तपासणीत आढळले. तरुणीने आपल्यावर ७ जुलैला चेंबूर परिसरातील चार तरुणांनी सामूहिक बलात्कार केल्याचे सांगितले. त्यानंतर या प्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून नंतर ते चुनाभट्टी पोलिसांकडे वर्ग केले गेले.

दोन दिवसांपूर्वी तरुणीचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांवर आरोप, टीकेची झोड उठली. संशयित तरुणांची नावे देऊनही पोलिसांनी त्यांना अटक केलेली नाही, असा आरोप तरुणीच्या कुटुंबाने केला, तर राजकीय पक्षांनी मोर्चे काढून निषेध नोंदवला.

प्रत्यक्षात हा गुन्हा चुनाभट्टी पोलिसांकडे  वर्ग झाल्यावर एक पथक औरंगाबादला तरुणीचा जबाब नोंदवण्यासाठी रवाना झाले. मात्र तोपर्यंत तरुणी बेशुद्धावस्थेत गेली होती. ती शुद्धीवर आलीच नाही. त्यामुळे पोलीस तिचा जबाब घेऊ शकले नाहीत. गुन्हा दाखल झाल्याचे आणि तिच्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती तिने प्रकृती खालावलेल्या अवस्थेत वडिलांना दिली. त्यांनी सर्व माहिती पोलिसांना दिली. ज्या संशयित तरुणांवर कुटुंबाने आरोप केले ते घटना घडली त्या वेळी इतरत्र असल्याचे आढळले, असे पोलिसांचे म्हणने आहे.
दरम्यान, या प्रकरणी महिला आयोगाने शुक्रवारी पोलिसांना नोटीस बजावत तपास अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. हत्येचे कलम जोडण्याबरोबरच तरुणीच्या कुटुंबाला मनोधैर्य योजनेतील तरतुदींनुसार आर्थिक साहाय्य मिळावे यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करावा, अशा शिफारशी केल्या आहेत.
मोर्चा, रास्तो रोको : पोलिसांनी  आरोपींना अटक केली नसल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसने चुनाभट्टी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. त्यात खासदार सुप्रिया सुळे, आमदार विद्या चव्हाण, पक्षाचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक सहभागी झाले होते. त्यानंतर खासदार सुळे यांनी पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले आणि आरोपींना त्वरित अटक करण्याची, त्याचबरोबर तरुणीच्या कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली. तसेच शुक्रवारी संध्याकाळी सामाजिक, राजकीय संघटनांनी शीव-पनवेल महामार्गावर आंदोलन केले. यावेळी रास्ता रोकोचा प्रयत्न करण्यात आला. पीडीत तरुणीच्या नातलगांनीही गुरुवारी आंदोलन केले होते.


श्रीरामपूर (प्रतिनिधी) पक्षातून जे गेले त्यांच्याबद्दल विचार करण्याची गरज वाटत नाही, असा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री खा. शरद पवार यांनी पक्ष सोडून गेलेल्यांना लावला. श्रीरामपूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या विद्या संकुलातील विविध इमारतींचे उद्घाटन व नामकरण सोहळा त्यांच्या हस्ते संपन्न झाला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. ते म्हणाले की, विधानसभेत असताना पक्षातून एकावेळी 60 लोकांपैकी 52 लोक मला सोडून गेले होते. परंतु तरीही मी पुन्हा उभा राहिलो. लोकशाहीत कुणी कुठेही जाऊ शकतो. त्यामुळे जे गेले त्याबद्दल आता विचार करण्याची गरज नाही राज्यात वाढलेली बेरोजगारी, देशात निर्माण झालेली आर्थिक मंदीची लाट, शेतकर्‍यांचे विविध प्रश्‍न दारिद्य्र या मुलभूत प्रश्‍नांना बगल देऊन जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे, मात्र यावेळी जनता बळी पडणार नसल्याचे त्यांनी सांगितले. देशात मोठ्या प्रमाणावर आर्थिक मंदी निर्माण होत आहे. अनेक बड्या कंपन्यांनी कामगार कमी करण्याचे सत्र सुरू केले आहे. परंतु सत्ताधारी सांगतात की, परिस्थिती चांगली आहे परंतु बँकींग क्षेत्रातून काही लाख कोटी बाजूला काढण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. सरकार नोकर्‍यांपाठोपाठ उद्योगही बंद पाडण्याच्या मार्गावर आहे. परंतु ही स्थिती भयावह आहे. आर्थिक मंदी संदर्भात वेळ पडल्यास आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही श्री. पवार म्हणाले विधानसभेच्या जागा वाटपाबाबत त्यांना विचारले असता 120 राष्ट्रवादी, 120 काँग्रेस व 48 मित्रपक्ष या फॉर्म्युल्यावर आमची चर्चा सुरू आहे. जनतेच्या प्रश्‍नावर लढा देण्यासाठी सर्वांना बरोबर घेऊन जाणार असल्याचे ते म्हणाले. घाटमाथ्यावरून समुद्राला जाणारे पाणी वळविण्याचा निर्णय चांगला आहे, पण त्यासाठी लागणारी पुरेशी वीज महाराष्ट्रात उपलब्ध नाही. हे सर्व करताना तज्ज्ञांच्या मतांचा विचार झाला पाहिजे, असेही खा. पवार म्हणाले.
अन् शरद पवार भडकले! सध्या अनेक आमदार व मोठे नेते वेगवेगळ्या कारणांमुळं राष्ट्रवादीला रामराम ठोकून सत्ताधारी भाजप-शिवसेनेच्या तंबूत जात आहेत. वर्षानुवर्षे पवारांना साथ देणार्‍या दिग्गज नेत्यांचाही यात समावेश आहे. पवारांचे नातेवाईक असलेले पद्मसिंह पाटील हेही भाजपच्या वाटेवर आहेत. याच अनुषंगानं श्रीरामपूर येथील पत्रकार परिषदेत त्यांना प्रश्न विचारला गेला. या प्रश्नामुळं शरद पवार भडकले. इथं नातेवाईकांचा प्रश्न येतोच कुठं? असे प्रश्न तुम्ही कसे काय विचारू शकता? तुम्ही माफी मागा, असं म्हणत थेट निघून जाऊ लागले. मात्र, सोबतच्या नेत्यांनी त्यांना व प्रश्न विचारणार्‍या पत्रकाराला शांत केले. त्यानंतर पवार पुन्हा बसले. किमान सभ्यता न पाळणार्‍या लोकांना तुम्ही बोलवत जाऊ नका आणि त्यांना बोलवायचं असेल तर मला बोलवू नका, असं त्यांनी उपस्थितांना सुनावलं. आपण गेलात तर बरं होईल, असंही पवारांनी संबंधित पत्रकाराला हात जोडून सांगितलं.

अहमदनगर / राहुरी (प्रतिनिधी)  राहुरी येथील प्रथितयश डॉक्टर भास्कर रखमाजी सिनारे यांनी नगरचे एम्स हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉ. निलेश विश्‍वास शेळके, नगर अर्बन बँकेचे चेअरमन व माजी खा. दिलीप गांधी, सीए विजय मर्दा, निर्मल एजन्सीचे योगेश मालपाणी, नगर अर्बन बँकेचे तत्कालीन संचालक प्रदीप पाटील व अन्य अधिकारी यांच्या विरोधात नगर कोतवाली पोलीस ठाण्यात संगनमताने व पूर्वनियोजित कट कारस्थानाने कर्ज प्रकरणासाठी विश्‍वासाने स्वाक्षर्‍या घेऊन दिलेल्या कागदपत्रांचा गैरवापर करून बनावट कर्जप्रकरण करत अंदाजे 30 कोटी रुपयांचा अपहार करून फसवणूक केल्याची तक्रार केल्याने नगर अर्बन बँकेच्या संचालक मंडळात खळबळ उडाली आहे.तक्रारीत डॉ. सिनारे यांनी म्हटले, महाविद्यालयीन शिक्षणापासून सन 1990 पासून डॉ. निलेश शेळके यांच्याशी माझ्यासह डॉ. रवींद्र कवडे, डॉ. विनोद श्रीखंडे, डॉ. शशांक मोहळे आदींचे मैत्रीपूर्ण संबंध होते. यातूनच आम्ही डॉ. शेळके यांच्यासमवेत नगर शहरात जमिनीचे व्यवहार केले होते. सन 2008 मध्ये डॉ. शेळके यांनी नगर शहरात एम्स हॉस्पिटल सुरू करण्यासाठी आम्हाला बरोबर घेऊन ड्रीम इन्व्हेस्टमेंट या नावाने जागा खरेदी केली होती. यासाठी नगर अर्बन बँकेकडून डॉ. शेळके यांनी कर्जही घेतले होते. एम्समध्ये आम्हा चौघांसह एकूण 20 जणांना 30 लाख रुपये घेऊन डॉ. शेळके यांनी भागीदार करून घेतले होते. सन 2014 साली यासाठी शहर सहकारी बँकेने साडेसात कोटी रुपये कर्ज ट्रान्सफर करून घेतले. हॉस्पिटलचे काम पूर्ण झाल्यानंतर सन 2014 साली अद्यावत मशिनरी घेण्यासाठी अर्बन बँकेचे चेअरमन गांधी यांच्याशी कर्जाबाबत चर्चा झाल्याचे सांगून बँकेचे अधिकारी प्रदीप पाटील यांना कर्ज अर्ज घेऊन आमच्याकडे पाठविले होते. त्याचवेळी कोर्‍या कर्ज अर्जावर आमच्या स्वाक्षर्‍या घेतल्या. त्यानंतर आम्ही कधीही बँकेत गेलो नाही, किंवा बँकेनेही बोलावले नाही. तसेच डॉ. शेळके यांच्या घरगुती कारणावरून हॉस्पिटल चालू होणे लांबणीवर पडले होते. त्यामुळे मशिनरी घेणे, इतर कर्ज वितरित होण्याची प्रक्रियाही थांबली होती. एम्सबाबत खरेदी कर्ज व अन्य बाबी डॉ. शेळके हेच बघत होते दि. 10 फेब्रुवारी 2016 रोजी अर्बन बँकेकडून कर्ज थकबाकीबाबत नोटीस मिळाली. त्यामुळे आम्ही याबाबत डॉ. शेळके व बँकेकडे चौकशी केली असता कर्ज परस्पर वितरित केल्याचे समजले. बँकेकडे वेळोवेळी कागदपत्रांची मागणी केली असता हा प्रश्‍न आम्ही व डॉ. शेळके सोडवू. त्यांनी काही रक्कम खात्यात भरली असल्याचे सांगितले.बँकेने आमच्या नावे एकूण 18 कोटी रुपये वितरित केल्याचे समजले. आमच्या पत्नीच्या नावेही शहर बँकेकडून नोटीस आल्याने या दोन्ही बँकेकडून कर्ज घेतल्याचे समजते. त्यानंतर अर्बन बँक तसेच शहर बँकेच्या संचालकांनी डॉ. शेळके यांच्याबरोबर बैठक घेऊन हॉस्पिटल विकण्याचा सल्ला दिला. त्यातून सर्व कर्जप्रकरणे मिटविण्याचे आश्‍वासन दिले. आम्हास विश्‍वासात घेऊन एम्स विकण्याचा व्यवहार पूर्ण करण्यात आला. खरेदीसाठी दोन्ही बँकेने एकत्रित 14 कोटी रुपयांचा कर्जपुरवठा करून काही रक्कम अर्बनच्या खात्यावर भरून घेण्यात आली. या व्यवहारात एकूण 7 कोटी रुपयांची फसवणूक डॉ. शेळके यांनी केली माहिती अधिकारात कर्ज कागदपत्रांची मागणी केल्यानंतर बँकेचे पदाधिकारी, डॉ. शेळके, विजय मर्दा, दिलीप गांधी यांनी कर्ज प्रकरणातील कागदपत्रांचा वापर करून कर्ज रकमेचा अपहार केल्याचे निदर्शनास आले सर्व रक्कम डॉ. शेळके यांनी स्वतःच्या फायद्याकरीता वापरली आहे. दि. 28 मे 2014, दि. 22 मे 2014 असे मिळून पाच कोटी निर्मल एजन्सी या मशिनरी डिलरला दिल्याचे बनावट कागदपत्र बनविले आहेत. मात्र, मशिनरी रूग्णालयाला न देता या रकमेचा अपहार करण्यात आला आहे. कर्ज प्रकरणासाठी डॉ. शेळके यांनी अर्बनचे कर्मचारी, अधिकारी, दिलीप गांधी यांच्या संगनमताने परस्पर कर्ज वितरित करून निर्मल एजन्सी यांच्या खात्यात विनापरवानगी जमा केली. ही रक्कम अशोक बँकेत वर्ग करून आम्ही दिलेल्या धनादेशाचा गैरवापर करून 18 कोटींचा अपहार केलेला आहे.  या अपहाराबाबत गुरनं. 419/2018, 420/2019, 421/2018 नुसार कोतवाली पोलीस ठाण्यात दि. 26 जुलै 2017 रोजी नोंदविण्यात आला आहे. याप्रकारे डॉ. निलेश शेळके, माजी खा. गांधी, विजय मर्दा, निलेश मालपाणी, प्रदीप पाटील व अन्य अधिकारी यांनी आमची 30 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे  आर्थिक गुन्हे शाखा तपास करणार पोलिसांत तक्रार अर्ज दाखल झाल्यानंतर अर्बन बँकेच्या संचालक मंडळासह सभासदांमध्ये खळबळ उडाली आहे. अनेक संचालक गुन्हा दाखल होण्याच्या भितीने गायब होते. मात्र पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांनी हा तक्रार अर्ज स्वीकारत तो चौकशीसाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे दिला आहे. या शाखेचे उपअधीक्षक प्रांजल सोनवणे यांनी यास दुजोरा दिला असून, चौकशी केल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असे सांगितले

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget