देवळाली प्रवरा येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने भव्य नागरी सत्कार.

राहुरी प्रतिनिधी,
सबका साथ सबका विकास, सबका विश्वास हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ब्रीदवाक्य असल्याने ते भारतीय राज्यघटना व वंचितांच्या आरक्षणाला कदापि हात लावणार नाहीत, असा विश्वास केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे.
          तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अहमदनगर जिल्ह्याच्या वतीने व सुरेंद्रभाऊ थोरात मित्र मंडळाच्या वतीने आठवले व इतर मान्यवरांचा भव्य नागरी सत्कार व कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सचिव श्रीकांत भालेराव हे होते. नामदार आठवले म्हणाले, महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात महापुराने हाहाकार माजवला आहे. मात्र नगर जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याचे चित्र आहे. हे महायुतीचे शासन सर्वांची काळजी घेणारे शासन आहे. याबाबत कोणीही चिंता करण्याचे कारण नाही. रिपाइंचा गावा गावांमधील कार्यकर्ता हा बहुजन वंचित समाजाला बरोबर घेऊन जाणार आहे. त्यामुळेच आज केंद्रात व राज्यात सरकारमध्ये आम्हाला मानाचे स्थान आहे. कोणतीही निवडणूक लढवायची असेल तर दलितां बरोबर बहुजन व मराठा समाजाला देखील सोबत घेऊन आमचे कार्यकर्ते चालत आहेत. बहुजन दलित व मराठा एकत्र आल्यास कोणाचीही दानादान उडवण्याची ताकत रिपाइंच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला मानणारे आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, ही मागणी आम्ही देखील केली होती. या समाजामध्ये आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणारे अनेक कुटुंब आहेत. येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीला नक्कीच पराभवाला सामोरे जावे लागणार आहे. असे त्यांनी यावेळी सांगितले. श्रीरामपूर विधानसभा मतदार संघाबाबत बोलताना ते म्हणाले कि, या मतदार संघांमध्ये अनेकजण रिपाईकडून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. सुरेंद्र थोरात यांचे वडील पहिल्यापासून आमच्याबरोबर राहिले आहे. सुरेंद्र देखील जिल्हाध्यक्ष म्हणून चांगले काम करीत आहेत. याबाबत योग्य वेळी निर्णय घेऊ. हरेगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्यासाठी जागेच्या केल्या गेलेल्या प्रस्तावाच्या संदर्भामध्ये शिफारस करणार आहे. तसेच इंग्लंड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक कोणत्याही परिस्थितीत केले जाणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. म्हाडाचे नाशिक विभागाचे अध्यक्ष शिवाजीराव ढवळे म्हणाले, रिपाइं एका जाती पूर्ती मर्यादित नाही. हे सुरेंद्र थोरात यांनी आपल्या कामातून दाखवून दिले आहे. रिपाइंची मोठी ताकत श्रीरामपूर मतदार संघांमध्ये वाढल्यामुळे याठिकाणी पक्षाचा आमदार निवडून येऊ शकतो. हा मतदार संघ शिवसेनेकडे आहे मी या पक्षाचा कार्यकर्ता आहे. मात्र तडजोड होऊन हा मतदार संघ रिपाइंला मिळाला तर एकलव्य संघटना पूर्ण ताकतीने रिपाइंच्या उमेदवाराच्या मागे उभी राहील. 
         यावेळी कार्यक्रमाचे आयोजक व रिपाईचे जिल्हाप्रमुख सरेंद्र थोरात म्हणाले कि, नामदार आठवले यांनी या मेळाव्यास येऊन मनाचा मोठेपणा दाखवला आहे. रिपाई या मतदार संघामध्ये सर्व जाती धर्माच्या नागरिकांच्या समस्या सोडवण्यात अग्रेसर असल्याने या मतदार संघांमध्ये पक्षाची ताकत वाढलेली आहे. त्यामुळे नामदार आठवले यांनी या मतदार संघात आपला उमेदवार उभा करावा. त्याला नक्कीच निवडून आणू असा विश्वास व्यक्त केला. यावेळी नामदार रामदास आठवले, म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव ढवळे, चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश भांड, राजाभाऊ अहिरे यांच्यासह सत्कार मूर्तीचा एकत्रितपणे पुष्पहार देऊन सन्मान करण्यात आला. श्रीकांत भालेराव, विजय वाकचौरे, काकासाहेब खंबाळकर, दीपक गायकवाड, श्रावण वाघमारे, शाम गोसावी, नगर दक्षिण जिल्हाप्रमुख सनील साळवे, भीमराज बागूल, दिनकर धीवर, बाळासाहेब जाधव, तालुकाध्यक्ष विलास नाना साळवे, विजय जगताप, संजय कांबळे, प्रकाश लोंढे, पवन साळवे, गोविंद दिवे आदींसह मान्यवरांची भाषणे झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अहमदनगर जिल्हा रिपाई व सुरेंद्र थोरात मित्र मंडळ यांनी विशेष परिश्रम घेतले. तर सूत्रसंचालन पत्रकार रफिक शेख व श्रीकांत जाधव यांनी केले.
Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget