Latest Post


येथील मुरलीधर नगर भागात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चार जणांच्या टोळीला शिताफीने पकडण्यात ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. सर्व संशयित सराईत गुन्ह्रेगार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले असून त्यांच्यावर घरफोडी, जबरी चोरी व दरोडा टाकल्याचे गुन्हे दाखल असल्याचे समजते. याप्रकरणी चारही संशयितांच्या विरोधात विविध कलमान्वये  गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे यांनी दिली. शहरातील मुरलीधर नगर भागात एक टोळी दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक पाटील, जांभळे, पोलीस हवालदार शेख, वणवे, जाधव, सुनील पवार आदीच्या पथकाने सापळा रचून शिताफीने या आरोपींना अटक केली त्यांच्याकडून दरोडा टाकण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या तलवारी चॉपरसह इतर हत्यारे व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शुभम चुनियन, दिनेश पगारे, रोशन सातभाई आणि राहुल सदे (सर्व रा,मनमाड) अशी या संशयितांची नावे आहेत त्यांच्याविरुद्ध भादवी ३९९ ,४०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व संशयित सराईत गुन्हेगार असून गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस या टोळीच्या मागावर होते..


श्रीरामपूर /प्रतिनिधी
श्रीरामपूर येथील जुनी कचेरी मिनी स्टेडियम शेजारील जागृत सूर्यमुखी हनुमान मंदिर मध्ये चौथा श्रावणी शनिवार व गोकुळाष्टमी निमित्ताने महाआरती व प्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला  व महिला मंडळाचा भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाप्रसंगी शहरातील विविध मान्यवरांच्या हस्ते महाआरती करण्यात येऊन गोरगरीब जनतेला, भक्तांना मोठ्या भक्तिभावाने मंडळाच्यावतीने खिचडीचा प्रसाद , केळी , राजगिऱ्याचे लाडू , या प्रसादाचे  वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून आशोक उपाध्ये, डॉक्टर सोनटक्के,  पत्रकार विठ्ठल गोराणे, बाबा नायर ,डॉक्टर पांडे, महाराज कंट्रोड, गणेश गुजरानि, हेमंत बोरावके ,भाऊसाहेब चोथे, छगनराव वाघ, माणिक गांधी, राजू गोसावी, अनिल डहाळे, विजय शेलार, दीपक भांड, सोमनाथ मोरे ,नाना भोसले, सचिन नागरे, रमेश निकम,विष्णू लबडे, बनसोडे दादा ,महिला मंडळ व  मंदिर देवस्थानचे अध्यक्ष सुनील डहाळे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येनेउपस्थित होते.

श्रीरामपूर/प्रतिनिधी
भैरवनाथनगर  ग्रामपंचायत हद्दीतील सूतगिरणी जिल्हा परिषद शाळेच्या मागील  भागात राहणारे सूतगिरणी कामगारांच्या मातीच्या घराची पावसामुळे  घरांची पडझड झालेली आहे  यासाठी शासनाकडून मदत  मिळावी म्हणून श्रीरामपूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी माननीय समाधान सोनवणे साहेब यांना यावेळी निवेदन देण्यात आले यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य राहुल लिहिणार, पंचायत समितीचे अधिकारी श्री सपकार साहेब सामाजिक कार्यकर्ते भागचंद नवगिरे सामाजिक कार्यकर्ते सुरेश दोडके तसेच शंकरराव औचिते छबु पठारे, वसंत पिलगर, ज्येष्ठ महिला  शांताबाई भोसले, ताराबाई औचिते, अशोक भिमराज भोसले,  व भागातील भागातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते

दिग्रस- राज्यातील २२ हजार ग्रामसेवक संवर्गाच्या प्रलंबित न्याय मागण्यासंदर्भात शासनाने कडे अनेकवेळा महाराष्ट्र राज्य ग्रासेवक युनियन शाखा दिग्रस यांनी निवेदन देऊन सुद्धा त्यांच्या मागण्या निकाली न काढल्यामुळे राज्यातील ग्रामसेवक सर्वांगाच्या दि.४ जून ते ६ ऑगस्ट च्या पत्रकाद्वारे दि.९ ऑगस्ट रोजी राज्य संघटना व जिल्हा संघटनेच्या आदेशावरून  दि.२२ऑगस्ट पासून एकदिवसीय धरणे आंदोलन पुकारून कामबंद केले असून ग्रा.पं. सचिवांचे शिक्के व चाबी पं.समितीला सादर करण्यासाठी प.स.आवारात ग्रामसेवकांनी आंदोलन पुकारले आहे.
           या आंदोलनात जि.चतुर,आत्माराम माळवे,ए.उंबरकर,डी.पेंधे,पी.खिरेकार,एन.ठाकरे,जी.अन्नपूर्णे,डी.राऊत,पी.दुधे,आर.बावणे,एस.इंगळे,एस.कातकडे,पी.देशमुख,पी.देशभ्रतार,डी.भगत,जी.पोराजवार, एन.राठोड,कहार,जी.इंगोले,ए.काजळे,पी.गावंडे, व्ही.बंगळे सह महाराष्ट्र राज्य ग्रासेवक युनियन शाखा दिग्रसचे ग्रामसेवक उपस्थित होते.

अहमदनगर जिल्ह्यात एकाच कुटुंबातील चार जणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पारनेर तालुक्यातील गुणोरे येथे ही घटना घडल्याची माहिती आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गुणोरे येथील एकाच शेतकरी कुटुंबातील चार जणांनी राहत्या घरामध्ये गळफास लावून घेत आत्महत्या केली. एकाच कुटुंबातील या चार जणांनी घरातील लोखंडी पाईपला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. बाबाजी विठ्ठल बढे (40), कविता बाबाजी बढे (35)आदित्य बाबाजी बढे (15), धनंजय बाबाजी बढे (13) अशी मृतांची नावे आहेत. शेतकरी बाबाजी बढे यांनी पत्नी आणि मुलांचा खून करून स्वतः आत्महया केल्याचा संशय व्यक्त होत आहे. बाबाजी यांची पत्नी कविता या मानसिक आजारी होत्या तर आदित्य हा दिव्यांग होता. सातवीत शिकणारा धनंजय शाळेत अतिशय हुशार होता. सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे या परिसरातून ग्रामस्थ जात असताना बाबाजी बढे यांच्या गोठ्यातील जनावरे का हंबरत आहेत म्हणून पाहिले असता घराचे दार खिडकी बंद होती. सकाळी लवकर उठणारे बढे का उठले नाही म्हणून त्यांनी घराची खिडकी उघडली असता हा प्रकार समोर आला आहे. आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत

सिल्लोड तालुक्यातील मौजे मोढा खुर्द येथे प्रधानमंत्री किसान मानधन योजना बाबत दि. *२३.०८.२०१९* रोजी मोहीम राबविण्यात आली. ही अल्प व अत्यल्प शेतकऱ्यांना लागू आहे. जी शेतकऱ्यांना सामाजिक सुरक्षा प्रधान करते.ही योजना 18-40 वयो गटातील सर्व पात्र शेतकऱ्यांना लागू आहे या योजने अंतर्गत सर्व पात्र शेतकऱ्यांना 55-200 रुपये हप्ता 1 ऑगस्ट 2019 रोजी च्या‌‌ वया नुसार आपले  आपल्या वयाच्या 60 वर्षा पर्यंत पेन्शन फंडा मध्ये जमा करावा लागणार आहे. त्या नंतर दर महा 3000 हजार रुपये प्रति महिना पेन्शन मिळणार आहे .
            या योजने संबधी असणार्या निकष अटी याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. त्यासाठी कृषी विभागाचे कृषी सहाय्यक श्री. अजय राठोड यांनी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेसह सविस्तर माहिती दिली. यावेळी CSC केंद्र चालक श्री.योगेश पंडित, सरपंच श्री.दिनेश बोराडे, उपसरपंच श्री.देविदास पंडित, माजी सरपंच समाधान साळवे, कृषी मित्र योगेश साळवे,  श्री.लक्ष्मन कल्याणकर, चेअरमन श्री.पांडुरंग पंडित, बापूसाहेब धांडे, लक्ष्मन कल्याणकर, रामलाल हासे, लतिफ पटेल एकनाथ पंडित, व ग्रामस्त या ठिकाणी मोठ्या संखेने उपस्तीत होते.

बुलढाणा - 25 अगस्त
तहसील अंतर्गत के ग्राम शेकापुर में मौजूद एक दरगाह में आज दोपहर के समय एक भालु घुस गया जिसकी खबर मिलते ही ग्रामीणों में हडकंप मच गया था.सूचना मिलते ही वनविभाग की रेस्क्यु टीम ने घटनास्थल पर पहोंच कर भालु को पिंजरे में कैद कर लिया है.
     बुलढाणा वनविभाग की जामठी बिट में आनेवाला छोटा सा गांव शेकापुर अजंता की पहाड़ियों से घिरा हुआ है.यहां घना जंगल है जिसमे तेंदुआ,भालु, लकड बग्घा जैसे हिंस्र प्राणियों के अलावा अन्य वनचरों का अधिवास है.शेकापर गांव में शेख सुल्तान बाबा की दरगाह बनी हुई है सीमेंट कॉन्क्रीट की है.आज रविवार दोपहर 3 बजे के करीब एक भालु जंगल से निकलकर दरगाह में अंदर घुस गया.इस बात की भनक ग्रामीणों को लगते ही गांव में खलबली मच गई.भालु दरगाह में पहुचकर अंदर आराम से बैठ गया जो काफी देर बाद भी बाहर नही निकलने पर ग्रामीणों ने हिम्मत जुटाते हुए भालु को कैद करने के लिए दरगाह के मुख्य दरवाजे को बंद कर दिया.इधर घटना की जानकारी बुलढाणा वनविभाग को मिलते ही रेस्क्यु टीम के वनपाल राहुल चौहान,सुधीर जगताप,समाधान मान्टे,विलास मेरत,कल्पना ढंदरे, देवीदास वाघ व चालक शेख ज़फर आदि कर्मी पिंजरा व अन्य साहित्य लेकर शेकापुर पहोंचे और दरगाह के मुख्य दरवाज़े पर पिंजरा लगाया गया तथा जामठी उपसरपंच शेख इमरान,शेकापुर वनसमिति अध्यक्ष सुरेश नरोटे, पवन तायडे, दीपक सोनुने तथा अन्य लोगो के सहकार्य से भालु को हडकाया तब भालु पिंजरे में घुसते ही पिंजरे का दरवाजा बंद कर दिया गया.फिलहाल भालु को विभागीय वन कार्यालय में लाया गया है जिसकी मेडिकल जांच के बाद वरिष्ठों के आदेश पर किसी सुरक्षित जंगल मे छोड़ दिया जाएगा.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget