श्रीरामपूर /प्रतिनिधी
श्रीरामपूर येथील जुनी कचेरी मिनी स्टेडियम शेजारील जागृत सूर्यमुखी हनुमान मंदिर मध्ये चौथा श्रावणी शनिवार व गोकुळाष्टमी निमित्ताने महाआरती व प्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला व महिला मंडळाचा भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाप्रसंगी शहरातील विविध मान्यवरांच्या हस्ते महाआरती करण्यात येऊन गोरगरीब जनतेला, भक्तांना मोठ्या भक्तिभावाने मंडळाच्यावतीने खिचडीचा प्रसाद , केळी , राजगिऱ्याचे लाडू , या प्रसादाचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून आशोक उपाध्ये, डॉक्टर सोनटक्के, पत्रकार विठ्ठल गोराणे, बाबा नायर ,डॉक्टर पांडे, महाराज कंट्रोड, गणेश गुजरानि, हेमंत बोरावके ,भाऊसाहेब चोथे, छगनराव वाघ, माणिक गांधी, राजू गोसावी, अनिल डहाळे, विजय शेलार, दीपक भांड, सोमनाथ मोरे ,नाना भोसले, सचिन नागरे, रमेश निकम,विष्णू लबडे, बनसोडे दादा ,महिला मंडळ व मंदिर देवस्थानचे अध्यक्ष सुनील डहाळे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येनेउपस्थित होते.
Post a Comment