मोढा खुर्द येथे प्रधानमंत्री किसान मानधन योजना बाबत मोहीम

सिल्लोड तालुक्यातील मौजे मोढा खुर्द येथे प्रधानमंत्री किसान मानधन योजना बाबत दि. *२३.०८.२०१९* रोजी मोहीम राबविण्यात आली. ही अल्प व अत्यल्प शेतकऱ्यांना लागू आहे. जी शेतकऱ्यांना सामाजिक सुरक्षा प्रधान करते.ही योजना 18-40 वयो गटातील सर्व पात्र शेतकऱ्यांना लागू आहे या योजने अंतर्गत सर्व पात्र शेतकऱ्यांना 55-200 रुपये हप्ता 1 ऑगस्ट 2019 रोजी च्या‌‌ वया नुसार आपले  आपल्या वयाच्या 60 वर्षा पर्यंत पेन्शन फंडा मध्ये जमा करावा लागणार आहे. त्या नंतर दर महा 3000 हजार रुपये प्रति महिना पेन्शन मिळणार आहे .
            या योजने संबधी असणार्या निकष अटी याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. त्यासाठी कृषी विभागाचे कृषी सहाय्यक श्री. अजय राठोड यांनी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेसह सविस्तर माहिती दिली. यावेळी CSC केंद्र चालक श्री.योगेश पंडित, सरपंच श्री.दिनेश बोराडे, उपसरपंच श्री.देविदास पंडित, माजी सरपंच समाधान साळवे, कृषी मित्र योगेश साळवे,  श्री.लक्ष्मन कल्याणकर, चेअरमन श्री.पांडुरंग पंडित, बापूसाहेब धांडे, लक्ष्मन कल्याणकर, रामलाल हासे, लतिफ पटेल एकनाथ पंडित, व ग्रामस्त या ठिकाणी मोठ्या संखेने उपस्तीत होते.
Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget