Latest Post

युवानेते आशुतोषदादा काळे मित्रमंडळ आयोजित दहीहंडी उत्सव कोपरगाव शहरात युवानेते आशुतोषदाद काळे व अभिनेत्री रेशम टिपणीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला.

कोपरगाव दि- 24
कोल्हापूर, सांगली सातारा तसेच कोपरगाव शहरात डेंग्यूमुळे मृत्युमुखी पडलेल्या तसेच माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना श्रद्धांजली वाहून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने कोपरगावसह, कोल्हापूर, सांगली व सातारा येथे पूरपरिस्थितीमध्ये मदत केलेल्या सर्व कोपरगावकरांचा युवानेते आशुतोषदादा काळे, अभिनेत्री रेशम टिपणीस व तहसीलदार श्री. चंद्रे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कोपरगाव शहरातील गोविंदा पथकांचा तसेच नागरिकांचा दहीहंडी उत्सवाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाला कोपरगावकरांनी अलोट गर्दी केली होती.
कोपरगावसह कोल्हापूर, सांगली व सातारा येथे महपुरामुळे झालेल्या नुकसानीत कोपरगावकरांनी सामाजिक बंधिलकीतुन मोठ्या प्रमाणावर मदत केलीच आहे पण दहीहंडी उत्सवाची आपली संस्कृती जपावी तसेच वर्षभर मेहनत करणाऱ्या गोविंदा पथकांच्या आग्रहास्तव दहीहंडी उत्सव आयोजित केला असल्याचे यावेळी युवानेते आशुतोषदादा काळे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी अभिनेत्री रेशम टिपणीस यांनी युवानेते आशुतोषदादा काळे यांनी सामाजिक बंधिकली जपत मुख्यमंत्री सहाय्यता निधीला २५ लाख रुपये दिल्याबद्दल तसेच करत असलेल्या समाजकार्याबद्दल युवानेते आशुतोषदादा काळे यांचे कौतुक केले.
युवानेते आशुतोषदादा काळे व पोलीस उपनिरीक्षक श्री. मानगावकर यांच्या हस्ते दहीहंडी फोडून दहीहंडी कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
यावेळी युवानेते आशुतोषदादा काळे मित्रमंडळाचे सर्व पदाधिकारी व सदस्य, आजी - माजी नगरसेवक, कार्यकर्ते, गोविंदा पथके व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जळगाव शहरातील देवदास कॉलनीत मध्यरात्री एकाचा दगडाने ठेचून खून झाल्याची घटना घडली याबाबत सविस्तर असे की, देविदास कॉलनी परिसरातील साईबाबा मंदिराजवळ मध्यरात्री दगडाने ठेचून श्याम शांताराम दीक्षित यांचा खून झाल्याची घटना उघड झाली आहे. ते मनसेचे शहर उपाध्यक्ष होते. दरम्यान या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. सकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास परिसरातील नागरिकांमुळे ही घटना समोर आली. याच परिसरात ते कुटुंबासह वास्तव्यास होते. मनसे कार्यकर्ते होते, तसेच ते तहसीलमध्ये काम करत असल्याची माहिती मिळाली आहे. घटनास्थळी अप्पर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके, पोलिस उपाधीक्षक डॉक्टर नीलाभ रोहन तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचाऱ्यांसह ,एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या कर्मचार्यांचा ताफा आहे


गंगापूर दि.24 :-गंगापुर तालुक्यातील ढोरेगाव येथील योगेश कृषी सेवा केंद्रांमध्ये बोगस खत आढळल्याने जिल्हा गुणनियंत्रण  पथकाकडून  गंगापूर पोलीस स्टेशन मध्ये   जीवनावश्यक कायदा अधिनियम  कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.
जिल्हा गुणनियंत्रण अधिकारी आशिष लक्ष्मीकांत काळुसे यांचे पथक ढोरेगाव येथील योगेश कृषी सेवा केंद्रामध्ये तपासणीसाठी गेले असता त्यांना एका पावतीवर  डीएपी खताची गोणी विक्री झाल्याचे नमूद होते मात्र ई पॉश मशीनची तपासणी केली असता दुकानदाराला कुठल्याही प्रकारे डीएपी खत आले नसल्याचे उघड झाले त्यामुळे संशय वाढल्याने दुकानाची तपासणी केली असता दुकानांमध्ये सम्राट फर्टीलायझर कंपनीची एक बोगस खताची गोणी आढळून आल्याने गंगापूर तालुका कृषी अधिकारी पंचायत समिती रामकृष्ण पाटील  यांच्या फिर्यादीनुसार खत विक्रेते योगेश शिंदे अंकुष दुबिले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक मच्छिंद्र  सुरवसे करत आहे


बुलडाणा - 24 ऑगष्ट
भाजपाच्या महाजनादेश यात्रे निमित्ताने शेगावात आलेले मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या वाहनातील ताफ्यात एका युवकाने आपली मोटार सायकल घुसवण्याचा प्रयत्न केला यामध्ये ताफ्यातील एक कारची त्याला जोरदार धडक बसली यात तो किरकोळ जखमी झाला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी करण्यात येत आहे.
        दुसऱ्या टप्प्यातील महाजानदेश यात्रा ही आज शनिवारी बुलढाणा जिल्ह्यातील शेगावात पोहचली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस हे श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी मंदिरात पोहचले सायंकाळी ते मंदिरातून परत येत असतांना त्यांच्या वाहनातील ताफ्यात मंदिराजवळच रस्त्याच्या दुसऱ्या बाजूकडून युवकाने आपली मोटार सायकल घुसविण्याचा प्रयत्न केला.यामध्ये ताफ्यातील एका आवाहनाची त्या युवकाच्या मोटार सायकल ला जोरात धडक बसली व युवक खाली पडला व कारच्या समोरिल चाका खाली येण्याच्या आगोदरच कार चालकाने जोरात ब्रेक दाबला त्यामुळे मोठी घटना तळली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस हे अपघातग्रस्त वाहना पासून तिसऱ्या क्रमांकाच्या वाहनात होते. युवकाच्या मोटार सायकल ला धडक बसताच ताफा अचानकपणे थांबला. घटना घडताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत युवकाला ताब्यात घेत मोटारसायकल बाजूला घेऊन ताफ्याचा रस्ता मोकळा केला. युवकाने मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात अनावधाने गाडी टाकली कि, हेतुपरस्परपणे याचा शोध पोलीस घेत आहे.


बुलडाणा - 24 ऑगष्ट
राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस आज शेगाव येथे भाजपा कडून काढण्यात आलेली महाजनादेश यात्रे निमित्ताने आले असता त्यांनी श्री गजानन महाराज मंदिरात जाऊन समाधीचे दर्शन घेतले.याप्रसंगी संस्थानचे कार्यकारी विश्वस्त निळकंठदादा पाटील यांनी मुख्यमंत्री महोदय यांचेसह सोबत असलेले अन्य मंत्र्यांचे स्वागत करून शाल श्रीफळ तसेच श्रीचा प्रसाद देऊन सत्कार केला.
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री ना. संजय धोत्रे,बुलडाणा पालकमंत्री ना.डॉ संजय कुटे, ना.गिरीष महाजन,ना. डॉ. रणजित पाटील,विदर्भ वैधानिक विकास महामंडळ अध्यक्ष ना. चैनसुख संचेती यात्राप्रमुख आ. सुमित ठाकूर,आ. आकाश फुंडकर,बुलडाणा जि.प. अध्यक्ष सौ. तायडे, भाजपा जिल्हाध्यक्ष धृपदराव सावळे,जि. प. महिला व बालकल्याण सभापती श्वेता महाले पाटील,जिल्हा सरचिटणीस संतोष देशमुख,नंदू अग्रवाल, यांचेसह अन्य स्थानिक भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते हजर होते.काही दिवसा अगोदर पश्चिम महाराष्ट्रच्या कोल्हापूर व सांगली येथे महापुर आला होता व यात कोट्यावधीचे नुकसान झाले असून श्री गजानन महाराज संस्थानकडून या पुरग्रस्तांसाठी 1 कोटी 11 लक्ष रुपयांची मदतनिधीचा धनादेश मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आला.याप्रसंगी संस्थान चे विश्वस्त मंडळीची उपस्थित होते.

बुलडाणा - 24 ऑगस्ट
आपल्या सरकारने पाच वर्षात केलेल्या विकासकामांचा आढावा जनतेसमोर मांडण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजन आदेश यात्रा आज बुलढाणा जिल्ह्यात दाखल होत असतांनाच भाजपाचे माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांचे निधन झाल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा स्थगित करण्यात आली असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यानी मलकापूर येथे घोषणा प्रसार माध्यमानशी बोलतांना केली आहे.
    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा ही दुपारी  एक वाजेच्या दरम्यान विदर्भाचा प्रवेशद्वार असलेल्या मलकापूर शहरात दाखल झाली मात्र बुलडाणा जिल्ह्याच्या सीमेत दाखल होताच माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांचे निधन झाल्याचे वृत्त समोर येताच मुख्यमंत्री फडणवीस यांनी मलकापूर येथे सभास्थळी पोहचून महाजनादेश यात्रा स्थगित करण्यात आली असल्याची घोषणा केली. यावेळी त्यांनी स्वागत सत्कार स्वीकारले नाही.तसेच त्यानी माजी केंद्रीय मंत्री स्वर्गीय अरुण जेटली यांच्या विषयी शोक संवेदना व्यक्त केल्या आणि उपस्थितासह श्रद्धांजलि अर्पण केली व पुढील सर्व कार्यक्रम स्थगित करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यानी केली. भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या निधनामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा रविवार दि. २५ ऑगस्ट रोजी पर्यंत स्थगित केली आहे. सोमवारी मूळ कार्यक्रमानुसार पाथर्डी येथून यात्रा पुढे जाईल.

बुलढाणा- 24 ऑगस्ट
आपल्या सरकारने पाच वर्षात केलेल्या विकासकामांचा आढावा जनतेसमोर मांडण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा आज बुलढाण्यात दाखल होत आहे यामुळे पोलीस प्रशासन सतर्क झाले असून या यात्रेत विरोधकांकडून कुठलेही गैरकृत्य होऊ नये यासाठी उपाययोजना म्हणून रात्रीपासून बुलडाणा जिल्ह्यातील विरोधी पक्षातील आक्रमक स्वभावच्या काही पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन स्थानबद्ध केले आहे.
     मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा ही आज 24 ऑगस्टला दुपारी बारा वाजता खान्देशातुन विदर्भाचा प्रवेशद्वार असलेल्या मलकापूर शहरात दाखल होणार आहे. येथे जाहीर सभा झाल्यानंतर नांदुरा येथे रोडशो व खामगाव आणि शेगावात त्यांच्या जाहीर सभा होणार आहेत. या जाहीर सभांमध्ये हे विरोधी पक्षातील काही मंडळींकडून निवेदने, घोषणाबाजी अथवा आंदोलने करण्याचे चिन्हे असल्याने पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. यासाठी रात्रीपासूनच जिल्हाभरात स्थानबद्ध मोहीम हाती घेण्यात आली असून रात्री युवा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत डिक्कर, रोशन देशमुख, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सोशल मीडिया सेल चे प्रमुख अमित जाधव, यांच्यासह संग्रामपूर शेगाव खामगाव आणि मलकापुरात अनेकांना पोलिसांनी स्थानबद्ध केल्याची माहिती प्राप्त झाली आहे.यामध्ये मलकापुर नगराध्यक्ष एड हरीश रावळ, मनसे जिल्हाध्यक्ष गजानन ठोसर,अनिल बगाले,प्रहार जिल्हा उपाध्यक्ष अजय टप,रंजीत डोसे, शाकिर खान,किसान ईश्वर खराटे सहित शेगाव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अमित जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या नंदा पाऊलझगडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शहराध्यक्ष गोपाल तायडे, प्रहार संघटनेचे शहराध्यक्ष निलेश घोंगे आकाश पाऊलझगडे, सागर पाऊलझगडे आदींचा समावेश आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget