बुलडाणा - 24 ऑगष्ट
भाजपाच्या महाजनादेश यात्रे निमित्ताने शेगावात आलेले मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या वाहनातील ताफ्यात एका युवकाने आपली मोटार सायकल घुसवण्याचा प्रयत्न केला यामध्ये ताफ्यातील एक कारची त्याला जोरदार धडक बसली यात तो किरकोळ जखमी झाला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी करण्यात येत आहे.
दुसऱ्या टप्प्यातील महाजानदेश यात्रा ही आज शनिवारी बुलढाणा जिल्ह्यातील शेगावात पोहचली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस हे श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी मंदिरात पोहचले सायंकाळी ते मंदिरातून परत येत असतांना त्यांच्या वाहनातील ताफ्यात मंदिराजवळच रस्त्याच्या दुसऱ्या बाजूकडून युवकाने आपली मोटार सायकल घुसविण्याचा प्रयत्न केला.यामध्ये ताफ्यातील एका आवाहनाची त्या युवकाच्या मोटार सायकल ला जोरात धडक बसली व युवक खाली पडला व कारच्या समोरिल चाका खाली येण्याच्या आगोदरच कार चालकाने जोरात ब्रेक दाबला त्यामुळे मोठी घटना तळली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस हे अपघातग्रस्त वाहना पासून तिसऱ्या क्रमांकाच्या वाहनात होते. युवकाच्या मोटार सायकल ला धडक बसताच ताफा अचानकपणे थांबला. घटना घडताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत युवकाला ताब्यात घेत मोटारसायकल बाजूला घेऊन ताफ्याचा रस्ता मोकळा केला. युवकाने मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात अनावधाने गाडी टाकली कि, हेतुपरस्परपणे याचा शोध पोलीस घेत आहे.
Post a Comment