बुलडाणा - 24 ऑगष्ट
राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस आज शेगाव येथे भाजपा कडून काढण्यात आलेली महाजनादेश यात्रे निमित्ताने आले असता त्यांनी श्री गजानन महाराज मंदिरात जाऊन समाधीचे दर्शन घेतले.याप्रसंगी संस्थानचे कार्यकारी विश्वस्त निळकंठदादा पाटील यांनी मुख्यमंत्री महोदय यांचेसह सोबत असलेले अन्य मंत्र्यांचे स्वागत करून शाल श्रीफळ तसेच श्रीचा प्रसाद देऊन सत्कार केला.
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री ना. संजय धोत्रे,बुलडाणा पालकमंत्री ना.डॉ संजय कुटे, ना.गिरीष महाजन,ना. डॉ. रणजित पाटील,विदर्भ वैधानिक विकास महामंडळ अध्यक्ष ना. चैनसुख संचेती यात्राप्रमुख आ. सुमित ठाकूर,आ. आकाश फुंडकर,बुलडाणा जि.प. अध्यक्ष सौ. तायडे, भाजपा जिल्हाध्यक्ष धृपदराव सावळे,जि. प. महिला व बालकल्याण सभापती श्वेता महाले पाटील,जिल्हा सरचिटणीस संतोष देशमुख,नंदू अग्रवाल, यांचेसह अन्य स्थानिक भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते हजर होते.काही दिवसा अगोदर पश्चिम महाराष्ट्रच्या कोल्हापूर व सांगली येथे महापुर आला होता व यात कोट्यावधीचे नुकसान झाले असून श्री गजानन महाराज संस्थानकडून या पुरग्रस्तांसाठी 1 कोटी 11 लक्ष रुपयांची मदतनिधीचा धनादेश मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आला.याप्रसंगी संस्थान चे विश्वस्त मंडळीची उपस्थित होते.
Post a Comment