बुलडाणा - 24 ऑगस्ट
आपल्या सरकारने पाच वर्षात केलेल्या विकासकामांचा आढावा जनतेसमोर मांडण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजन आदेश यात्रा आज बुलढाणा जिल्ह्यात दाखल होत असतांनाच भाजपाचे माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांचे निधन झाल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा स्थगित करण्यात आली असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यानी मलकापूर येथे घोषणा प्रसार माध्यमानशी बोलतांना केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा ही दुपारी एक वाजेच्या दरम्यान विदर्भाचा प्रवेशद्वार असलेल्या मलकापूर शहरात दाखल झाली मात्र बुलडाणा जिल्ह्याच्या सीमेत दाखल होताच माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांचे निधन झाल्याचे वृत्त समोर येताच मुख्यमंत्री फडणवीस यांनी मलकापूर येथे सभास्थळी पोहचून महाजनादेश यात्रा स्थगित करण्यात आली असल्याची घोषणा केली. यावेळी त्यांनी स्वागत सत्कार स्वीकारले नाही.तसेच त्यानी माजी केंद्रीय मंत्री स्वर्गीय अरुण जेटली यांच्या विषयी शोक संवेदना व्यक्त केल्या आणि उपस्थितासह श्रद्धांजलि अर्पण केली व पुढील सर्व कार्यक्रम स्थगित करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यानी केली. भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या निधनामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा रविवार दि. २५ ऑगस्ट रोजी पर्यंत स्थगित केली आहे. सोमवारी मूळ कार्यक्रमानुसार पाथर्डी येथून यात्रा पुढे जाईल.

Post a Comment