बेलापुरातील महेश दिलीप दायमा यांची धार्मिक ,वैदिक विधी परीक्षेसाठी निवड
बेलापूर
( प्रतिनिधीश्री )--दधिमथी वैदिक गुरुकुलच्या वतीने घेण्यात आलेल्या तृतीय वर्षाच्या वार्षिक परिक्षेत बेलापुरातील महेश दायमा याने प्रथम क्रमांक मिळवला असुन पुढील धार्मिक विधी परीक्षेसाठी त्याची निवड झाली आहे त्याकरिता लवकरच तो( काशी) वाराणसी येथे जाणार आहे त्याबद्दल श्रीराम मंदिर न्यासाचे कोषाध्यक्ष परमपूज्य गोविंद देवगिरी जी महाराज यांच्या हस्ते त्याचा सन्मान करण्यात आला हिन्दुस्तानातील प्रसिद्ध अशा धार्मिक वैदिक संस्कृतीचे शिक्षण देणारा श्री दधिमथी वैदिक गुरुकुल हे देशात सर्व परिचित आहे हे गुरुकुल गोठमांगलोद जि . नागौर राजस्थान येथे आहे. या शिक्षण संस्थेत सर्व धार्मिक ,वैदिक,सांस्कृतिक विधीचे शिक्षण दिले जाते या गुरुकुलामध्ये सण 2021 मध्ये पत्रकार दिलीप दायमा यांनी आपले चिरंजीव महेश दायमा यास धार्मिक व विधियुक्त पौराहित्य शिकविण्यासाठी पाठविले होते महेश दायमा याने तीनही वर्षात सलग प्रथम येण्याचा बहुमान मिळविला तृतीय वार्षिक परिक्षेत सर्वोच्च गुण मिळवून त्याने पहिला क्रमांक पटकवीला. काल श्रीदधिमथी वैदिक गुरुकुल राजस्थान येथे श्रीरामंदिर आयोध्या ट्रस्टचे कोषाध्यक्ष परम पुज्य श्रद्धेय स्वामी गोंविंददेव गिरीजी महाराज याच्या शुभहस्ते महेश दायमा याचा सत्कार करण्यात आला. गुरुकुल संस्थेने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित केला होता . त्यावेळी आपल्याच मातृभूमीत जन्मलेल्या महेश दायमायाने प्रथम प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांना विशेष आनंद झाला महेश दायमा याने ॐ चैरिटेबल ट्रस्ट तर्फे घेण्यात आलेल्या परिक्षेतही सर्वोत्कृष्ट गुण मिळवून आपले कौशल्य दाखवून दिले होते त्याच्या या चमकदार कामगीरी मुळे महेश दायमा याची आता पुढील वैदिक व सांस्कृतिक परिक्षेसाठी श्रीक्षेत्र वाराणसी ( काशी ) उत्तर प्रदेश येथे निवड करण्यात आली आहे आहे . वैदीक गुरुकुल शिक्षणात महेश दायमा याला श्री. दधिमथी वैदिक गुरुकुल संस्थेचे अध्यक्ष सोहनलाल दायमा, सचिव हरिणारायण व्यास, कोषाध्यक्ष जयकिशन, संचालक समिती अध्यक्ष भालचंद्र व्यास, सहसचिव रूपनारायण असोपा, अध्यापक कमल किशोर जोशी, निदेशक सुभाष मिश्रा यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. महेश दायमा याच्या या यशाबद्दल आमदार हेमंत ओगले जेष्ठ पत्रकार मनोज आगे, अरुण पा . नाईक, माजी जिल्हा परिषद सदस्य शरद नवले श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुधीर नवले , श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती अभिषेक खंडागळे, बाळासाहेब आगे, भास्करराव खंडागळे अभिनंद केले. .