यश नवले यांची आशियाई पाॅवर लिफ्टिंग चाम्पियनशिपसाठी निवड.
श्रीरामपूर (प्रतिनिधी) येथील सामाजिक कार्यकर्ते मनोज नवले याचे चिरंजीव यश याची आशियाई पाॅवरलिफ्टिंग चम्पियनशीप २०२५ स्पर्धेसाठी नुकतीच निवड झाली आहे. पुणे येथे झालेल्या नॅशनल पावर लिफ्टिंग स्पर्धेत त्याने घवघवीत यश संपादित करुन द्वितीय क्रमांक पटकावला होता त्यामुळे ही निवड करण्यात आली आहे. आशियाई स्पर्धा २० फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत संपन्न होणार आहे. या स्पर्धा गुजरात राज्यात संपन्न होणार आहे या स्पर्धेकरिता श्रीरामपूर येथील यश मनोज नवले यांची निवड करण्यात आलेली आहे आहे. यश नवले याने अमरावती येथे बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन या विषयात डिग्री व पदवी मिळवीलेली आहे. हनुमान प्रसारक महाविद्यालय अमरावती येथे आपल्या खेळाचा सातत्याने सराव त्याने केला असून सध्या श्रीरामपूर येथील क्रीडा प्रशिक्षक माॅंटी साळवे , अविनाश राऊत तसेच मनोज नवले यांच्या मार्गदर्शनाखाली २५० किलो वजन उचलण्याचा सराव करत आहे. प्रसिद्ध नॅशनल बॉडी बिल्डर तसेच मानाचा गणपती वर्ष ७५ , सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, आझाद मैदान श्रीरामपूर , या मंडळाचे अध्यक्ष मनोज नवले पाटील यांचे ते चिरंजीव आहेत. यश नवले याने यापूर्वी देखील २०१३ मध्ये झालेल्या श्रीलंका येथे कराटे आंतरराष्ट्रीय स्पर्धेत रौप्यपदक पटकावून विजेतेपद मिळविले होते. या निवडीबद्दल राज्याचे जलसंपदा तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब, माजी खासदार सुजयदादा विखे पाटील , राष्ट्रीय काँग्रेसचे सरचिटणीस तथा प्रवक्ते श्री. अविनाश आदिक , महाराष्ट्र पावर लिफ्टिंग असोसीएनचे अध्यक्ष सचिन टापरे, श्रीरामपूर नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक , अहिल्यानगर जिल्हा पावर लिफ्टिंगचे अध्यक्ष मनोज गायकवाड, प्रख्यात उद्योजक आशिषदादा बोरावके, माळी शुगर कारखान्याचे संचालक यश बोरावके, किशोर मल्टिप्लेक्स चे मालक कुणाल बोरावके गणगोत परिवार सोशल फाउंडेशन चे प्रदेशाध्यक्ष देविदास देसाई प्रदेश सचिव राहुल क्षीरसागर सहसचिव कचरू वाघ उदय जगताप राजेंद्र गवळी ठकुनाथ भगत सुनील बडसल रवींद्र शिंदे माणिक देसाई रामदास गवळी अजिंक्य जगताप राजेंद्र जगताप प्रभाकर पराड इंद्रजीत पाटील खराद यांनी अभिनंदन केले आहे.
Post a Comment