खंडाळ्यात धमाल पालक-बालक मेळाव्याचं उत्साहात आयोजन.
खंडाळा (गौरव डेंगळे): एकात्मिक बालविकास सेवा योजना,श्रीरामपुर शिरसगाव गट अंतर्गत खंडाळा येथील सांस्कृतिक भवन मध्ये आरंभ धमाल बालक-पालक मेळावा उत्साहात संपन्न झाला.या कार्यक्रमासाठी एकात्मिक बा.वि.से.यो प्रकल्प श्रीरामपूर प्रकल्प अधिकारी शोभा शिंदे,शिरसगाव बीट सुपरवायझर कल्पना फासाटे,तपर्यवेशिका आशा खेडकर, शांता गव्हाणे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षा सरपंच सौ छाया बर्डे यांच्यासह उपसरपंच भारती वाघमारे, सदस्या मंजुषा ढोकचौळे,अनिता मोरे,सोनाली विद्यावे, लहानबाई रजपूत,श्री ताराचंद अलगुंडे,संगिता ढोकचौळे,आरोग्य विभागाच्या डॉ मोक्षदा पटेल,खंडाळा दत्तनगर,शिरसंगाव,दिघी,गोंडेगावच्या आशा सेविका व मदतनीस उपस्थित होत्या. यावेळी विविध प्रकारचे स्टॉल लावण्यात आले होते.बालकाचे बाल अवस्थेतील वय वर्ष ० ते ६ वर्ष हा काळ किती महत्त्वाचा असतो याची माहिती या स्टॉल द्वारे पालकांना देण्यात आली. प्रत्येक बालकाचा वाढत्या वयाप्रमाणे कशाप्रकारे विकास होतो याची देखील माहिती देण्यात आली.सर्व कार्यक्रमाची माहिती सौ फासाटे यांनी उपस्थित पालकांना दिली. कार्यक्रमासाठी मंडपाची व्यवस्था खंडाळा ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आली होती.
Post a Comment