श्रीरामपूर- (प्रतिनिधी)के.जे.सोमैंया हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ हिंद सेवा मंडळाचे मानद सचिव. संजय जोशी व कनिष्ठ महाविद्यालयाचे चेअरमन मा.विजय नगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीरामपूरचे आमदार हेमंत ओगले हे होते. अध्यक्षीय भाषणात आमदार हेमंत ओगले यांनी विद्यार्थ्यांना भावी आयुष्यात तुम्ही स्वप्न पहा,डॉक्टर, इंजिनीयर, व राजकारणात उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन आपली स्वप्ने पूर्ण करा. असा बहुमोल सल्ला दिला या कार्यक्रमात त्यांच्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. तसेच स्कूल कमिटीचे सदस्य नितीन गगे यांनी विद्यार्थ्यांना एच.एस.सी.बोर्ड परीक्षेस शुभेच्छा देऊन सर्वांना सुरुची भोजनाचा आस्वादाचा लाभ करून दिला. शालेय समिती सदस्य मा.महेश टांकसाळ ् यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना आई-वडील व शिक्षक यांचे आपल्यावर कसे संस्कार होतात याबद्दल माहिती सांगून विद्यार्थ्यांना परीक्षेस शुभेच्छा दिल्या व कॉलेजला भेट म्हणून रोख रक्कम दिली . त्याचबरोबर शालेय समिती सदस्य माणिक जाधव, नवनाथ कर्डिले .अनिल औताडे श्री.उमेश तांबडे यांनी विद्यार्थ्यांना आपल्या मनोगतातून परीक्षेस शुभेच्छा दिल्या. तसेच या कार्यक्रमास आपल्या कनिष्ठ महाविद्यालयातील माजी विद्यार्थी चि.यश मनोज नवले याची अशियाई पावर लिफ्टिंग चॅम्पियनशिप 2025 साठी निवड झाली आहे व त्याचबरोबर चि. धीरज सोनवणे याला 21 जानेवारीला पार पडलेल्या श्रीरामपूर श्री ह्या स्पर्धेत पहिला क्रमांक, व श्रीरामपूर श्री champion of champion हे टायटल मिळालं आणि
11 डिसेंबरला झालेल्या सावित्री बाई फुले पुणे विद्यापीठ ह्या स्पर्धेत गोल्ड मेडल मिळालं व All India Inter University नॅशनल साठी सिलेक्शन झाल्याबद्दल दोघांनाही शुभेच्छा देण्यात आल्या व मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला . डॉ.बा.ग.कल्याणकर रात्र प्रशालेचे चेअरमन मा.श्री. चंद्रकांत सगम व मुख्याध्यापक श्री. दत्तात्रय कांबळे, शा.ज.पाटणी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. भांगरे विठ्ठल हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.जाधव चंद्रकला यांनी केले, कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.शेटे योगेश यांनी केले,
स्वागत गीत श्री. बाबा वाघ व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी यांनी केले. मान्यवरांचा परिचय व स्वागत प्रा.जाधव दिपाली यांनी केले. अध्यक्ष सूचनेस अनुमोदन प्रा. कुमावत सुवर्णा यांनी दिले. बक्षीस वितरण प्रा. ताजने मंजुषा यांनी केले. कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक श्री. कल्याण लकडे सर व प्रा. शेरअली सय्यद यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा.राऊत अविनाश यांनी केले या कार्यक्रमासाठी कनिष्ठ महाविद्यालयाचे श्री. चरणदास सुरवडे , सानप, जपकर , शेजुळ , भगत, भालेराव याचे मोलाचे सहकार्य मिळाले.
Post a Comment