May 2024

बेलापुर  (प्रतिनिधी  )-नुकत्याच जाहीर झालेल्या इयत्ता दहावी परिक्षेच्या निकालात अन्वय क्लासेसच्या सर्वच विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले असुन अन्वय क्लासेसचा निकाल हा १०० % लागला असल्याचे क्लासच्या संचालिका सौ  भक्ती गवळी यांनी सांगितले  ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक स्वर्गीय नामदेवराव देसाई यांची कन्या सौ.भक्ति किशोर गवळी यांनी सुरु केलेल्या अन्वय क्लासेसचा निकाल या ही वर्षी शंभर टक्के लागला  नुकत्याच पार पडलेल्या दहावी च्या परिक्षेत ओझर येथील माधवराव बोरस्ते विद्यालयातील अन्वय क्लासेसची विद्यार्थीनी कु.मैथिली प्रदीप घोडेकर विद्यालयात प्रथम आली.तसेच  कु.साक्षी काळे ही हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या शाळेची विद्यार्थिनी केंद्रात प्रथम आली आहे. एअर फोर्स जिथे फक्त एअर फोर्स  कंपनीतील मुलांना ऍडमिशन मिळते असे सर्वात अवघड सीबीसी पॅटर्न मधले विद्यालय म्हणजे केंद्रीय विद्यालय एअर फोर्स चा विद्यार्थी ज्ञानदीप पाटील याने 93% मार्क मिळवुन विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला तसेच  एअरफोर्स विद्यालयातील विद्यार्थी अर्णव श्रीवास्तव याने 92 टक्के गुण मिळवुन द्वितीय क्रमांक पटकावला या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार अन्वय क्लासच्या वतीने  सौ.भक्ती किशोर गवळी यांनी केला  या वेळी क्लासेसच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांना सॅमसंग कंपनीचा टॅब आणि स्मार्ट वॉच देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला .

सौ भक्ती किशोर गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली अन्वय क्लासेसमध्ये  दर वर्षी तीनशे विद्यार्थी शिक्षण घेत असतात.

राहाता प्रतिनिधी:सध्याचा तरुण वर्ग हा मोठ्या प्रमाणात पत्रकारीतेकडे वळत असुन आपल्या उज्वल करिअरची संधी निर्माण करु पाहत आहे, करीता विविध वर्तमानपत्रे,न्यूज पोर्टल्स, न्यूज चॅनल्सद्वारे क्षणात,गांव परिसराची/ तालुका,शहराची यासोबतच संपूर्ण जगाची खबरबात मिळणे आगदी सोपे झालेले आहे. यातच काही नवोदित पत्रकारांनी देखील मोठी आगेकुच केली असल्याचे बघावयास मिळत आहे,मात्र निम हकीम खतरे जान  (वैद्य जर परिपूर्ण नसला तर त्याने दिलेले औषधं खाल्याने जीवावर बेतू शकते) याच उक्ती प्रमाणे जर पत्रकार देखील तसाच कमी माहितीगार असल्यास त्याने केलेली बातमी त्याच्या अंगलट येवू शकते, म्हणून खास यासाठीच स्वाभिमानी संपादक सेवा संघ संचलित इलेक्ट्रॉनिक ॲण्ड प्रिंट मिडिया यांचे संयुक्त विद्यमाने इलेक्ट्रॉनिक आणी प्रिंट मिडिया क्षेत्रातील नवोदित पत्रकारांना प्रबोधनत्मक मार्गदर्शन कार्यशाळेचे वेळोवेळी आयोजन केले जाते आहे.

प्रिंट मिडियासाठी बातमी कशी लिहावी,बातमीसाठी फोटो कसे असावे त्याकरीता कोणते ॲंगल वापरावे यासोबतच बातमी लिहिताना कोणकोणत्या प्रकारची खबरदारी घेण्यात यावी आदी विषयांवर स्वाभिमानी संपादक सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार शौकतभाई शेख यांचे तर इलेक्ट्रॉनिक मीडियासाठी बातमी करताना शुटिंग (व्हॅयूज्वल) कसे असावे,ॲंगल कसे असावे किती.दुर, किती जवळ, आवाज स्पष्ट असण्याकरीता काय पद्धत वापरावी बातमीसाठी स्क्रीप्ट कशी थोड्याच शब्दात असावी बातमी चलतचित्रामागे व्हाईस (आवाज) कसा असावा आदी विषयांवर स्वाभिमानी संपादक सेवा संघ संचलित इलेक्ट्रॉनिक मिडिया सेल चे प्रदेशाध्यक्ष असलमभाई बिनसाद यांचेकडून सुयोग्य मार्गदर्शन लाभते, ज्येष्ठ पत्रकार शौकतभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभराच्या विविध जिल्हा आणी तालुकास्तरावर अनेक शेकडो असे दैनिक, साप्ताहिक,पाक्षिक, मासिक वर्तमानपत्र यासोबच हजारो संपादक जोडले गेलेले आहेत.

त्याच प्रमाणे असलमभाई बिनसाद यांचे कार्य देखील मोठे विशाल आहे, राज्यभरातील विविध ठिकाणी त्यांनी इलेक्ट्रॉनिक मिडिया क्षेत्रातील युट्यूब चॅनल संपादकांना मोठे पाठबळ दिलेले आहे, इलेक्ट्रॉनिक मिडिया क्षेत्रातील नुतन संपादकांच्या या विषयीच्या कोणत्याही जटील समस्या असल्यास ते केवळ एका फोन कॉल वर सॉल करुन देतात ही त्यांची मोठी महारथ आहे, म्हणून शौकतभाई शेख आणी असलमभाई बिनसाद यांच्या  निर्पेक्ष एकाविचाराने इलेक्ट्रॉनिक ॲंड प्रिंट मिडिया क्षेत्रातील नवोदित पत्रकार, संपादकांसाठी वेळोवेळी श्रीरामपूर येथील स्वाभिमानी संपादक सेवा संघाच्या प्रमुख कार्यालयात विनामूल्य प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात येत असते. यासोबतच नवीन वर्तमानपत्र किंवा न्यूज पोर्टल/ न्यूज चॅनल सुरु करण्यासाठी तथा त्यांची अत्यल्प दरात सर्व्हिस मिळविण्यासाठी देखील सुयोग्य मार्गदर्शन केले जाते.ज्या कोणास आवश्यकता आहे तथा जे कोणी पत्रकारिता क्षेत्रात आपले करिअर घडविण्याची आपल्या उराशी इच्छा बाळगतात त्यांनी जरुर *9561174111* या क्रमांकावर संपर्क करुन सदरील वेळोवेळी होत असलेल्या या शिबीराचा आवश्य लाभ घ्यावा असे इलेक्ट्रॉनिक ॲंड प्रिंट मिडिया च्या वतीने देण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

श्रीरामपुर  (प्रतिनिधी  )-श्रीरामपुर तालुक्यातील नाऊर सारख्या ग्रामीण भागातुन शिक्षण घेवुन देखील चिरंजीव अनिकेत नवनाथ देसाई याने अकाऊंट या विषयात १०० पैकी १०० गुण मिळवुन राज्यात  प्रथम येण्याचा बहुमान मिळवीला आहे               अनिकेत देसाई याने चंद्ररुप डाकले जैन महाविद्यालयात शिक्षण घेत असताना इयत्ता बारावीच्या परिक्षेत एकुण ८५ % गुण मिळवीले तसेच अकाऊंट या विषयात १०० पैकी १०० गुण मीळवुन राज्यात पहीला आला आहे अनिकेत नवनाथ देसाई  हा पत्रकार देविदास देसाई यांचा पुतण्या आहे. सी डी जैन महाविद्यालयाचे प्राचार्य डाँ,सुहास निंबाळकर जी एस  क्षिरसागर सर व्ही बी दळवी सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले . त्याच्या यशाबद्दल आमदार लहु कानडे साईबाबा संस्थानचे मा. विश्वस्त सचिन गुजर अशोक उद्योग समुहाचे सर्वेसर्वा भानुदास मुरकुटे  पत्रकार देविदास देसाई भास्कर खंडागळे दिलीप दायमा सुहास शेलार असलम बिनसाद सदिंप जगताप आदिंनी अभिनंदन केले आहे ,

बेलापुर (प्रतिनिधी  )-नुकत्याच झालेल्या सीबीएसई परिक्षेत बेलापुरची कन्या भुमी सुभाष आमोलीक हीने पद़्श्री विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशनच्या इंग्लीश मिडीयम स्कूल मधुन प्रथम क्रमांक  मिळवीला असुन तिच्या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.           बेलापुरच्या प्रथम नागरीक सरपंच स्वाती अमोलीक यांची बहीण तसेच येथील सामाजिक कार्यकर्ते सुभाष आमोलीक यांची कन्या भूमी हीने सीबीएसई परिक्षेत ९६.२ टक्के गुण मिळवुन विळद घाट येथील विखे पाटील फाऊंडेशनच्या इंग्लिश मिडीयम स्कूलमधुन प्रथम क्रमांक मिळवीला .तिच्या यशाबद्दल बेलापुर पत्रकार संघाचे अध्यक्ष भास्कर खंडागळे जि प सदस्य शरद नवले बाजार समीतीचे उपसभापती अभिषेक खंडागळे सरपंच स्वाती अमोलीक उपसरपंच मुस्ताक शेख आदिंनी अभिनंदन  केले आहे.

बेलापुर (प्रतिनिधी  )-जोरदार आलेल्या वादळामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली तर बेलापुर खूर्द येथील हरिश्चंद्र दगडू पुजारी यांची दिड एक केळीची बाग भुईसपाट झाली आहे .बेलापुर खुर्द येथील शेतकऱ्याच्या दिड एकर क्षेत्रात असलेली केळीची बाग पुर्णतः उध्वस्त झाली दिड एकर क्षेत्रात २०० झाडाची लागवड केलेली होती त्या बागेतील  केळी तयार झाली होती काल आलेल्या जोरदार वादळामुळे त्यांची दिड एकर बागेतील सर्व केळीची झाडे जमीनीवर झोपली त्यामुळे पुजारी यांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे तसेच अनेक शेतकऱ्यांचे आंबा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अनेक ठिकाणी झाडाखाली कैऱ्यांचा सडा पहावयास मिळाला वादळी वाऱ्याबरोबर आलेल्या पावासामुळे अनेक शेतकऱ्यांचा शेतात असलेला कांदाही भिजला

श्रीरामपूर नेवासा रोडवर भीषण अपघात अपघातात ट्रक व प्रवासी अँप्पेरिक्षा या समोर समोर धडकल्याने ॲपे रिक्षाचा चक्काचूर एक इसम जागीच ठार वाहतुकीची झाली कोंडी

बेलापुर  (प्रतिनिधी  )- श्री साईबाबा मंदिराच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त श्री साई पावन प्रतिष्ठाण व श्री साई सेवा समिती बेलापुर तसेच एस एम बी टी हाँस्पीटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहीती श्री साई पावन प्रतिष्ठाणचे अध्यक्ष  कैलास चायल यांनी दिली आहे .     या शिबीरात शुगर ,रक्तदाब , ब्लड आँक्सीजन तपासणी ,ई सी जी केला जाईल तसेच तज्ञ डाँक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील उपचार केले जातील .या शिबीरात हृदय रोगासंबधीत छातीत दुखणे ,चालताना दम लागणे ,दरदरुन घाम येणे ,छातीवर दबाव असणे, छातीत डाव्या बाजुला वेदना होणे ,हाताला मुंग्या येणे वेदना होणे आदि आजारावर मोफत निदान केले जाणार आहे. तसेच ई सी जी मोफत काढला जाणार आहे ,हर्निया ,हायट्रोसिल , अपेंडिक्स ,आतड्याच्या शस्रक्रिया स्वादुपिंडाच्या शस्रक्रिया ,मुळव्याध ,पित्ताशयातील खडे ,भगंदर आदि आजारावर मोफत तपासणी व उपचार केले जाणार आहे.तिरळेपणा,मोतीबिंदु रातआंधळेपणा ,दृष्टी कमी होणे आदि डोळ्याच्या तसेच नाक कान घसा यातील आजाराच्या देखील तपासणी करुन उपचार केले जाणार आहे तरी शिबीरार्थींनी रविवार दिनांक ५ मे रोजी सकाळी ११ वाजता श्री साई मंदिर बेलापुर येथे उपस्थित रहावे असे अवाहन श्री साई पावन प्रतिष्ठाण व साई सेवा समिती बेलापुर यांच्या वतीने करण्यात आले आहे तसेच श्री साईबाबा मंदिरांच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त सांयकाळी ६ ते ९ या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असुन भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे अवाहनही सेवा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget