विद्यालयात चमकणार अखंडित सौर ऊर्जा श्रीरामपूर येथील रयत शिक्षण संस्थेचे डी डी काचोळे माध्यमिक विद्यालय तथा जनता हायस्कूल श्रीरामपूर या ठिकाणी विद्यालयाच्या स्थापनेपासून ते 2015 सालापर्यंत म्हणजेच 70 वर्षानंतर माजी विद्यार्थ्यांचा महामेळावा सकाळी दहा ते पाच या वेळेत अतिशय मंगलमय व भावनिक वातावरणात जल्लोषात संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे माजी विद्यार्थी हरीश जाधव अतिरिक्त कमिशनर मुंबई महानगरपालिका हे होते तर कार्यक्रमाच्या उद्घाटक मीनाताई जगधने यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन दीप प्रज्वलन करून तसेच कर्मवीर भाऊराव पाटील यांचे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. याप्रसंगी विद्यालयाचे माजी विद्यार्थी राजेंद्र वाघ उद्योजक, सुरेश जाधव अभियंता मुंबई, सुनील हिवाळे शास्त्रज्ञ भारत सरकार, किसन कानडे अभियंता, केशव बुळे सरपंच सातेवाडी, माजी मुख्याध्यापक रघुवीर बैरागी, त्रिदल संघटनेचे अध्यक्ष मेजर कृष्णा सरदार, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष किशोर गदिया,योगेश वाघचौरे उपाध्यक्ष, पोपटराव शेळके सचिव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या मेळाव्यासाठी आजी-माजी शिक्षक व मुख्याध्यापक, माजी विद्यार्थिनी, माजी विद्यार्थी व विद्यार्थी असे सुमारे 1100 लोक उपस्थित होते.
शालेय परिपाठानंतर मान्यवरांचे स्वागत सुरेल अशा स्वागत गीताने करण्यात आले. अध्यक्षीय भाषणामध्ये हरीश जाधव म्हणाले की मी आज भारत देशातील क्रमांक एक च्या महानगरपालिकेमध्ये उच्च पदावर काम करण्याची संधी मला केवळ याच विद्यायामुळे मिळाली. याच विद्यालयाने मला मोठे ध्येय गाठण्यासाठी बळ दिले.
याप्रसंगी विद्यालयाचे माजी विद्यार्थी व प्रसिद्ध उद्योजक राजेंद्र वाघ यांनी विद्यालयाच्या भौतिक सुविधा विकासकामांसाठी दोन लाख रुपये रोख मदत केली व विद्यालयास वीज समस्या कायमस्वरूपी दूर करून सौर ऊर्जा प्रकल्प विद्यालयासाठी मंजूर केला.
कार्यक्रमाचे उद्घाटक मीनाताई जगधने याप्रसंगी माजी विद्यार्थ्यांना उद्देशून म्हणाल्या की माजी विद्यार्थी व शिक्षक यांचे ऋणानुबंधांचे गुरु शिष्य चे नाते हे अतूट असते. कितीही वर्षानंतर विद्यार्थी शिक्षकाला भेटला तरी तोच आदर विद्यार्थी शिक्षकाला देतो व आपल्या शिक्षकाच्या प्रती ऋणनिर्देश व्यक्त करतो. तसेच शाळा म्हणजे विद्यार्थ्यांच्या जीवनातील दुसरी आईच असते. शालेय प्रांगणात आल्यानंतर विद्यार्थ्याला आपल्या आईच्या सहवासात आल्याचा आनंद मिळत असतो.
यानंतर नाट्य कलाकार अजय घोगरे , आदित्य नगरकर कासिम सय्यद यांनी अतिशय उत्कृष्ट अशी गुरु शिष्य वरील नाटिका शाळा व विद्यार्थी यांच्यामधील भावनिक नाते नाटकेद्वारे सर्वांसमोर सादर केले.
मधल्या सुट्टीनंतर वर्ग अध्ययन व अध्यापनाचा आनंद माजी विद्यार्थी व शिक्षकांनी मनसोक्त लुटला याबरोबरच विद्यार्थी परिचय करून देण्यात आला
माजी विद्यार्थी मेळाव्यामध्ये विद्यालयाच्या भौतिक सुविधांमध्ये वाढ होण्याच्या उद्देशाने माजी विद्यार्थी हरीश जाधव, सुरेश जाधव, सुशीलाताई नवले, दिगंबर गिरी, अक्षय भराड, सुभाष बोर्डे, किसन कानडे, संदीप बागुल, पोपटराव शेळके, शशिकांत येलम, योगेश जगदाळे, संग्राम कापरे, राजेंद्र वाघ, केशव बुळे, शकील शेख, चंद्रकांत गावंडे, पोपटराव शेळके, अंशुमन वाकचौरे, राजेंद्र अडसूळ, प्रदीप सुपारे, सुनील हिवाळे, त्रिवेदी विश्रमसागर, बजरंग वाकळे, अमर चाऊस यांनी सढळ हाताने मदत केली.
या स्नेह मिळाव्यासाठी जेवणाची सर्व अतिशय चांगली सोय संयोजकांनी केली होती. दिवसभर दोन वेळा नाष्टा, चार वेळा चहा, स्वादिष्ट व रुचकर भोजन याची व्यवस्था करण्यात आली होती. याप्रसंगी गुरुजनांचा यथोचित सन्मान करण्यात आला तसेच सर्वांनी आपल्या मनोगतातून जुन्या आठवणींना, शालेय जीवनातील आठवणी यांना उजाळा मिळाला.
कार्यक्रमादरम्यान ज्या शिक्षकांनी व माजी विद्यार्थिनी जगाचा निरोप घेतला अशा सर्वांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली उपस्थित शिक्षकांचा सन्मान चिन्ह देऊन यथोचित सत्कार करण्यात आला मिळाल्याबद्दल उपस्थित शिक्षकांनी समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचे अतिशय सुंदर असे सूत्रसंचालन संयोजन समितीचे कार्यध्यक्ष एडवोकेट जमीन बागवान यांनी केले तर उपस्थितांचे आभार विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील साळवे यांनी मानले.
हा मेळावा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संयोजन समितीचे अध्यक्ष किशोर गधिया कार्याध्यक्ष जमीन बागवान सचिव पोपटराव शेळके उपाध्यक्ष योगेश वाकचौरे, सल्लागार गणेश थोरात, मार्गदर्शक मेजर कृष्ण सरदार, सुनील बोलके, भाऊसाहेब मुळे, संजय छल्लारे, प्रकाश कुलथे, बाबासाहेब मोरगे, निलेश भालेराव, राजेंद्र करंनकाय अल्पेश झुरंगे अविनाश पठारे शेखर सौदागर सोमनाथ वाडेकर, कासिम सय्यद, अजय घोगरे आदित्य नगरकर बाबासाहेब खोसरे, बाळासाहेब हारदास, आसिफ सय्यद गणेश थोरात,समीन बागवान, मच्छिंद्र मच्छिंद्र पवार, अस्लम सय्यद तसेच डी डी काचोळे विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील साळवे व सर्व स्टाफ, श्रीरामपूर नगर परिषदेचे स्वच्छता व पाणीपुरवठा विभाग आदींनी विशेष परिश्रम घेतले