समिंद्रा फौंडेशनच्या वतीने लोह कारागीर व बेलापुर ग्रामपंचायत सफाई कामगारांना मिठाई वाटप
बेलापुर (प्रतिनिधी )- बेलापुर गावाची वर्षभर साफ सफाई करणारे सफाई कर्मचारी तसेच गावात गेल्या अनेक वर्षापासून वास्तव्यास असणारे लोह कारागीर बांधव तसेच शंभुक वसतीगृह श्रीरामपुर श्री साई विठ्ठल अनाथाश्रम बेलापुर यांना दिपावली निमित्त समिंद्रा फौंडेशन यांच्या वतीने फराळ वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला . या वेळी बोलताना समिंद्रा फौंडेशनचे अध्यक्ष सदाशिव थोरात म्हणाले की फौंडेशनच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात आले असुन शालेय मुलांना वह्या पुस्तके शालेय बँग कपडे त्याचबरोबर अनाथांना व गरजुंना कपडे जिवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात येते नगर जिल्ह्यासह बिड सांगली सोलापुर येथेही फौंडेशनच्या वतीने मदतकार्य करण्यात आलेले आहे .या वेळी फौंडेशनचे उपाध्यक्ष व आदर्श राष्ट्रपती शिक्षक पुरस्कार विजेते बबन तागड पत्रकार देविदास देसाई अजिज शेख शरद पुजारी शफीक आतार शिंदे, तोरणे आदिसह बेलापुर ग्रामपंचायत कर्मचारी घिसाडी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते,या वेळी बेलापुर ग्रामपंचायत २७ सफाई कर्मचारी तसेच लोह कारागीर बांधव, साई विठ्ठल अनाथ आश्रम, शंभुक वसतीगृह श्रीरामपुर आदि ठिकाणी फराळाचे वाटप करण्यात आले .
Post a Comment