नेवासा येथील रोजलँड इंग्लिश मीडियम सीबीएससी स्कूलच्या मुख्याध्यापकपदी श्रीरामपूरच्या हेमंत सोलंकी यांची नियुक्ती.
नेवासा (प्रतिनिधी): नेवासा तालुक्यातील नामांकित मुकिंडपुर परिसर बहुउद्देशीय ग्राम विकास संस्थेचे रोजलँड इंग्लिश मीडियम सीबीएससी स्कूलच्या मुख्याध्यापकपदी श्रीरामपूरच्या हेमंत सोलंकी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.मागील ३३ वर्षापासून श्रीरामपुर तालुक्यातील डहाणूकर इंग्लिश मीडियम स्कूल,न्यू इंग्लिश स्कूल या ठिकाणी त्यांनी ज्ञानदानाच अलौकिक कार्य केले आहे.विविध संघटनेकडून श्री सोलंकी यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देखील प्राप्त झाले आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असतात.त्यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपुर तालुक्यातील अनेक विद्यार्थी डॉक्टर,इंजिनिअर,वैज्ञानिक, वकील,व्यावसायिक तसेच शैक्षणिक क्षेत्रात देखील काम करत आहेत.श्री सोलंकी यांचे मुख्याध्यापकपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे मुकिंडपुर परिसर बहुउद्देशीय ग्राम विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री भाऊसाहेब अंबाडे,सदस्य श्री दिपक अंबाडे,अजित अंबाडे, निकिता अंबाडे,रूपाली अंबाडे, पी पी एस स्कूलचे प्राचार्य डॉ बी बी अंबाडे,शारदा स्कूलचे प्राचार्य श्री के एल वाकचौरे,सौ कणकम दोशी,प्राचार्या सौ जयश्री पोडघन,डॉ योगेश पुंड तसेच शिक्षण क्षेत्रातील विविध शिक्षक सहकाऱ्यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.
Post a Comment