सरपंचाने निर्णायक मत दिल्याने उक्कलगावच्या उपसरपंचपदी नितीन थोरात यांची निवड

बेलापूर :(प्रतिनिधी  )-श्रीरामपुर तालुक्यातील उक्कलगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी नितीन आबासाहेब थोरात यांची निवड झाली असुन श्रीरामपुर तालुक्यात प्रथमच समसमान मते मिळाल्यास सरपंचाना आणखी एक मत देण्याच्या निर्णयाची उक्कलगावात अंमलबजावणी झाली असुन सरपंचाच्या मतामुळे नितीन थोरात यांच्या गळ्यात उपसरपंच पदाची माळ पडली आहे .जिल्हाधिकाऱ्यांच्या २३ नोव्हेंबर रोजी प्राप्त आदेशानुसार  तालुक्यातील उक्कलगाव  ग्रामपंचायत उपसरपंचपदीची मतदान प्रक्रिया पार पडली असून उक्कलगाव ग्रामपंचायत कार्यालयात गुरूवारी सकाळी अकरा वाजेपासूनच कोण होणार उपसरपंच ? याची उत्कंठा शिगेला पोहोचली होती  दोन्ही गटाकडे समसमान सदस्य असल्यामुळे दोघांनीही अतिशय खबरदारी घेतली मत बाद होवु नये मत फुटु नये या करीता सर्व नेते मंडळी सावध होती मात्र असे काहीच झाले नाही सर्व सदस्यांनी आपापल्या गटालाच मतदान केले  दुपारी अडीच वाजेपर्यंत  

मतदान प्रक्रिया  सुरू झाली.यामध्ये मतदान प्रक्रियेमध्ये चार उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.यामध्ये सत्ताधारी गटामधून नितीन आबासाहेब थोरात व शरद नानासाहेब थोरात या दोघांनी अर्ज दाखल केले.विरोधी गटामधून अँड. पुरूषोत्तम पंढरीनाथ थोरात यांनी दोन अर्ज दाखल केले.दुपारी एक वाजेच्या दरम्यान दोन्ही गटाकडून एक - एक अर्ज माघारी घेतले गेले. त्या नंतर उपसरपंच पदासाठी दोनच अर्ज शिल्लक राहिल्याने मतदान घेण्यात आले.दोन्ही गटाला ८-८ समसमान मते पडली.त्यामुळे सरपंचाने मिळालेल्या अधीकाराचा वापर करुन निर्णायक एक मत सत्ताधारी गटाला दिल्याने नुतन उपसरपंचपदी नितीन आबासाहेब थोरात यांचा निवडीचा मार्ग मोकळा झाला.निवडणूक प्रक्रिया सरपंच रविना शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.निवडणूक अधिकारी म्हणून गटविकास अधिकारी उस्मान शेख यांनी काम पाहिले तर ग्रामविकास अधिकारी रमेश निबे व समीर मणियार यांनी त्यांना सहाय्य  केली.बेलापूरचे पोलीस हेड कॉन्स्टेबल संपत बडे पोलीस हरीश पानसंबळ यांनी बंदोबस्त ठेवला.उपसरपंचपदासाठी नितिन थोरात यांची निवड झाल्याने गुलाल उधळून फाटक्याची आतिषबाजी करण्यात आली .सध्या उपसरपंच म्हणून निवडून आलेले नितीन आबासाहेब थोरात हे मागील पंचवार्षिक निवडणूकीत लोकनियुक्त सरपंच राहीलेले होते .या वेळी सदस्य शरद नानासाहेब थोरात ,ललीता लक्ष्मण  थोरात सीमा रावसाहेब तांबे जयश्री रविंद्र थोरात मंदा बन्सी पारखे अंजली रमेश थोरात यांच्यासह मंडळाचे नेते अशोक कारखान्याचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक रावसाहेब हरी थोरात पंचायत समीतीचे मा सभापती आबासाहेब गणपत थोरात  सोपानराव वेणूनाथ जगधने काँ.आण्णासाहेब लक्ष्मण थोरात  शहाबापु कर्डीले सुरेश जगधने रावसाहेब काशिनाथ थोरात निवृत्ती थोरात भगवान दादा थोरात किशोर दत्तात्रय थोरात कारभारी जाधव आदिसह समस्त ग्रामस्थ उपस्थित होते. 

.......

Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget