June 2020

बेलापूर  (प्रतिनिधी  )- लग्न समारंभासाठी बेकायदा मंडळी जमवुन मा जिल्हाधिकारी अहमदनगर आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल बेलापूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असुन श्रीरामपूर तालुक्यातील हा पहीलाच गुन्हा आहे                                        या बाबत बेलापूर खूर्द येथील पोलीसा पाटील युवराज गोरक्षनाथ जोशी यांनी बेलापूर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली की मी सरपंच  अनुराधा गाढे ग्रामसेवक चंद्रकांत तुंभारे कामगार तलाठी विकास शिंदे अनिल गाढे सुनिल बारहाते उमेश बारहाते आदींची ग्रामस्तरावर कोरोना कमीटी असुन मी सचिव म्हणून काम पहात आहे आज साकाळी अकरा वाजता श्रीहरिहर केशव गोविंद बन ट्रस्टच्या हाँलमध्ये चालू आसलेल्या लग्न समारंभात कुठल्याही नियमांचे पालन न करता चार पाचशे लोक एकत्र आल्याचे समजताच कोरोना १९ कमीटीचे सर्व जण सदर ठिकाणी  जावुन समक्ष पहाणी केली असता सदर कार्यालयात मोठ्या प्रमाणात गर्दी दिसुन आली त्या वेळी केशव गोविंद बन ट्रस्टचे पदाधीकारी यांनी लग्न समारंभास परवानगी देताना कोरोनाचा प्रादुर्भाव होवु नये म्हणून कुठलीही सुविधा उपलब्ध करुन दिली नाही तसेच लग्न समारंभाच्या वेळी ट्रस्टचे कुणीही पदाधीकारी उपस्थित नव्हते गळनिंब येथील मुलगी व सडे तालुका राहुरी येथील नवरदेव यांचा विवाह पार पडत असताना मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली या बाबत कमीटीने विचारणा केली आसता काहींनी आम्ही रोख पैसे मोजले असल्याचे सांगितले या बाबत कमीटीने ट्रस्टच्या पदाधीकार्याशी संपर्क साधला असता दोन तास कुणीही आले नसल्याचे कोरोना कमीटीचे म्हणणे आहे ट्रस्टने कार्यक्रमाची सुपारी घेतल्या नंतर तेथे थांबणे आवश्यक होते परंतु तसे न करता ट्रस्टचे अध्यक्ष सचिव यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणत्याही प्रकारची उपाय योजना न करता हाँल भाडे घेवुन कार्यक्रमासाठी दिली तसेच नवरदेव नवरीचे  आई वडील यांनी लग्न समारंभासाठी १०० ते १५० पेक्षा जादा लोक एकत्र जमवुन मा जिल्हाधिकारी  व जिल्हा दंडाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अहमदनगर यांचेकडील कोरोना (१९) विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याचे अनुशंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजना पत्रक / आदेश क्रDC/कार्या/९ब१/२०२०दिनांक३१मे२०२० अन्वये तसेच क्रआव्यमपू/कार्या१९अ/५९२/२०२०अहमदनगर दिनांक २जुन २०२० यांचे आदेशाचे उल्लंघन केले बाबतची फिर्याद देण्यात आली असुन या फिर्यादीमुळे वर्हाडी मंडळीची धांदल उडाली कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी शासनाने कठोर उपाय योजना केली असली तरी ग्रामस्थ मात्र कोरोना बाबत फारसे गंभीर दिसत नसल्याचे समोर आले आहे.

बुलडाणा - 30 जून
ग्रीन गोल्ड कंपनीने सोयाबीन चे बोगस बियाणे विकुण शेतकऱ्यांची फसवणूक केली त्यामुळे शेतकरी.मागणी करुण ही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नव्होती म्हणून काही शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी राज्यमंत्री रविकांत तुपकर यांची भेट घेतली होती.या अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना घेवून रविकांत तुपकर व त्यांचे सहकारी 29 जून 2020 रोजी दु.1 वाजता बुलडाणा जिल्हा कृषि अधीक्षक नरेंद्र नाइक यांची कैबिन मध्ये जावून
शेतकऱ्यांना नुकसान भरपाई व बोगस बियाणे देणारी कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी साठी कैबिन मध्ये बैठा आंदोलन सुरु केला,सायंकाळ पर्यंत काही निर्णय ना झाल्याने कार्रवाई होय पर्यंत कार्यालय सोडणार नसल्याची ठाम भूमिका घेत तुपकर व आंदोलकांनी रात्रीचा जेवन कैबिन मध्ये केला व रात्री कैबिन मध्येच मुक्काम करत सर्वजन झोपले
       शेतकऱ्यांच्या आक्रमकतेपुढे कृषी विभागाने नारमाईची भूमिका घेत चिखली पो.स्टे.ला रात्री 1.17 वा ग्रीन गोल्ड कंपनीवर भा.द.वि.कलम 420, बीज अधिनियम 6(b) & 7(b) बियाणे नियम 1968 च्या 23 (d) नुसार गुन्हा दाखल केला व कंपनीचे चिखली MIDC मधील गोडावून रात्री 3 वाजता सील करण्यात आले.तसेच ग्रीन गोल्ड कंपनीला राज्यात बंदी घालावी अशी शिफारस बुलडाणा कृषी विभागाने राज्य सरकार कडे केली आहे.प्रशासना कडून शेतकऱ्यांना बोगस बियाणे देणारी कंपनीवर  सदरची कार्रवाई झाल्यानंतर रात्री 3:30 वाजता आंदोलन संपले तो पर्यंत जिल्हा कृषी अधीक्षक नरेंद्र नाईक व कर्मचारी कार्यालयातच होते.आता नुकसान भरपाईसाठी शेतकरी न्यायालयात जाणार असल्याची माहिती तुपकर यांनी दिली.या आंदोलनात राणा चंदन,नितीन राजपूत,पवन देशमुख,सैय्यद वसीम,प्रदीप शेळके,शेख रफिक शेख करीम,दत्तात्रय जेऊघाले, ऋषिकेश म्हस्के यांच्यासह अन्यायग्रस्त शेतकरी उपस्थित होते.

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- कोपरगावकडून एक रुग्णवाहिका गंभीर अवस्थेत असलेल्या रुग्णाला घेवून गोंधवणीपर्यंत आली. परंतु करोनाबाधित रुग्ण सापडल्याने गोंधवणीचा भाग सील करण्यात आला आहे. रुग्णाला तातडीने घेवून जाणे गरजेचे असल्यामुळे तेथील लोखंडी पाईप काढण्यासाठी गेले असता त्या पाईपमध्ये विद्युत प्रवाह उतरल्यामुळे चारपाच लोकांना त्याचा झटका बसला. ही बाब काहींच्या लक्षात आली नसती तर मोठी दुर्घटना घडली असती. एवढी मोठी घटना घडल्याची माहिती सांगितली असता अधिकारी व पदाधिकार्‍यांनी एकमेकांवर ढकला ढकली केल्याने संताप व्क्त होत आहे.गोंधवणी शिवारात चार दिवसापूर्वी करोना बाधीत रुग्ण सापडल्याने गोंधवणी परीसर सील केला आहे. काल सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास कोपरगावकडून रुग्ण घेवून रुग्णवाहिका गोंधवणीपर्यंत पोहोचली. परंंतु परिसर सील असल्याने रस्ता बंद होता; परंतु रुग्णाला घेवून रुग्णवाहिका जाणे आवश्यक होते. तेथील नागरिकांनी पाईप काढून रस्ता मोकळा करण्याचा प्रयत्न करत असताना त्या पाईपमध्ये विद्युत प्रवाह उतरलेला होता.या पाईपमध्ये विद्युत प्रवाह उतरला असल्याची माहिती भैरवनाथनगरचे सरपंच भारत तुपे यांनी प्रांंताधिकार्‍यांंना सांगण्यासाठी फोन केला त्यांचा मोबाईल बंद होता. तहसीलदाशी संपर्क केला असता मी अधिकार्‍यांना सांगतो असे त्यांनी सांगितले. नगरपालिकेत फोन केला तर हे पोलिसांचे काम आहे असे उत्तर मिळाले. त्यानंतर उपनगराध्यक्ष करण ससाणे यांना सांगितले असता त्यांनी पालिकेच्या अधिकारी व कर्मचार्‍यांना खडसावून घटनास्थळी पाठविले. या कर्मचार्‍यांनी तातडीने या पाईपमध्ये उतरलेला प्रवाह बंद करून रस्ता मोकळा केला. त्यांतर रुग्णवाहिका श्रीरामपूरकडे रवाना झाली, असे भारत तुपे यांनी सांगितले.

अहमदनगर - यातील तक्रारदार हे हॉटेल व्यावसायिक आहेत त्यांनी उत्पादन शुल्क विभागाकडे दारु विक्रीसाठी लागणारा परवाना मिळण्यासाठी रितसर अर्ज केला होता . सदर अर्जावरुन त्यांना दारु विक्रीचा परवाना मिळाला होता त्यावरुन त्यांनी हॉटेल चालु केले होते . यातील आरोपी नामे दिगंबर लक्ष्मण गेंटयाल याने सदर परवाण्याबाबत माहीती अधिकार अन्वये उत्पादन शुल्क विभागाकडे कोणत्या कागदपत्राचे आधारे परवाना दिला याबाबतची माहीती मागवुन घेतली होती . व सदर माहीतीचे आधारे वर नमुद आरोपी यातील तक्रारदार यांना सदर हॉटेल परवाना हा नियमानुसार मिळाला नसुन त्यामध्ये अनेक त्रुटी आहेत . सदर बाबत मी उत्पादन शुल्क विभागाचे वरीष्टांकडे तक्रारी करुन तुझा हॉटेल परवाना रदद करतो . अशी धमकी देत होता . त्यासाठी तो तक्रारदास यास वारंवार फोन करुन , समक्ष भेटुन तिन लाख रुपये खंडणीची मागणी करत होता . सदर आरोपीविरुध्द नगर शहरात अनेक गुन्हे दाखल असल्याने यातील तक्रारदार हे घाबरुन गेले होते . परंतु त्यांची खंडणी देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी पोलीस अधिक्षक कार्यालय येथे येवून पोलीस निरीक्षक स्था.गु.शा यांची भेट घेवुन त्यांचेकडे तक्रारी अर्ज दिला . लागलीच सदरबाबतची माहीती पो नि दिलीप पवार यांनी वरीष्टांना दिली . सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेवुन मा.श्री अखीलेश कुमार सिंह , पोलीस अधीक्षक , अहमदनगर यांनी सागर पाटील अप्पर पोलीस अधीक्षक , अ.नगर व संदीप मिटके , उपविभागीय पोलीस अधिकारी , नगर शहर विभाग , पो नि दिलीप पवार , स्थानिक गुन्हे शाखा यांना सदर अर्जावर कारवाई करण्याचे आदेश दिले, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सपोनि शिशिरकुमार देशमुख , पोउनि सोळके , पोउनि मेढे , पोहेकॉ / रविंद्र पांडे , पोहेकॉ दत्तात्रय गव्हाणे पोना रविद्र कर्डीले , पोकॉ संदिप दरंदले , कमलेश पाथरुट , रोहीत मिसाळ असे तक्रारदार व सोबत सरकारी दोन पंच यांना बोलावून घेवून तक्रारदार यास एक लाख रुपये रक्कम सोबत घेण्यास सांगून ठरलेल्या ठिकाणी जावुन पंचासमक्ष तक्रारदार व पोलीस पथकाने सापळा रचुन खंडणी मागणारा इसम याची वेषांतर करुन वेगवेगळया ठिकाणी वाट पाहत थांबलो असता काही वेळात तेथे ठरलेल्या संभाषणाप्रमाणे खंडणी मागणारा इसम नामे दिगंबर लक्ष्मण गेंटयाल हा आल्यावर त्याने तक्रारदार यास खंडणीची मागणी करुन रक्कम एक लाख रुपये स्वीकारल्यानंतर सापळयातील पंचासमक्ष पोलीस पथकाने त्यास झडप घालुन त्यास जागीच ताब्यात घेवुन त्याचे ताब्यातील एक लाख रुपये रक्कम हस्तगत केली असुन तक्रारदार यांचे फिर्यादीवरुन कोतवाली पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला असुन पुढिल कारवाई कोतवाली पोलीस स्टेशन करत आहेत.
आरोपी दिगंबर लक्ष्मण गेंटयाल याचेवर दाखल असलेले गंभीर गुन्हे
 १ ) कोतवाली पोस्टे गु.रजि.नं १८२/२०१५ भा.द.वि.क .३०७,३ ९ ५ प्रमाणे
२ ) कोतवाली पोस्टे गु.रजि.नं १८०/२०१५ भा.द.वि.क .४३८,३५३ प्रमाणे
३ ) कोतवाली पोस्टे गु.रजि.नं 1८०/२०१६ मुंबई पो.अॅक्ट ३७ ( १ ) ३ , १३५ प्रमाणे
 ४ ) कोतवाली पोस्टे गु.रजि.नं ११ ९ ७ / २०१५ डिफेसमेंट अॅक्ट क ३५ प्रमाणे ५ ) कोतवाली पोस्टे गु.रजि.नं 1 ३ ९ ० / २०१७ भा.द.वि.क. ३ ९ २,३२७ ३४१ प्रमाणे
६ ) तोफखाना पोस्टे गु.रजि नं 1३ ९ ० / २०१६ आर्म अॅक्ट ३,२५ प्रमाणे
७ ) कोतवाली पोस्टे गु.रजि नं 1 ११७/२०२० महा पो.का.क. ३७ ( १ ) ३ १३५ प्रमाणे अहमदनगर जिल्हा पोलीस दलातर्फे असे आवाहन करण्यात येत आहे की , अशा प्रकारचे गुन्हेगार प्रवृत्तीचे इसम कोणत्याही कारणासाठी खंडणी / वर्गणी मागत असतील किंवा इतर प्रकारचा त्रास देत असतील तर तात्काळ पोलीसांशी संपर्क साधावा त्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल . सदरची कारवाई मा . श्री अखीलेश कुमार सिंह , पोलीस अधीक्षक , अहमदनगर , मा . श्री सागर पाटील साहेब , अप्पर पोलीस अधीक्षक , अ.नगर व श्री . संदीप मिटके साहेब , उपविभागीय पोलीस अधिकारी , नगर शहर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी केलेली आहे. 

श्रीरामपूर | श्रीरामपूर शहरातील गोंधवनी परिसरात 18 जूनला कोरोनाबाधीत रुग्ण आढळल्यामुळे गोंधवनी रस्ता परिसर 200 मीटर पूर्णपणे सील केला असून, या परिसरातील मुख्य रस्ता हा पूर्णपणे बंद केलेला असल्याने होणारी गैरसोय थांबावी म्हणून लवकरात लवकर गोंधवनी रोड हा जुना राज्यमार्ग म्हणून त्वरित चालू करावा, अशी मागणी नगरसेविका प्रणिती दिपक चव्हाण व खादी ग्रामोद्योगचे दिपक चरणदादा चव्हाण यांनी केली आहे.   प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात पुढे म्हंटले आहे की, रेड झोन असल्यामुळे परिसरातील सर्वच दुकाने 100 % बंद आहेत. अगोदरच गेल्या तीनचार महिन्यापासून लोकडाऊन परिस्थिती असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे जनजीवन त्रस्त झालेले असून उपासमारीची वेळ आली आहे. या भागात वास्तव्य करणारा बहुसंख्य वर्ग हा हातावर पोट भरणारा आहे. परिसरातील सर्वच दुकाने बंद असल्याने उधारीवरती नागरिकांचा जो उदरनिर्वाह चालत होता, तोही पूर्णपणे ठप्प झाला असल्याचे चव्हाण यांनी म्हंटले आहे.
गेल्या पाच सहा दिवसांपासून नागरिकांचे हाल होत असून स्थानिक प्रशासन, आमदार, नगराध्यक्षा, प्रांत, तहसीलदार यांनी लक्ष घालून किमान या रेड झोन परिसरात सकाळ व संध्याकाळी एक-एक तास जीवनावश्यक वस्तूंची दुकाने चालू ठेवावीत, जेणेकरून स्थानिक नागरिकांची उपासमार थांबेल.  रेड झोन असल्यामुळे प्रशासनाने फक्त रहिवासी क्षेत्रातील विविध रस्ते बंद करावयास हवे होते ; परंतु  राज्यमार्ग असलेला गोंधवनी रोड हा मुख्य रस्ताच बंद केल्या कारणाने शहरातील दैनंदिन प्रवास करणाऱ्या नागरिकांची त्याचबरोबर नगरपरिषद कर्मचाऱ्यांचीदेखील जाणेयेणे कमी ससेहोलपट होत आहे. त्यामुळे, परिसरातील गोंधवनी रोड हा मुख्य रस्ता किमान एक बाजू तरी चालू ठेवावा, अशी मागणी गोंधवनी रस्ता परिसरातील नागरिकांनी केली आहे.

बुलडाणा - 29 जून
शेतकरी नेते रविकांत तुपकार आक्रमक होत त्यांनी आज 29 जून रोजी जिल्हा कृषि अधीक्षक कार्यालायात पोहोचन हल्लाबोल आंदोलन करत शेतकऱ्यांना आजच नुकसान भरपाई द्या अन्यथा शेतकऱ्यांची फसवणुक केल्यामुळे ग्रीन गोल्ड कंपनीचे गोडावून व कृषी अधीक्षक कार्यालय व पेटवून देण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
     संपूर्ण राज्यात मोठ्या प्रमाणात बियाणे कंपन्यांनी व महाबीज नी शेतकऱ्यांना बोगस बियाणांची विक्री केली आहे.याच बियांयांची शेतकऱ्यांनी आपले शेतात पेरणी केली परन्तु बियाणे उगावलेच नाही. बुलडाणा जिल्ह्यात ग्रीन गोल्ड कंपणीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई मिळावी व बोगस बियाणे कंपन्यांवर तात्काळ कारवाई करावी यासाठी रविकांत तुपकरांनी बुलडाणा जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात गेल्या 4 तासापासून हल्लाबोल आंदोलन चालू केले आहे.जर शेतकऱ्यांना आजच्या आज नुकसान भरपाई मिळाली नाही व कंपन्यांवर कारवाई झाली नाही तर कृषी अधीक्षक कार्यालय व ग्रीन गोल्ड कंपनीचे गोडावून पेटवून देण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी राज्यमंत्री  रविकांत तुपकरांनी दिला आहे.तुपकर आक्रमक होताच कार्यालायात पोलिस बल दाखल झालेला असून सायंकाळी 7:45 वाजे पर्यंत तुपकरचा आंदोलन सुरुच आहे.

दि.२५/०६/२०२० रोजी सोनई पोलीस पोलीसांनी घोडेगाव येथे आरोपी नामे निलेश उर्फ निलकंठ मधुकर केदार
रा.घोडेगांव ता.नेवासा याचे ताब्यातुन एक गावठी कटटा हस्तगत करुन गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्हयात आरोपी निलेश मधुकर केदार यास अटक करुन त्याचेकडे गुन्हयासंदर्भात कौशल्यपुर्वक तपास करुन त्याने त्याचा मित्र विजय बाळु सोनवणे रा आदर्शनगर, उरुळी देवाची, ता हवेली जि पुणे यास
आणखी एक गावठी कटटा व दोन जिवंत काडतुस विकल्याची कबुली दिली. त्यावरुन सदर गुन्हयाचे तपास अधिकारी व सोनई पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनि जनार्दन सोनवणे यांनी मा वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली व पुर्व परवानगीने सपोनि ज्ञानेश्वर थोरात, पोहेकॉ दत्ता गावडे, पोकॉ बाबा वाघमोडे यांचे पथक तयार करुन पुणे येथे रवाना केले. सदर पथकाने पुणे येथे जावुन हडपसर पोलीस ठाण्याचे पथकाची मदत घेवुन गुन्हयात पाहीजे आरोपी विजय बाळु सोनवणे याचा शोध घेवुन व त्यास ताब्यात घेवुन त्याचेकडुन एक गावठी कटटा व दोन जिवंत काडतुसे पंचासमक्ष हस्तगत केले आहे. आरोपी विजय बाळु सोनवणे यास सोनई पोलीस स्टेशनला आणुन अटक करुन त्यास मा न्यायालयात हजर केले असुन सदर आरोपीस ३ जुलै पर्यत पोलीस कस्टडी रिमांड
मिळाली आहे. गुन्हयाचा पुढील तपास सपोनि जनार्दन सोनवणे हे करीत आहेत. आरोपी विजय बाळु सोनवणे याचेवर खालीलप्रमाणे गुन्हे दाखल आहेत. १. श्रीगोंदा पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं. १३०/२०१७ भा.द.वि.क. ३०२, ३९४(अ), ३४ प्रमाणे २. हडपसर पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. १३५८/२०१८ भा.द.वि.क. ३०७,३९७,३४ प्रमाणे सदरची प्रशंसनीय कारवाई ही मा.पोलीस अधीक्षक श्री अखिलेश कुमार सिंह साो अहमदनगर, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती दिपाली काळे मॅडम श्रीरामपुर, मा पोलीस उपअधिक्षक मंदार जवळे सो उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव उपविभाग शेवगाव यांचे मार्गदर्शनाखाली सोनई पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे, सपोनि/ज्ञानेश्वर थोरात, पोहेकॉ चव्हाण, पोहेकॉ दत्ता गावडे, पोना शिवाजी माने, पोकॉ विठठल थोरात, पोकॉ बाबा वाघमोडे व पोकॉ सचिन ठोंबरे यांनी केली आहे.

जळगाव - चाळीसगावात खासगी वाहनामधून प्रवासी वाहतुकीच्या मोबदल्यात ८०० रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी पोलीस नाईकासह एका खासगी व्यक्ती (पंटर) ला न्यायालयाने चार वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा आणि दंड सुनावला आहे.तक्रारदार स्वप्निल कृष्णा अहिरे हे चाळीसगावात कॅप्टन कॉर्नर येथून मारुती ओमनी वाहनात प्रवासी भरत होते.या वेळी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक आबासाहेब भास्कर पाटील (वय ४४) तेथे आले. चाळीसगाव येथून प्रवासी वाहतूक करायची असेल, तर मागील महिन्याचे व चालू महिन्याचे असे एकूण ८०० रुपये लाचेची मागणी पोलीस नाईक पाटील यांनी तक्रारदाराकडे केली. रक्कम दिली नाही, तर तुला प्रवासी वाहतूक करू देणार नाही व वाहनावर कारवाई करणार, असा इशारा दिला.याबाबत जळगावातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे ३१ मार्च २०१६ रोजी तक्रार दाखल झाली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी चौकशी करुन सापळा रचला.पोलीस नाईक पाटील याने ८०० रुपयांची लाचेची मागणी ३१ मार्च २०१६ रोजी केली. या प्रकरणातील दुसरा आरोपी मोहन भिका गुजर (वय ५४) याच्यामार्फत १ एप्रिल २०१६ रोजी साईदत्त हॉटेल येथे लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले.चार साक्षीदार तपासलेयाबाबत आरोपींविरुद्ध जळगाव सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले.त्यानंतर सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील भारती खडसे यांनी एकूण चार साक्षीदार तपासले. यात तक्रारदार स्वप्निल कृष्णा अहिरे, पंच भाऊसाहेब बागुल, सक्षम अधिकारी, तत्कालिन पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर, पोलीस निरीक्षक जगदीश पवार यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. या कामी पैरवी अधिकारी अनिल सपकाळे व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे केसवॉच सुनील शिरसाठ यांनी सहकार्य केले.अशी आहे शिक्षायाप्रकरणी पोलीस नाईक आबासाहेब पाटील, मोहन भिका गुजर यांना न्या.पी.वाय.लाडेकर यांनी शिक्षा सुनावली. लाच मागितल्याप्रकरणी तीन वर्ष सक्त मजुरी व लाच स्वीकारल्याप्रकरणी चार वर्ष सक्त मजुरी, तसेच दोन्ही कामात प्रत्येकी दोन हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. आरोपी मोहन गुजर याला कलम १२ अन्वये तीन वर्ष सक्त मजुरी व एक हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.

अहमदनगर (प्रतिनिधी)  बोल्हेगाव परिसरात राहत असलेल्या एका अल्पवयीन मुलास त्याच्या घरात घुसून मारहाण केल्याप्रकरणी महापालिका वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल बोरगे, अग्निशमन विभागाचे प्रमुख शंकर मिसाळ, कर्मचारी बाळू घाटविसावे व या अल्पवयीन मुलाची आई यांच्याविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित मुलाने तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.महापालिकाच्या अग्निशमन विभागात काही दिवसांपूर्वी कर्मचारी असलेल्या बोल्हेगाव येथील व्यक्तीचे निधन झाल्यानंतर त्याच्या पत्नीला महापालिकेच्या रुग्णालयात नर्स म्हणून अनुकंपा तत्वावर भरती केले आहे. या महिलेला एक मुलगा व एक मुलगी आहे. या महिलेच्या मुलाने आपल्या आईसह डॉ. बोरगे, मिसाळ व घाटविसावे हे रात्री घरी येऊन दारूची पार्टी करतात, धिंगाणा घालतात व मला मारहाण करून चटके देतात अशी व्यथा आधी पोलिसांकडे व नंतर चाईल्ड लाईनकडे मांडली होती. चाईल्ड लाईनने या मुलाचा जबाब नोंदवून तो रविवारी पोलिसांना सादर केला. यानुसार पोलिसांनी संबंधित मुलाच्या फिर्यादीवरून चौघांविरुद्ध भादंवि कलम 324, 323, 504, 506 तसेच बाल अधिनियम 2015 चे कलम 75 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे करत आहे.

बुलडाणा - 27 जून
बुलडाणा जवळच्या नांद्राकोळी येथील 23 वर्षीय युवकाची दुचाकीने रस्त्यावर उभे असलेल्या टिप्परला मागून धडक दिल्याने युवकाचा घटनास्थलीच मृत्यु झाल्याची घटना शुक्रवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास घडली आहे.ऋषीकेश संजय जवंजाळ असे ठार झालेल्या तरुणाचे नाव असून तो रात्री काही कामानिमित्त बुलडाणा कडे जात असतांना हा अपघात घडला आहे.प्राप्त
माहितीनुसार बुलडाणा-नांद्राकोळी या रसत्यात पालसिद्ध कंस्ट्रक्शन कंपनीचा नादुरुस्त टिप्पर उभा होता व रात्रीच्या वेळी अंदाज ना आल्याने ऋषीकेशची बाइक टिप्परला मागून जोरात धडकली व तो गंभीर जख्मी झाला त्याला बुलडाणा येथील सामान्य रुग्णालयात नेले असता त्याला मृत घोषित करण्यात आले.मृतकाने 15 दिवसांपूर्वीच स्प्लेंडर प्रो ही नवीन दुचाकी घेतली होती.बुलडाणा ग्रामीण पोलिस ठाण्यात मृतकाचे काका सुखदेव जवंजाळ यांच्या फिर्याद वरुन टिप्पर चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बुलडाणा - 27 जून
बुलडाणा जिल्ह्यातले संग्रामपूर तालुक्यात मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक गावांना फटका बसलाय आहे. वानखेड,पातुर्डा,वरवट बकाल,बावनबीर या परिसरात अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाल्यामुुुळे वाण नदी सह परिसरातील लहान नद्या व इतर नाल्यांना पूर आलाय.पावसाचा जोर आता कमी जरी झाला असला तरी अनेक गावांत  विजेचा पुरवठा खंडित झालेला आहे.या पावसामुळे शेकडो  हेकटरवरील
पेरणीचे नुकसान झालंय तर नदी काठचे शेत खरडुन गेले आहे तसेच अनेक शेतात पाणीच पाणी असल्याने शेता शिवाराना तलावाचे स्वरूप आलेले आहे. वान नदीवरील पुलावरून पाणी वाहत असल्याने बराच वेळ इथली वाहतूकही विस्कळीत झाली होती या सोबतच इतर पुलावरुन ही पुराचे पाणी वाहत होते.बावनबीर परिसरात सरासरी 85 मिलिमीटर  पातूर्डा इथं 55 मिलिमीटर नोंद झाली असून संग्रामपुर परिसरात सरासरी 64 मिलिमीटर पाऊसाची नोंद करण्यात आली आहे.जोरदार पावसामुळे अनेक नागरिकांच्या घरात ही पाणी घुसल्याने घरांचे ही नुकसान झालाय तर वरवट बकाल येथील बाजार समिति मध्ये ठेवलेला धान्य व इतर पाण्यात भिजुन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.आमदार डॉ. संजय कुटे यांनी वरवट बकाल बाजार समिति व मतदार संघातील इतर भागात जाऊन पुर परिस्थितिचा आढावा घेतला.

बेलापूर  (प्रतिनिधी  )- छोट्या व्यवसायीकांना काही नियम व अटीच्या शर्तीवर दुकाने व्यवसाय सुरु करण्यास परवानगी देण्यात आली असली तरी सर्व नियम धाब्यावर बसवुन व्यवसाय केले जात असुन कोरोना बाधीत व्यक्ती ही बेलापूरातील एकाची नातेवाईक असल्यामुळे नागरीकात भितीचे पसरले आहे       कोरोना बाधीत व्यक्तीचे नातेवाईक बेलापूरात असुन ती व्यक्ती नातेवाईकाकडे आल्याची जोरदार चर्चा गावात पसरली असुन सबंधीताकडे वैद्यकीय अधीकारी व कोरोना पथक जावून आले आहे या चर्चेमुळे नागरीकात भितीचे वातावरण पसरले आहे तसेच बेलापूरात छोट्या मोठ्या व्यवसायीकांना काही नियम व अटीच्या शर्तीवर दुकाने चालू करण्यास परवानगी दिली असली तरी व्यवसाय करणाराच्या तोंडाला मास्कच नाही ना दुकानात सँनिटायझर  गावात अनेक नागरीक विनाकारण फिरताना दिसत असुन कुणाच्याही तोंडाला मास्क लावलेले नाही ना सोशल डिस्टनचे पालन  त्यामुळे बेलापूरकरांचा जिव टांगणीला लागला आहे या सर्वावर कोण नियंत्रण ठेवणार कोरोना कमीटी कुठे गेली असा सवाल ग्रामस्थाकडून विचारला जात असुन तोंडाला मास्क नसणार्या नागरीकावर ग्रामपंचायतीने दंडात्मक कारवाई  करावी तसेच जे व्यवसायीक नियम पाळत नाही त्याचेवरही कारवाई करण्याची मागणी होत आहे.

बुलडाणा - 26 जून
राष्ट्रवादी कोंग्रेसचे संस्थापक अध्यक्ष व देशातील मोठे राजकारण्यांची फळीतील नेते शरद पवार यांच्या बद्दल भाजपाचे विधान परिषद सदस्य गोपीचंद पडळकर यांनी बेताल वक्तव्य केल्याने त्याचे पाळसाद संपूर्ण राज्यात दिसत असुन राज्याचे राजकारण तापुन गेलेले आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते पडळकर यांचा विविध प्रकारे विरोध करीत आहे.बुलडाणा जिल्ह्यातील अनेक ठीकाणी पडळकर यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळुन निषेध नोंदिविण्यात आले.शरद पवार यांच्या बद्दल अनोदगार व राज्याचे मुख्यमंत्री यांनी आषाढ़ी एकादशीला येऊ नये असा वक्तव्य पडळकर यांनी केला असून पडळकर याने कोरोनाची धासती घेतली आहे,महाराष्ट्राचा स्वास्थ बिघडू द्यायचा नसेल तर भाजपा प्रदेशाध्यक्ष यांनी "गोपी' ला कायमचा क्वारनटाईन करा अशी विनंती वजा इशारा बुलडाणा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टिचे जिल्हाध्यक्ष अड.नाज़ेर काज़ी यांनी दिला आहे.

बुलडाणा - 26 जून
बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरातील मौल्यवान मोठा चंदनचा झाड चोरी गेल्याची घटना घडल्यानंतर ही रुग्णालय प्रशासनाकड़ून गुन्हा दाखल करण्यात आला नाही या प्रकरणी "बिंदास न्यूज" ची बातमी झळकताच बुलडाणा शहर पोलिस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
     बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालय काही ना काही गोष्टी मुळे नेहमीच चर्चेत राहतो. रुग्णालय परिसरातील एक मोठा चंदनचा झाड दोन दिवस अगोदर अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याची घटना 25 जून रोजी उघडकीस आली होती.त्यामुळे रुग्णालय परिसराची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.जिल्हा सामान्य रुगनालायातील मोटरवाहन गैरेज लगतची पाण्याची टाकी जवळ असलेला हा मोठा चंदनचा झाड रात्रीच्या वेळी कोणी चंदन तस्कराने लंपास केला.
ही घटना रुग्णालय प्रशासनाला माहित असतांना देखील या महाग झाड चोरी झाल्याची तक्रार पोलिस ठाण्यात देण्यात आली नव्होती.या चोरीची माहिती मिळताच आज 26 जून रोजी दुपारी "बिंदास न्यूज" ने बातमीच्या माध्यमाने ही चोरी उघडकीस आल्यानंतर रुग्णलय प्रशासन जागी झाला व शेवटी सायंकाळी डॉ.असलम खान, वैद्यकीय अधिकारी,जिल्हा सा.रु.यांनी दिलेल्या फिर्याद वरुन अज्ञात चंदन चोर विरोधात भादवी ची धारा 379 अन्वय शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रीरामपूर : काँग्रेस पक्षाच्या वतीने शुक्रवारी (२६ जून) आमदार लहू कानडे यांच्या उपस्थितीत महात्मा गांधी पुतळ्यासमोर चीनने केलेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यानंतर इंधन दरवाढीच्या विरोधात निदर्शने करण्यात आली.यावेळी जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण नाईक, माजी सभापती सचिन गुजर, शहराध्यक्ष संजय छल्लारे, इंद्रनाथ थोरात, ज्ञानेश्वर मुरकुटे उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरलेल्या आहेत. मात्र असे असताना देशात पेट्रोल व डिझेलच्या दरामध्ये वाढ झाल्याने केंद्र सरकारच्या धोरणांचा यावेळी निषेध करण्यात आला. केंद्र सरकारच्या कारभाराचा यावेळी काँग्रेस नेत्यांनी समाचार घेतला.

अहमदनगर (प्रतिनिधी) जिल्ह्यात आज सायंकाळी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 28 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला आहे. यामध्ये नगर शहरातील 24, कर्जत तालुक्यातील 02, जामखेड तालुक्यातील एक आणि शिर्डी येथील एका रुग्णाचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यातील अ‍ॅक्टिव रुग्णांची संख्या आता 105 इतकी झाली आहे.नगर शहरात सिद्धार्थ नगर भागात 06, वाघगल्ली नालेगाव भागात 04, तोफखाना भागात 12 आणि सिव्हिल हडको भागात दोन रुग्ण आढळून आले आहेत. याशिवाय शिर्डी येथे एक आणि कर्जत तालुक्यातील आळसुंदे येथे दोन रुग्ण आढळून आले आहेत. तसेच जामखेड तालुक्यातील जवळके येथे एक रुग्ण बाधित आढळून आला आहे, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी दिली. सिव्हिल हडको भागात आढळून आलेले रुग्ण हे मूळचे जगतापवाडी येथील आहेत.दरम्यान, जिल्ह्यातील 05 करोनाग्रस्त रुग्ण आज सकाळी बरे होऊन घरी परतले. या रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे जिल्ह्यात करोनातून बर्‍या झालेल्या रुग्णांची संख्या आता 265 इतकी झाली आहे. करोनातून बर्‍या झालेल्या रुग्णामध्ये संगमनेर येथील 03, पाथर्डी आणि पारनेर तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश असल्याची माहिती डॉ. गाढे यांनी दिली.

बुलडाणा - 26 जून
बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालय काही ना काही गोष्टी मुळे नेहमीच चर्चेत राहतो.प्रसूति वार्डच्या पोर्च मध्ये एक डुक्कर रक्त चाटत असल्याचा किळसवाणा वीडियो समोर आल्यानंतर संपूर्ण जिल्हाच हादरुन गेला होता, आता हे प्रकरण शांत होत नाही तर रुग्णालय परिसरातील एक मोठा चंदनचा झाड जवळपास दोन दिवस अगोदर कोणी अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याची घटना 25 जून रोजी उघडकीस आली आहे.त्यामुळे रुग्णालय परिसराची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
जिल्हा सामान्य रुगनालायातील मोटरवाहन गैरेज लगतची पाण्याची टाकी जवळ असलेला मोठा चंदनचा झाड रात्रीच्या वेळी कोणी चंदन तस्कराने लंपास केला आहे. ही घटना रुग्णालय प्रशासनाला माहित असतांना हा महाग झाड चोरी झाल्याची तक्रार पोलिस ठाण्यात देण्यात आलेली नाही.चोरी गेलेला चंदन अंदाजे 30 ते 35 हजाराचा असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.अशाच प्रकारे रुग्णालय परिसरात इतर चोरीच्या घटना नेहमी होत असते,त्या मुळे येथे तैनात सुरक्षा रक्षक काय करतात,असा प्रशन उपस्थित होत आहे.

बुलडाणा - 25 जून
जिल्हा पोलीस दलाच्यावतीने कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या पोलीस अधिकारी व कर्मचारी व त्यांचे कुटूंबीय यांच्या तातडीच्या वैद्यकीय औषधोपचारासाठी स्व. दिपक जोग स्मृती भवन येथे कोविड केअर सेंटर तयार करण्यात आले आहे. या सेंटरचे फित कापून उद्घाटन आज 25 जुन रोजी जानेफळ पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस काँन्स्टेबल पुजा राजपूत यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी आमदार संजय गायकवाड, वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील-भुजबळ, अप्पर पोलीस अधिक्षक संदीप पखाले, पोलीस उपअधिक्षक (गृह) बळीराम गिते, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख, शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप साळुंके, पोलीस कल्याण शाखेचे पोलीस निरीक्षक  गिरीष ताथोड आदींची उपस्थिती होते.  
        तत्पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयातील एनआयसी येथे व्हिसीच्या माध्यमातून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील-भुजबळ यांच्याशी संवाद साधला. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी कोविड केअर सेंटरविषयी माहिती दिली. सेंटरचे चित्रीकरणही यावेळी दाखविण्यात आले. दरम्यान, गृहमंत्री यांनी पॉस्को अंतर्गत दाखल असलेल्या केसमध्ये दोन वेळा अकोला सामान्य रूग्णालयात जावून आलेल्या महिला पोलीस कॉन्स्टेबल पुजा राजपूत यांच्याविषयी चौकशी केली. त्यांच्या धाडसाचे त्यांनी कौतुक केले. त्यांच्याचहस्ते या केंद्राचे उद्घाटन करण्याच्या सूचना देत त्यांच्यासमोर त्यांनी ऑनलाईन उद्घाटन करायला लावले.  त्यानुसार महिला काँन्स्टेबल पुजा राजपूत यांच्या हस्ते कोविड केअर सेंटरचे उद्घाटन करण्यात आले.
       त्यानंतर रविकांत तुपकर यांच्याहस्ते कोविड केअर सेंटरच्या पलिकडील भागात असलेल्या उपहारगृहाचे भूमिपुजन करण्यात आले. तसेच कोविड केअर सेंटरसाठी घेण्यात आलेल्या विंधन विहीरीच्या पाण्याचे जलपूजनही करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

"बिंदास न्यूज" ची बातमीचा इम्पेक्ट
बुलडाणा - 25 जून
बुलडाणा जिल्हा सामान्य रुगनालायातील महिला प्रसूति वार्डच्या पोर्च मध्ये डुक्कर रक्ताचा स्वाद घेत असल्याचा भयंकर व किळसवाणा प्रकार सर्व प्रथम "बिंदास न्यूज" ने बातमीच्या माध्यमाने समोर आनल्या नंतर प्रशासन जागी झाला व आज गुरूवारला रुग्णालय परिसरातील मोकाट डुक्कर पकडण्याची मोहिम नगर पालिकेने सुरु केली आहे.
       सध्या कोरोनामुळे आरोग्य यंत्रणाची धावपळ सुरु आहे. मात्र कोरोना व इतर आजारग्रस्तांवर देखील लक्ष ठेवणे आवश्यक असतांना बुलडाणा जिल्हा रुग्णालय वाऱ्यावर दिसून येत आहे. डुकरांचा येथे
मोठा सुळसुळाट असून रुग्णांच्या नातेवाईकांच्या ताटातील अन्न सुद्धा डुकरे पळवितात. त्यामूळे डूकरांचा बंदोबस्त जरुरी आहे.परंतू इच्छाशक्ती नसली की, सर्व काही आलबेल असते. प्रसूती वार्डच्या पोर्च मध्ये महिलेचे सांडलेले रक्त चाटत अस्ताननाची जेव्हा बातमी "बिंदास न्यूज" वर झळकली तेव्हा एकच खळबळ उडाली.इतर अधिकाऱ्यांनी रुग्णालय प्रशासनाचे कान उघडनी तर केलीच आरोग्य उपसंचालक अकोला व जिल्हाधिकारी बुलढाणा यांनी सुद्धा रुग्णालयात जावून परिस्तिथिचा आढावा घेतला.इतकेच नव्हे जिल्हाधिकारी यांनी तर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडित वर ताशोरे ओळत स्वच्छतेकडे लक्ष देण्याचे निर्देश दिले आहे.दरम्यान बुलढाणा  नगर परिषदेला याबाबत अवगत करण्यात आल्याने डूकरांची धरपकड सुरु झाली आहे.असे असले तरी रुग्णालयावर स्वच्छते संदर्भात उपचार अत्यावश्यक झाले आहेत, अशी मागणी बुलडाणेकर करीत आहेत.

शिर्डी (शहर प्रतिनिधी ) दोनशे रुपये उसनवारी घेतलेल्या वादातून धारदार चाकूने मित्रानेच केला मित्राचा भोकसून खून केल्याची घटना शिर्डी शहरात घडली असून मोलमजुरी करणाऱ्या अमित प्रेमजी सोला याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असून शिर्डी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी इकराम पठाण फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. एका महिण्यात शिर्डीत दूसरा खून झाल्याने शहरातील गुन्हेगारीला आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांसमोर मोठे आवाहन उभे राहिले आहे.दरम्यान लाँकडाऊन काळात मोलमजुरी तसेच हातावर पोट भरणाऱ्या लोकांना पैशाची चणचण भासत आहे. गेल्या तिन महिण्यांपासून हाताला काम नाही त्यामुळे उपासमारीची वेळ सर्वांवर उद्भवली आहे. शिर्डीत पंधरा दिवसांपूर्वी खुनाची घटना ताजी असतांना पून्हा एका मजूराचा पैशाच्या कारणावरून खून झाल्याने खळबळ उडाली आहे.

🔹धक्कादायक  वीडियो आला समोर
बुलढाणा - 24 जून
बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असून स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे रुग्णालयाचेच आरोग्य धोक्यात आल्याचे चित्र समोर येत आहे.या जिल्हा रुग्णालयातील प्रसूती वार्ड मधील एक हादरनारा व्हिडिओ सध्या समोर आला आहे,या व्हिडिओ द्वारे हा गंभीर प्रकार समोर आल्याने प्रसूति वार्ड ची सुरक्षा व स्वच्छता किती ततपर आहे हे लक्षात येते. रुग्णालयातील प्रसूती कक्षाच्या आतील पोर्च मध्ये प्रसूती दरम्यान पडलेले रक्त डुक्कर कडून चाटल्या जात आहे.हा गंभीर प्रकार 23 जून च्या रात्री 9 वाजेच्या सुमारास चा असून हा वीडियो समोर आल्याने जिल्ह्याभरात खळबळ उडाली आहे.
         बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात जिल्हाभरातील जास्तीत जास्त गोर गरीब रुग्ण उपचारासाठी येतात. तसेच प्रसूती, कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया, मोतीबिंदू,शस्त्रक्रिया केल्या जातात. त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची रुग्णालयात ये-जा सुरु असते. सद्या कोरोना विषाणु पसरलेला असल्याने मोठ्या प्रमाणात खाजगी डॉक्टरांनी आपले दवाखाने बंद ठेवले आहे.त्यामुळे लोकांना सरकारी दवाखानेच आधार ठरत आहे अशात आता पर्यंत टोलवा टोलवी करून आपली ड्यूटी करणारे सरकारी दवाखान्यातील कर्मचाऱ्यांना ही नाइलाजाने कामे करावी लागत आहे पण हे लोक आपला कर्तव्य फार इमानदारिने पूर्ण करत नसल्याचे चित्र दिसत आहे.याचाच एक उदाहरण म्हणजे बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रसूति वार्डचा वीडियो आहे.या रुग्णालयात येणाऱ्या महिलांची प्रसूती विशेष प्रसूती कक्षामध्ये केली जाते मात्र समोर आलेल्या व्हिडिओमध्ये प्रसूती कक्षाच्या पोर्च मध्ये खूप मोठे रक्त फर्शीवर सांडलेले असून या वार्ड मध्ये घुसुन एक डुक्कर त्याला चाटत आहे.या हादरुन सोडणाऱ्या वीडियो मुळे रुग्णालय प्रशासनाचा भोंगळ कामकाज समोर येत आहे.रुग्णालय परिसरात मोकाट डुक्करांनी हैदोस घातला असून रुग्णालय प्रशासनाला या कडे लक्ष देण्याची गरज आहे.या प्रकरणी संपर्क साधला असता जिल्हा रुग्णालय प्रशासन काही प्रतिक्रिया देत नाही.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget