बुलडाणा - 30 जून
ग्रीन गोल्ड कंपनीने सोयाबीन चे बोगस बियाणे विकुण शेतकऱ्यांची फसवणूक केली त्यामुळे शेतकरी.मागणी करुण ही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नव्होती म्हणून काही शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी राज्यमंत्री रविकांत तुपकर यांची भेट घेतली होती.या अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना घेवून रविकांत तुपकर व त्यांचे सहकारी 29 जून 2020 रोजी दु.1 वाजता बुलडाणा जिल्हा कृषि अधीक्षक नरेंद्र नाइक यांची कैबिन मध्ये जावून
शेतकऱ्यांना नुकसान भरपाई व बोगस बियाणे देणारी कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी साठी कैबिन मध्ये बैठा आंदोलन सुरु केला,सायंकाळ पर्यंत काही निर्णय ना झाल्याने कार्रवाई होय पर्यंत कार्यालय सोडणार नसल्याची ठाम भूमिका घेत तुपकर व आंदोलकांनी रात्रीचा जेवन कैबिन मध्ये केला व रात्री कैबिन मध्येच मुक्काम करत सर्वजन झोपले
शेतकऱ्यांच्या आक्रमकतेपुढे कृषी विभागाने नारमाईची भूमिका घेत चिखली पो.स्टे.ला रात्री 1.17 वा ग्रीन गोल्ड कंपनीवर भा.द.वि.कलम 420, बीज अधिनियम 6(b) & 7(b) बियाणे नियम 1968 च्या 23 (d) नुसार गुन्हा दाखल केला व कंपनीचे चिखली MIDC मधील गोडावून रात्री 3 वाजता सील करण्यात आले.तसेच ग्रीन गोल्ड कंपनीला राज्यात बंदी घालावी अशी शिफारस बुलडाणा कृषी विभागाने राज्य सरकार कडे केली आहे.प्रशासना कडून शेतकऱ्यांना बोगस बियाणे देणारी कंपनीवर सदरची कार्रवाई झाल्यानंतर रात्री 3:30 वाजता आंदोलन संपले तो पर्यंत जिल्हा कृषी अधीक्षक नरेंद्र नाईक व कर्मचारी कार्यालयातच होते.आता नुकसान भरपाईसाठी शेतकरी न्यायालयात जाणार असल्याची माहिती तुपकर यांनी दिली.या आंदोलनात राणा चंदन,नितीन राजपूत,पवन देशमुख,सैय्यद वसीम,प्रदीप शेळके,शेख रफिक शेख करीम,दत्तात्रय जेऊघाले, ऋषिकेश म्हस्के यांच्यासह अन्यायग्रस्त शेतकरी उपस्थित होते.
Post a Comment