बुलढाणा - 24 जून
बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असून स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे रुग्णालयाचेच आरोग्य धोक्यात आल्याचे चित्र समोर येत आहे.या जिल्हा रुग्णालयातील प्रसूती वार्ड मधील एक हादरनारा व्हिडिओ सध्या समोर आला आहे,या व्हिडिओ द्वारे हा गंभीर प्रकार समोर आल्याने प्रसूति वार्ड ची सुरक्षा व स्वच्छता किती ततपर आहे हे लक्षात येते. रुग्णालयातील प्रसूती कक्षाच्या आतील पोर्च मध्ये प्रसूती दरम्यान पडलेले रक्त डुक्कर कडून चाटल्या जात आहे.हा गंभीर प्रकार 23 जून च्या रात्री 9 वाजेच्या सुमारास चा असून हा वीडियो समोर आल्याने जिल्ह्याभरात खळबळ उडाली आहे.
बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात जिल्हाभरातील जास्तीत जास्त गोर गरीब रुग्ण उपचारासाठी येतात. तसेच प्रसूती, कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया, मोतीबिंदू,शस्त्रक्रिया केल्या जातात. त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची रुग्णालयात ये-जा सुरु असते. सद्या कोरोना विषाणु पसरलेला असल्याने मोठ्या प्रमाणात खाजगी डॉक्टरांनी आपले दवाखाने बंद ठेवले आहे.त्यामुळे लोकांना सरकारी दवाखानेच आधार ठरत आहे अशात आता पर्यंत टोलवा टोलवी करून आपली ड्यूटी करणारे सरकारी दवाखान्यातील कर्मचाऱ्यांना ही नाइलाजाने कामे करावी लागत आहे पण हे लोक आपला कर्तव्य फार इमानदारिने पूर्ण करत नसल्याचे चित्र दिसत आहे.याचाच एक उदाहरण म्हणजे बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रसूति वार्डचा वीडियो आहे.या रुग्णालयात येणाऱ्या महिलांची प्रसूती विशेष प्रसूती कक्षामध्ये केली जाते मात्र समोर आलेल्या व्हिडिओमध्ये प्रसूती कक्षाच्या पोर्च मध्ये खूप मोठे रक्त फर्शीवर सांडलेले असून या वार्ड मध्ये घुसुन एक डुक्कर त्याला चाटत आहे.या हादरुन सोडणाऱ्या वीडियो मुळे रुग्णालय प्रशासनाचा भोंगळ कामकाज समोर येत आहे.रुग्णालय परिसरात मोकाट डुक्करांनी हैदोस घातला असून रुग्णालय प्रशासनाला या कडे लक्ष देण्याची गरज आहे.या प्रकरणी संपर्क साधला असता जिल्हा रुग्णालय प्रशासन काही प्रतिक्रिया देत नाही.
Post a Comment