बुलडाणा - 27 जून
बुलडाणा जिल्ह्यातले संग्रामपूर तालुक्यात मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक गावांना फटका बसलाय आहे. वानखेड,पातुर्डा,वरवट बकाल,बावनबीर या परिसरात अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाल्यामुुुळे वाण नदी सह परिसरातील लहान नद्या व इतर नाल्यांना पूर आलाय.पावसाचा जोर आता कमी जरी झाला असला तरी अनेक गावांत विजेचा पुरवठा खंडित झालेला आहे.या पावसामुळे शेकडो हेकटरवरील
पेरणीचे नुकसान झालंय तर नदी काठचे शेत खरडुन गेले आहे तसेच अनेक शेतात पाणीच पाणी असल्याने शेता शिवाराना तलावाचे स्वरूप आलेले आहे. वान नदीवरील पुलावरून पाणी वाहत असल्याने बराच वेळ इथली वाहतूकही विस्कळीत झाली होती या सोबतच इतर पुलावरुन ही पुराचे पाणी वाहत होते.बावनबीर परिसरात सरासरी 85 मिलिमीटर पातूर्डा इथं 55 मिलिमीटर नोंद झाली असून संग्रामपुर परिसरात सरासरी 64 मिलिमीटर पाऊसाची नोंद करण्यात आली आहे.जोरदार पावसामुळे अनेक नागरिकांच्या घरात ही पाणी घुसल्याने घरांचे ही नुकसान झालाय तर वरवट बकाल येथील बाजार समिति मध्ये ठेवलेला धान्य व इतर पाण्यात भिजुन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.आमदार डॉ. संजय कुटे यांनी वरवट बकाल बाजार समिति व मतदार संघातील इतर भागात जाऊन पुर परिस्थितिचा आढावा घेतला.
Post a Comment