शेतकरी नेते रविकांत तुपकार आक्रमक होत त्यांनी आज 29 जून रोजी जिल्हा कृषि अधीक्षक कार्यालायात पोहोचन हल्लाबोल आंदोलन करत शेतकऱ्यांना आजच नुकसान भरपाई द्या अन्यथा शेतकऱ्यांची फसवणुक केल्यामुळे ग्रीन गोल्ड कंपनीचे गोडावून व कृषी अधीक्षक कार्यालय व पेटवून देण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
संपूर्ण राज्यात मोठ्या प्रमाणात बियाणे कंपन्यांनी व महाबीज नी शेतकऱ्यांना बोगस बियाणांची विक्री केली आहे.याच बियांयांची शेतकऱ्यांनी आपले शेतात पेरणी केली परन्तु बियाणे उगावलेच नाही. बुलडाणा जिल्ह्यात ग्रीन गोल्ड कंपणीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई मिळावी व बोगस बियाणे कंपन्यांवर तात्काळ कारवाई करावी यासाठी रविकांत तुपकरांनी बुलडाणा जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात गेल्या 4 तासापासून हल्लाबोल आंदोलन चालू केले आहे.जर शेतकऱ्यांना आजच्या आज नुकसान भरपाई मिळाली नाही व कंपन्यांवर कारवाई झाली नाही तर कृषी अधीक्षक कार्यालय व ग्रीन गोल्ड कंपनीचे गोडावून पेटवून देण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी राज्यमंत्री रविकांत तुपकरांनी दिला आहे.तुपकर आक्रमक होताच कार्यालायात पोलिस बल दाखल झालेला असून सायंकाळी 7:45 वाजे पर्यंत तुपकरचा आंदोलन सुरुच आहे.
Post a Comment