"बिंदास न्यूज" ची बातमीचा इम्पेक्ट
बुलडाणा - 25 जून
बुलडाणा जिल्हा सामान्य रुगनालायातील महिला प्रसूति वार्डच्या पोर्च मध्ये डुक्कर रक्ताचा स्वाद घेत असल्याचा भयंकर व किळसवाणा प्रकार सर्व प्रथम "बिंदास न्यूज" ने बातमीच्या माध्यमाने समोर आनल्या नंतर प्रशासन जागी झाला व आज गुरूवारला रुग्णालय परिसरातील मोकाट डुक्कर पकडण्याची मोहिम नगर पालिकेने सुरु केली आहे.
सध्या कोरोनामुळे आरोग्य यंत्रणाची धावपळ सुरु आहे. मात्र कोरोना व इतर आजारग्रस्तांवर देखील लक्ष ठेवणे आवश्यक असतांना बुलडाणा जिल्हा रुग्णालय वाऱ्यावर दिसून येत आहे. डुकरांचा येथे
मोठा सुळसुळाट असून रुग्णांच्या नातेवाईकांच्या ताटातील अन्न सुद्धा डुकरे पळवितात. त्यामूळे डूकरांचा बंदोबस्त जरुरी आहे.परंतू इच्छाशक्ती नसली की, सर्व काही आलबेल असते. प्रसूती वार्डच्या पोर्च मध्ये महिलेचे सांडलेले रक्त चाटत अस्ताननाची जेव्हा बातमी "बिंदास न्यूज" वर झळकली तेव्हा एकच खळबळ उडाली.इतर अधिकाऱ्यांनी रुग्णालय प्रशासनाचे कान उघडनी तर केलीच आरोग्य उपसंचालक अकोला व जिल्हाधिकारी बुलढाणा यांनी सुद्धा रुग्णालयात जावून परिस्तिथिचा आढावा घेतला.इतकेच नव्हे जिल्हाधिकारी यांनी तर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडित वर ताशोरे ओळत स्वच्छतेकडे लक्ष देण्याचे निर्देश दिले आहे.दरम्यान बुलढाणा नगर परिषदेला याबाबत अवगत करण्यात आल्याने डूकरांची धरपकड सुरु झाली आहे.असे असले तरी रुग्णालयावर स्वच्छते संदर्भात उपचार अत्यावश्यक झाले आहेत, अशी मागणी बुलडाणेकर करीत आहेत.
Post a Comment