Latest Post

येवला,एसएनडी मैदान – येथील एसएनडी मैदानावर पार पडलेल्या रोमहर्षक सामन्यात नंदुरबारने श्री शारदा संघावर ३ गड्यांनी विजय मिळवला.


कमी धावसंख्येच्या या सामन्यात श्री शारदा संघाला केवळ ७५ धावांत गुंडाळण्यात नंदुरबारच्या शिस्तबद्ध गोलंदाजीने यश मिळवले. जय शिंदे आणि सैराम शेलके हे दोनच फलंदाज दहाच्या पुढे धावा करू शकले, त्यांनी प्रत्येकी १८ धावा केल्या.


नंदुरबारकडून दुर्व तपस्वीने भेदक गोलंदाजी करत ३ महत्त्वाचे बळी घेतले. त्याला हंसराज आणि तनयने प्रत्येकी २ बळी घेऊन उत्तम साथ दिली आणि शारदा संघाचा डाव लवकर संपवला.


७६ धावांचे सोपे लक्ष्य गाठताना नंदुरबारच्या संघाची सुरुवात खराब झाली आणि त्यांनी लवकरच गडी गमावले, मात्र संयम राखत त्यांनी फक्त ८ षटकांत ७ गडी गमावून विजय मिळवला.


इशी गावितने नाबाद २५ धावा करत विजयात मोलाची भूमिका बजावली, तर जॉननेही २१ धावांची उपयुक्त खेळी केली. श्री शारदाकडून विहान कसलीवालने जबरदस्त गोलंदाजी करत ४ बळी घेतले, तर विराट घेगडमलनेही ३ बळी घेतले आणि पुनरागमनाची आशा निर्माण केली होती.

बेलापूर( प्रतिनिधी)- बेलापूर व परिसरात विना नंबर प्लेट तसेच फॅन्सी नंबर प्लेट लावून फिरणाऱ्या दुचाकी व चार चाकी वाहन तसेच चार चाकी वाहनाच्या काचांना गडद काळा रंगाच्या फिल्म लावून बेकायदेशीर रित्या फिरणाऱ्या वाहनावर कारवाई करुन त्यांच्याकडून जवळपास सात हजार रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे की  बेलापूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावामध्ये किरकोळ  चोऱ्यांचे प्रमाण  वाढले  होते. तसेच अपघाताचेही प्रमाण वाढले होते या पार्श्वभूमीवर  श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी  परिसरात विना नंबर प्लेट तसेच फॅन्सी नंबर प्लेट लावून फिरणाऱ्या दुचाकी व चार चाकी वाहन तसेच चार चाकी वाहनांच्या काचांना गडद काळा रंगाचे फिल्म लावून बेकायदेशीर  फिरणाऱ्या वाहनावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार बेलापूर पोलिसांनी दिवसभर ही मोहीम राबवली. त्यामध्ये अनेक दुचाकी या विना नंबरच्या तसेच फॅन्सी नंबर असलेल्या आढळून आल्या त्या गाड्यावर पोलिसांनी तात्काळ कारवाई केली.  त्यात 19  दुचाकी विना नंबर तसेच फॅन्सी नंबरच्या दुचाकी आढळून आल्या एका मोटरसायकलवर तर चक्क नंबर प्लेटच्या जागी नंबर न टाकता सरपंच लिहिलेले होते  या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख याच्या आदेशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश जाधव  त्याचबरोबर पोलीस उपनिरीक्षक सुधीर हापसे ,  पोहेकॉ सचिन गायकवाड,पोकॉ संपत बडे, भारत तमनर, नंदकिशोर लोखंडे, रविंद्र अभंग, पंकज सानप ,महेश थोरात आदिंची ही कारवाई केली. पकडलेली गाडी सोडविण्याकरता अनेकांनी आपल्या मित्रांना पुढार्यांना फोन लावले परंतु कारवाई का केली हे सांगताच त्यांनीही फोनवर  तुमच्या पद्धतीने काय असेल ते करा असा सल्ला पोलिसांना दिला.

बेलापूर (प्रतिनिधी)-सत्यमेव जयते सुप्रभात ग्रुपच्या वतीने बेलापूर गावातील शासकीय कार्यालय तसेच मंदिर, मज्जिद, चर्च या ठिकाणी नागरिकांना व भाविकांना बसण्यासाठी म्हणून 20 बाकडे भेट देण्यात आले आहे.बाकडे लोकार्पणाची सुरुवात स्वामी समर्थ केंद्रा पासून करण्यात आली.सत्यमेव जयते सुप्रभात ग्रुपच्या वतीने बेलापूर बुद्रुक बेलापूर खुर्द तलाठी कार्यालय येथे येणाऱ्या नागरिकांना बसण्यासाठी व्यवस्था व्हावी याकरिता बाकडे भेट देण्यात आले. त्याचबरोबर बेलापूर गावातील मंदिर ,मज्जिद व चर्च याही ठिकाणी बाकडे भेट देण्यात आले. या वीस बाकड्यांची अंदाजीत किंमत 50 हजाराच्या आसपास असून या बाकड्यांचा लोकार्पण सोहळा काल श्री स्वामी समर्थ मंदिर कुर्हे वस्ती बेलापूर येथे संपन्न झाला. यावेळी श्री स्वामी समर्थ केंद्राचे सेवेकरी विठ्ठल गाडे मामा व अन्य सेवकर्यांच्या  तसेच सत्यमेव जयते ग्रुपच्या सर्व सदस्यांचे उपस्थितीत श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र यांना चार बाकडे भेट देण्यात आले. यावेळी बोलताना सेवेकरी विठ्ठल गाडे मामा म्हणाले की सत्यमेव जयते ग्रुपने श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात येणाऱ्या वयोवृद्ध भाविकांसाठी बाकड्यांची व्यवस्था केली त्यांनी सर्व धर्म समभाव लक्षात घेऊन मज्जिद असेल चर्च असेल त्याचबरोबर तलाठी कार्यालय याही ठिकाणी बाकड्यांची व्यवस्था केलेली आहे. त्याबद्दल त्यांना धन्यवाद द्यावे तितके थोडे आहे. यावेळी सत्यमेव जयते ग्रुपच्या वतीने विष्णुपंत डावरे अभिषेक खंडागळे देविदास देसाई आदींनी मनोगत व्यक्त केले.या वेळी सत्यमेव जयते सुप्रभात ग्रुपचे राधेश्याम अंबिलवादे,सचिन वाघ, बाबासाहेब काळे,दिलीप अमोलीक,दिपकसा क्षत्रिय सचिन कणसे,विलास नागले, विशाल आंबेकर,भगीरथ मुंडलिक, नंदकिशोर दायमा,बाबुलाल पठाण, जाकीर शेख,औदुंबर राऊत,गोपी दाणी, महेश कुऱ्हे, संजय भोंडगे,महेश ओहोळ आदिंसह नागरिक उपस्थित होते.

बेलापूर (प्रतिनिधी )-महर्षी वेदव्यास प्रतिष्ठान पुणे यांच्या वतीने आळंदी येथे पाच दिवसीय वेदोत्सव 2025 संपन्न झाला या वेदोत्सव परीक्षेत दधीमती वैदिक गुरुकुल गोठमांगलोत गुरुकुलातील व बेलापूर येथील पत्रकार दिलीप दायमा यांचे चिरंजीव बटुक महेश दायमा यांनी प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णमुद्रिका पटकाविली.                       दरवर्षी प्रमाणे याही वर्षी महर्षी वेदव्यास प्रतिष्ठान पुणे यांच्यावतीने आळंदी येथे वेदोत्सव 2025 संपन्न झाला या वेदोत्सवात महर्षी वेदव्यास प्रतिष्ठानच्या सर्व 40 विद्यालयांमधून तीनशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता पाच दिवस चालल्येल्या या स्पर्धेमध्ये सूर्यनमस्कार स्पर्धा, निबंध स्पर्धा, विविध गुणदर्शन स्पर्धा, वकृत्व स्पर्धा ,संपूर्ण शुक्ल यजुर्वेद मध्यादिन संहिता या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. या सर्व परीक्षेत दधीमती वैदिक गुरुकुल गोठमांगलोत या गुरुकुलातील बटुक महेश दिलीप दायमा यांनी प्रथम क्रमांक मिळविला त्याला त्याबद्दल सुवर्णमुद्रिका तसेच चांदीचे पंचपात्र सेट देऊन त्याचा सन्मान  प्रभू श्रीराम मंदिराचे कोषाध्यक्ष महंत गोविंद गिरीजी महाराज यांच्या हस्ते करण्यात आला.  तसेच दधिमती गुरुकुलचे गुरुजी आचार्य वेदमूर्ती श्री कमलकिशोर जोशी याचाही सन्मान या वेळी करण्यात आला. महेश दायमा हे बेलापूर येथील पत्रकार दिलीप दायमा यांचे चिरंजीव आहेत. यावेळी प्रधानाचार्य कमल किशोर जोशी यांचाही मंहत गोविंद देवगीरीजी महाराज यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावर्षीच्या प्रथम क्रमांकाच्या सन्मानाचे वैशिष्ट्य म्हणजे ज्या महेश दिलीप दायमा यांने  प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णमुद्रिका मिळवली ते महेश दायमा हे बेलापूरचे आहेत तसेच त्यांचा सत्कार करणारे श्रीराम मंदिराचे कोषाध्यक्ष महंत गोविंद देवगिरी जी महाराज यांची जन्मभूमी देखील बेलापूर आहे.महेश दायमा याने राजस्थान येथील दधिमती वैदिक गुरुकुलात वैदिक शिक्षण घेण्याकरता प्रवेश घेतला होता .आज पाच वर्षे झाली त्या संस्थेत वैदिक ,धार्मिक, वेदशास्त्राचे शिक्षण घेत असताना प्रत्येक वर्षी प्रथम येण्याचा मान महेश ने मिळवला आहे . त्याला असलेली आवड व रुची लक्षात घेऊन गुरुकुलाच्या प्रमुखांनी त्याची पुढील शिक्षणासाठी वाराणसी येथे निवड केली होती . महंत गोविंददेव गिरीजी महाराज यांनी महेश दायमा यांचा सन्मान करतांना त्याची आस्थेने चौकशी करून पुढील वाटचालीस भरभरून शुभाशीर्वाद दिलेत .महेश दायमा यास दधिमती वैदिक गुरुकुल संस्थेचे अध्यक्ष सोहनलाल दायमा ,सचिव हरिनारायण व्यास ,कोषाध्यक्ष जय किशन संचालक समिती अध्यक्ष भालचंद्र व्यास, सहसचिव रूपनारायण असोपा, अध्यापक कमल किशोर जोशी तसेच सुभाष मिश्रा आदींचे मार्गदर्शन लाभले

लखनौ (गौरव डेंगळे):SGFI ने ही पद्धत लागू केली कारण अनेक वेळा खेळाडूंना शाळा संपल्यानंतर किंवा इतर कारणांमुळे खेळात सातत्य ठेवता येत नाही,पण त्यांनी पूर्वी दिलेला परफॉर्मन्स महत्त्वाचा असतो.त्यामुळे मागील दोन वर्षांतील अधिकृत सहभागाचे सर्टिफिकेट खेळाडूच्या पात्रतेसाठी ग्राह्य धरले जाते.

स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडियाने डिजीलॉकर इंटिग्रेशनसह डिजिटल परिवर्तन स्वीकारले आहे.लखनौ क्रीडा प्रशासनातील डिजिटल परिवर्तनाच्या दिशेने एक महत्त्वाचा उपक्रम म्हणून,भारत सरकारच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या निर्देशानुसार, भारतीय स्कूल गेम्स फेडरेशन (SGFI) ने त्यांची सर्व क्रीडा प्रमाणपत्रे डीजीलॉकर सह यशस्वीरित्या एकत्रित केली आहेत.यासह,संपूर्ण भारतातील तरुण खेळाडूंसाठी अखंड आणि सुरक्षित प्रवेश सुनिश्चित करून, डीजी लॉकर द्वारे प्रमाणपत्रांचे पूर्ण-प्रमाणात डिजिटल वितरण कार्यान्वित करणारी SGFI ही पहिली राष्ट्रीय महासंघ बनली आहे.

यावेळी डॉ. मनसुख मांडविया केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री, यांनी SGFI च्या उपक्रमाचे कौतुक केले,ते म्हणाल की डिजिलॉकरद्वारे क्रीडा प्रमाणपत्रांचे डिजिटायझेशन हे क्रीडा प्रशासनातील एक क्रांतिकारी पाऊल आहे.यामुळे आमच्या युवा खेळाडूंना सक्षम बनवेल आणि प्रणाली अधिक कार्यक्षम आणि पारदर्शक होईल."

रक्षा खडसे,युवा कार्य व क्रीडा राज्यमंत्री, म्हणाल्या की या डिजिटल परिवर्तनाचा भारतातील लाखो तरुण खेळाडूंना फायदा होईल. आमच्या भावी चॅम्पियन्सना समर्थन देणारी आणि त्यांचे पालनपोषण करणारी एक मजबूत डिजिटल स्पोर्ट्स इकोसिस्टम तयार करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

तंत्रज्ञान हे आता केवळ सक्षम करणारे नाही, तर ते विकासाचा आधार आहे. आम्ही एक तंत्रज्ञानावर आधारित प्रणाली तयार करत आहोत जी प्रामाणिक आणि पारदर्शक आहे.मंत्रालयाद्वारे मान्यताप्राप्त सर्वात मोठ्या राष्ट्रीय क्रीडा महासंघांपैकी एक असलेल्या SGFL ने या डिजिटल परिवर्तनाची अंमलबजावणी करण्यासाठी एक अग्रगण्य पाऊल उचलले आहे. या उपक्रमाच्या अनुषंगाने,आम्ही तुम्हाला कळवू इच्छितो की भारतीय शालेय खेळ महासंघाने डिजीलॉकर प्रणालीवर आधीच अपलोड केले आहे.

68 व्या राष्ट्रीय शालेय खेळ (2024-25): 59,637 प्रमाणपत्रे 67 व्या राष्ट्रीय शालेय खेळ (2023-24): 60,385 प्रमाणपत्रे


हे डिजीलॉकर प्लॅटफॉर्मवर प्रकाशित 1,20,000 हून अधिक प्रमाणपत्रे (सहभाग आणि गुणवत्ता) एकत्रित उपलब्ध आहे.आम्हाला विश्वास आहे की दोन पूर्ण वर्षांचा डेटा कव्हर करणारी एवढ्या मोठ्या प्रमाणातील प्रमाणपत्रांचे योगदान देणारे आम्ही पहिले राष्ट्रीय क्रीडा महासंघ असणार आहे असे माहिती माननीय श्री दीपक कुमार (SGFI चे JAS अध्यक्ष) तसेच SGFI च्या सन्माननीय कार्यकारी समिती सदस्यांसह,हा उपक्रम प्रत्यक्षात अमलात आणण्याचा मोलाचा वाटा आहे.

68 व्या राष्ट्रीय चॅम्पियनशिप (2024-2025) आणि 67 व्या राष्ट्रीय स्पर्धेतील (2023-24) सर्व प्रमाणपत्रे आता उपलब्ध आहेत.

गौरव डेंगळे/श्रीरामपूर:खेलो इंडिया युथ गेम्सच्या ७ व्या आवृत्तीत कबड्डीमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्यासाठी पढेगावकर वीरेंद्र मुंडलिकची निवड झाली आहे. ४ मे ते १५ मे २०२५ दरम्यान बिहारमध्ये या प्रतिष्ठित क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले जाईल.

पुण्यातील बालेवाडी स्टेडियमवर झालेल्या राज्य चाचण्यांमध्ये वीरेंद्रने अपवादात्मक कौशल्ये दाखवली,ज्यामुळे त्याला राज्य संघात स्थान मिळाले.त्याला राष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक, NSNIS कोच महेश कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण देण्यात आले आहे,ज्यांच्या मार्गदर्शनाने वीरेंद्रच्या निवडीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

वीरेंद्र हा यशवंत विद्यालय पढेगावचा विद्यार्थी आहे.

या तरुण खेळाडूचा संघात समावेश केल्याने त्याचे समर्पण आणि प्रतिभा अधोरेखित होते आणि तो आगामी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत जोरदार प्रभाव पाडेल अशी अपेक्षा आहे.राज्य संघात निवड झाल्याबद्दल श्रीरामपूर तालुका क्रीडा समितीचे अध्यक्ष शिरोळे सर, काका चौधरी,नितीन बलराज, संभाजी ढेरे,अजित कदम तसेच तालुक्यातील विविध मान्यवरांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

श्रीरामपूर प्रतिनिधी श्रीरामपूर तालुक्यातील फत्याबाद येथील बाबासाहेब बाळाजी आठरे राहणार फत्याबाद  यांच्या घरी दिनांक 20 एप्रिल रोजी रात्री दरोड्याचा प्रयत्न झाला यावेळी त्यांची सून हर्षदा हीने आरडाओरडा केल्यामुळे चोरटे पळून गेले परंतु आपल्याला ओळखले असावे असा समज झाल्याने आज सायंकाळी हर्षदा तिच्यावर ऍसिड फेकण्याची घटना घडली असून  या प्रकारामुळे परिसरात घबराट पसरली आहे.                  याबाबत सविस्तर वृत्त असे की फत्याबाद येथील  बाबासाहेब आठरे हे दिनांक रविवार दिनांक 20 एप्रिल रोजी रात्री जेवण करून झोपले असता पहाटेच्या वेळेस तिन ईसम त्यांच्या घरात घुसले व त्यांनी सर्वांच्या तोंडावर स्प्रे मारला त्यावेळी त्यांची सुनबाई हर्षदा ही बाथरूमला गेलेली होती त्यादरम्यान चोरट्याने सर्व उचका पाचक केली काही दागिन्याचे गाठोडे बांधले व रोख रक्कम सोबत घेतली नेमकी त्याच वेळेस हर्षदा आठरे ही बाथरूम मधून बाहेर आली व घरात उचकापाचक करत असलेले पाहून जोरात आरडाओरड केली त्यावेळी शेजारीच असलेले आठरे यांचे पुतणे गणेश आठरे सुभाष आठरे चेतन आठरे हे धावत आले हे पाहून चोरट्याने सोन्याचे दागिने असलेले गाठोडे वरून खाली फेकले व दुसऱ्या मजल्यावरून उड्या मारल्या व नागरिक येत असल्यामुळे ते आपला जीव वाचून पळाले परंतु त्यांना वाटले की या महिलेने आपल्याला ओळखलेले आहे त्यामुळे दोन दिवसापासून या महिलेच्या मार्गावर ते चोरटे होते कालही त्या महिलेला वीट फेकून मारली होती परंतु ती थोडक्यात बचावली आज बाबासाहेब आठरे यांची सून हर्षदा आठरे ही मुलीला घेऊन फत्याबाद येथे दवाखान्यात आली होती सोबत बाबासाहेब आठरे यांची पुतणी ही देखील होती दवाखान्यातून परत जात असताना दोन इसम मोटरसायकलवर आले व त्यांनी स्कुटीवर चाललेल्या या दोन महिलेच्या अंगावर ऍसिड फेकण्याचा प्रयत्न केला त्यात हर्षदा तिची पाठ भाजली व बाबासाहेबांचे पुतणीच्या छातीला भाजलेले आहे त्यांना तातडीने प्रवरणागर येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले हा हल्ला केवळ आपल्याला ओळखले आहे या गैरसमजुतीतुन झालेला असावा असा संशय व्यक्त केला जात आहे

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget