Latest Post


श्रीरामपूर (प्रतिनिधी ) माजी आ. भानुदास मुरकुटे व जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे यांच्या अधीपत्याखालील श्रीरामपूर तालुका कृषि उत्पन्न बाजार समितीने पुढील आर्थिक वर्ष 2025- 26 या आर्थिक वर्षासाठी 16 कोटींचा अर्थसंकल्प सादर केला आहे, अशी माहिती सभापती सुधिर नवले पा. यांनी दिली आहे.


यंदाच्या अर्थसंकल्पाप्रमाणे 5 कोटींचे एकुण उत्पन्न अपेक्षित आहे. त्यानुसार 1 कोटी 38 लाखांचा वाढावा होणार आहे.यंदाच्या अर्थसंकल्पात 8 कोटी 70 लाख रुपयांची विविध विकास कामे हाती घेण्यात आली आहेत.त्यात श्रीरामपूर नगर परिषद रोडलगत 5 कोटी खर्चाच्या भव्य शेतकरी मॉलमध्ये शॉपिंग सेंटरची उभारणी करण्यात येणार आहे.शेती महामंडळाची जमीन अधिग्रहण करण्यात येणार आहे.


श्रीरामपूर येथील मुख्य कार्यालय समोरील मुख्य रस्ता तसेच बेलापूर व टाकळीभान येथील अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण, टाकळीभान येथे नवीन पेट्रोल पंपाची उभारणी, श्रीरामपूर येथील मुख्य बाजाराच्या आवारात साठवण टाकी अंतर्गत पाईपलाईन करणे व नियोजित डाळिंब मार्केट आदी कामे हाती घेतली आहेत, असेही नवले यांनी सांगितले.


त्यांनी पुढे सांगितले की, सध्या श्रीरामपूर येथील मुख्यालयाच्या आवारात कांदा मार्केटमध्ये 2 कोटी खर्चाच्या रस्त्याचे काँक्रिटिकरण,दिड कोटी रुपये खर्चाच्या 15 गाळ्यांचे पूर्णत्वाकडे आहेत.बेलापूर उपबाजारात 60 लाख रुपये खर्चाच्या रस्त्याचे काँक्रिटिकरण व 12 लाख खर्चाच्या दुकान गाळ्यांची दुरुस्ती तसेच टाकळीभान येथील उपबाजारात साडेनऊ लाख खर्चाच्या दुकान गाळयांच्या दुरुस्तीचे काम सुरु सुरु आहे.


बाजार समितीची सर्व विकास कामे शेतकरी केंद्रास्थानी ठेऊन सुरु आहेत.प्रस्तावित कामांमबरोबरच श्रीरामपूर येथील पेट्रोल पंप आवारात सीएनजी गॅस केंद्र सुरु करण्याचा संचालक मंडळाचा मानस आहे.संस्थेची 30 एप्रिल 2023 रोजी निवडणूक होऊन आपण 13 मे 2023 पासुन कारभार हाती घेतला असुन संस्थेचा कारभार काटकसरीने आणि पारदर्शी पद्धतीने सुरु असल्याचे सभापती सुधिर नवले आणि सचिव साहेबराव वाबळे यांनी सांगितले.

 


बेलापूर(प्रतिनिधी)-- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने पुणे विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त देण्यात येणाऱ्या पुरस्काराची घोषणा नुकतीच करण्यात आली. या पुरस्कारात उत्कृष्ट अध्यापक पुरस्कारार्थी म्हणून उक्कलगाव तालुका श्रीरामपूर येथील रहिवाशी प्राध्यापक डॉक्टर अतिश श्रीकिसन मुंदडा यांची निवड करण्यात आली असून त्यांच्या निवडीबद्दल अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.                                            सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा वर्धापन दिन 10 फेब्रुवारी रोजी होत असतो आणि या वर्धापन दिनाचे औचित्य साधून शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्राध्यापकांना सन्मानित करण्यात येते.  शैक्षणिक वर्ष 2024-25 चा व्यावसायिक महाविद्यालय (ग्रामीण विभाग) उत्कृष्ट अध्यापक पुरस्कार उक्कलगाव येथील रहिवासी श्रीकिसन मोतीलाल मुंदडा यांचे चिरंजीव प्राध्यापक डॉक्टर अतिश मुंदडा यांना दिला जाणार आहे. डॉक्टर अतिश मुंदडा हे सध्या चांदवड फार्मसी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करत आहे. डॉक्टर आतिश मुंदडा यांचे शालेय शिक्षण उक्कलगाव येथे झाले असून महाविद्यालयीन शिक्षण अमरावती व नागपूर येथे झाले. ते चांदवड महाविद्यालयात सन 2008 पासून कार्यरत आहे आणि या कालावधीत त्यांनी विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे उपक्रम राबविले तसेच वेगवेगळे संशोधन प्रकल्प सादर केले तसेच त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांची दखल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने घेतली असून पुणे विद्यापीठ ग्रामीण विभागातील विविध व्यावसायिक महाविद्यालयाच्या प्राध्यापकांमध्ये प्राध्यापक अतिश मुंदडा यांचे काम सरस ठरल्यामुळे त्यांना हा मानाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराचे वितरण 10 फेब्रुवारी रोजी विद्यापीठाच्या प्रांगणात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. प्राध्यापक डॉक्टर आतिश मुंदडा यांनी एका ग्रामीण भागातून खडतर मेहनत घेऊन आपले शिक्षण पूर्ण केले व या मानाच्या पुरस्काराला गवसणी घातली म्हणून त्यांचे विशेष कौतुक होत आहे. या पुरस्काराच्या घोषणेची माहिती चांदवड फार्मसी महाविद्यालयात समजतात महाविद्यालयाच्या सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी फटाके फोडून व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला तसेच संस्थेचे विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष बेबीलालजी संचेती यांच्या हस्ते व आमदार डॉक्टर राहुल आहेर व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत प्रजासत्ताक दिनी त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यांच्या यशात त्यांचे माता पिता सौ लीलाबाई मुंदडा श्री किसन मुंदडा सौ विमल राठी शरद चांडक यांचा मोलाचा सहभाग आहे या यशाबद्दल उक्कलगावचे उपसरपंच नितीन थोरात ग्रामपंचायत सदस्य दिले थोरात शामराव नागरे संजय थोरात पत्रकार देविदास देसाई गोविंद श्रीगोड तसेच बेलापूर पंचक्रोशीतील त्याच्या मित्र परिवाराने आणि नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केले.


श्रीरामपूर - नगरपालिकेने सात दिवसापूर्वी दिलेल्या नोटिसीची मुदत संपल्यानंतर आज सकाळी साडेदहा वाजता नगरपालिकेचे अतिक्रमणविरोधी विभागाने मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप, अतिक्रमण अधिकारी संजय शेळके, नगर अभियंता सूर्यकांत गवळी आदींच्या फौज फाट्यासह बेलापूर रोड पासून रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केली.मोठ्या प्रमाणात लोकांच्या मालमत्तेची नासधूस झाल्याचे दिसून आले.

सदर मोहीम राबविताना पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 

श्रीरामपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक डॉक्टर बसवराज शिवपुजे व शहर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली विशेष कृती दलाच्या तुकडीसह महिला पोलीसही यामध्ये सहभागी झाले असून पोलिसांचा मोठा बंदोबस्त असल्याने कोणीही फारसा प्रतिकार केला नाही. दोन जेसीबी, फायर फायटरची गाडी आणि इतर नगरपालिकेचा स्टाफ यांच्या सहकार्याने सदरची अतिक्रमण मोहीम राबविली जात आहे. यावेळी रस्त्यावर बघ्यांची खूप मोठी गर्दी झालेली आहे .

बेलापूर रोडला पश्चिम बाजूने ही मोहीम सुरू झाल्यानंतर पूर्वेकडील लोकांनी स्वयंस्फूर्तीने आपली अतिक्रमणे काढायला सुरुवात केली आहे. खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पत्र्याचे शेड, दुकाने पुढे आल्याचे दिसून आले. अनेकांनी आपले सामान हलवण्यासाठी पूर्ण कुटुंब रस्त्यावर उतरवल्याचे ही दिसत आहे.

सदरची अतिक्रमण मोहीम थांबवावी किंवा दुकानदारांचा सहानुभूतीने विचार करावा याबाबत शहरातील राजकीय पक्षाच्या नेतेमंडळींनी जिल्हाधिकाऱ्यांना जाऊन साकडे घातले.आमदार हेमंत ओगले, माजी नगराध्यक्ष अनुराधाताई आदिक, माजी उपनगराध्यक्ष करण ससाने आदींनी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून याबाबत विनंती केली. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी शासन नियमानुसार कारवाई करण्याचे आदेश मुख्याधिकाऱ्यांना दिल्याने पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार ही मोहीम राबविली जात आहे.

सदरची मोहीम सुरू राहणार असून नागरिकांनी आपापली अतिक्रमणे काढून घेऊन आपले नुकसान टाळावे व नगरपालिकेला सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांनी केली आहे.

बेलापूर (प्रतिनिधी)- येथील सत्यमेव जयते सुप्रभात ग्रुपच्या वतीने वार्तालाप,हळदी कुंकू व स्नेहभोजन असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचा महिलांनी व सत्यमेव जयते ग्रुपच्या सदस्यांनी तसेच बाळ गोपाळानी मन मुराद आनंद लुटला.  सत्यमेव जयते सुप्रभात ग्रुपच्या वतीने नुकताच अनमोल रसवंती गृह याठिकाणी सहकुटुंब हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .या उपक्रमाचा उद्देश सांगताना सत्यमेव जयते ग्रुपचे देविदास देसाई व अभिषेक खंडागळे यांनी सांगितले की महिलांना दररोजच्या कामातून थोडीशी मोकळीक मिळावी किचन, टीव्ही आणि मोबाईल या विळख्यातून महिलांना बाहेर काढण्याकरिता या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात अनेकांनी आपली कला सादर केली इरफान जागीरदार यांनी दाताने नारळ सोलून दाखविला अनेकांनी सुंदर असे उखाणे घेऊन या कार्यक्रमाचे रंगत वाढवली काहींनी आपल्या आयुष्यात आलेले अनुभव तसेच चुटकुले विनोद सांगितले कार्यक्रमाची सुरुवात किरण गागरे यांच्या अंजनीच्या सुता तुला रामाचे वरदान या भजनाने झाली अनेक महिलांनीही या मनमुराद गप्पागोष्टी मध्ये सहभाग नोंदविला व आपल्या विचारांना वाट मोकळी करून दिली यावेळी सौ प्रतिभा देसाई रत्नमाला डावरे मानवी खंडागळे राजश्री गुंजन आरती अंबिलवादे नयना बोरा जयश्री अमोलिक कावेरी गागरे मयुरी आंबेकर योगिता काळे तुझ्या दाणी सोनाली देवरे सुवर्णा सोनवणे संगीता घोंडगे संजीवनी सूर्यवंशी यांच्यासह अभिषेक खंडागळे देविदास देसाई, विष्णुपंत डावरे,संजय भोंडगे, दिपक क्षत्रिय, संपत बोरा, किरण गागरे, विशाल आंबेकर, महेश ओहोळ, बाबासाहेब काळे, बाबुलाल पठाण, इरफान शेख,संदिप सोनवणे,दिलीप अमोलिक, बाबासाहेब काळे,गोपी दाणी,सुरेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते

इंटरनेटच्या अतिवापरामुळे वाचन संस्कृती राहिली नाहीपोलिस उपनिरीक्षक चौधरी

बेलापूर (प्रतिनिधी) वाचाल तर वाचाल, वाचाल तर शिकाल, वाचाल तर टिकाल आणि वाचनासाठी गरज आहे ती पुस्तकाची. वाचनाने वक्ता, श्रोता, नेता तयार होतो त्याचबरोबर उत्तम श्रवण कौशल्य जीवनात योग्य मार्ग दाखवित असल्याचे मत सात्रळ  कॉलेजचे मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक नवनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.                   


श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे सिद्धेश्वर ग्रामीण ग्रंथालय व वाचनालय आयोजित वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमाच्या सांगता समारोहप्रसंगी तसेच संस्थेने घेतलेल्या वकृत्व स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते कार्यक्रमचे अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष आदिनाथ वडीतके हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून पोलीस उपनिरीक्षक आशिष चौधरी, प्राध्यापक डॉक्टर एकनाथ ढोणे, वनपाल अक्षय बडे ह. भ. प. बापूसाहेब चिंधे,प्रशांत विटनोर,सोसायटीचे चेअरमन सोन्याबापु जाटे आदी मान्यवर उपस्थित होते. आपल्या भाषणात प्राध्यापक शिंदे म्हणाले की आज समाजात समाजासाठी धडपड करणाऱ्या माणसाची उणीव भासत आहे प्रत्येक जण स्वतःच हित पाहून कार्य करत आहे. आपल्या पूर्वजांनी बलिदान दिले नसते आज समाजासाठी धडपडणारे माणसं खूप कमी आहे पुस्तक हे माणसाचं मन निर्मळ करणारी साबण आहे. असेही  प्राध्यापक शिंदे म्हणाले.

 

     यावेळी बोलताना पोलीस उपनिरीक्षक आशिष चौधरी म्हणाले की इंटरनेटच्या अतिवापरामुळे वाचन संस्कृती लोक पावत चालली आहे. तरुणांमध्ये संयम राहिलेला नाही रागाच्या भरात तरुणांकडून अनेक अपराध घडत आहेत. शासनाने राबविलेले वाचन संकल्प हा महाराष्ट्राचा अभिनव उपक्रम केवळ विद्यार्थ्यांसाठी नसून तो सर्वांसाठी आहे. असेही पोलीस उपनिरीक्षक चौधरी म्हणाले.

सचिव सुनील शिंदे यांनी प्रस्तविक केले वाचन संकल्प महाराष्ट्राचा पंधरवड्याच्या सांगता समारोह कार्यक्रम प्रसंगी ग्रंथ प्रदर्शन, ग्रंथालय परिसराची सामूहिक स्वच्छता, ग्रंथ प्रदर्शन, ग्रंथ वाचन आदी उपक्रम राबविण्यात आले आहे. राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार १ जानेवारीपासून सुरू झालेला हा उपक्रम १५ जानेवारीपर्यंत राबविला आहे. आज आपल्या ग्रंथालयामध्ये १३४६५ ग्रंथ उपलब्ध असून नियमित वचकांसाठी १३ वृत्तपत्र व मासिकही उपलब्ध आहे.असे  सचिव शिंदे यांनी सांगितले.

     यावेळी प्राध्यापक डॉक्टर एकनाथ ढोणे, विद्यार्थिनी प्रिया वडीतके यांची भाषणे झाली.

      यावेळी वनपाल अक्षय बडे, 

ह.भ.प. बापूसाहेब चिंधे सर, सोसायटीचे चेअरमन सोन्याबापु जाटे,मुख्याध्यापक म्हसे सर, जि.प.शाळेचे मुख्याध्यापक चित्ते मॅडम, संस्थेचे संचालक चंद्रकांत वडीतके,शिंदे सर , तुपे सर, दळवी सर,, काटकर सर, रवींद्र काळे सर, दळवी सर, सौ.शिंदे,सौ.बेलकर,पंढरीनाथ भोसले, संजय विश्वासे, वृक्षसंवर्धक अजित देठे, ग्रंथपाल सुभाष भोसले, शिवाजी कोऱ्हाळे, संदीप शेरमाळे, रमेश भोसले, इंद्रभान तुपे,आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन व प्रस्ताविक संस्थेचे सचिव सुनील शिंदे यांनी तर आभार सौ वाघ मॅडम यांनी मांडले.

गौरव डेंगळे/नवी दिल्ली/१७/१/२०२५ भारतीय महिला खो खो संघाने उपांत्यपूर्व फेरीत बांगलादेशचा धुव्वा उडवला.यासह भारताने उपांत्य फेरीत धडक मारली आहे.भारताचं वर्ल्डकप जेतेपद फक्त दोन विजय दूर आहे. भारताने चौथ्या सामन्यात १०० गुणांचा आकडा पार केला आहे. भारताचा उपांत्य फेरीत सामना दक्षिण अफ्रिकेशी होणार आहे.भारतीय महिला संघाने उपांत्यपूर्व फेरीत जबरदस्त खेळी केली. भारतीय कर्णधार प्रियांका इंगळे हीने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम अटॅक करण्याचा निर्णय केला.पहिल्या डावात भारताने एकही ड्रीम रन दिला नाही.त्यामुळे पहिल्या डावात भारताने ५०-० अशी आघाडी मिळवली होती.ही आघाडी कमी करण्याचं मोठं आव्हान बांगलादेशपुढे होतं.पण बांगलादेशने हा फरक कमी करण्याऐवजी ६ ड्रिम पॉईंट्स दिले.तर अटॅक करताना फक्त ८ गुण मिळवले.म्हणजेच दुसऱ्या डावात बांगलादेशकडे फक्त २ गुण होते.तर भारताकडे ४८ गुणांची आघाडी होती.तिसऱ्या डावात अटॅक करताना भारताने आक्रमक अटॅक केला.एका पाठोपाठ एक बॅच तंबूत पाठवत होते.त्यामुळे भारताच्या पारड्यात एका पाठोपाठ एक गुण मिळत होते. तिसऱ्या डावात भारताकडे १०६ गुण होते. त्यामुळे तिसऱ्या डावातच भारताचा विजय पक्का झाला होता. कारण ९८ धावांची आघाडी भारताकडे होती. त्यामुळे चौथ्या डावात अटॅक करून ९८ धावांचा फरक कमी करणं कठीण होतं.त्यात भारताने चौथ्या डावातही ड्रीम रनही मिळवला.भारताने हा सामना १०९-१६ गुणांनी जिंकला.


उपांत्यपूर्व फेरीचे निकाल:

पहिला उपांत्यपूर्व सामना: युगांडाचा न्यूझीलंडवर ७१-२६ ने विजय. 

दुसरा उपांत्यपूर्व सामना: दक्षिण आफ्रिकेचा केनियावर ५१-४६ ने विजय. 

तिसरा उपांत्यपूर्व सामना: नेपाळचा इराणवर १०३-०८ ने विजय. 

चौथा उपांत्यपूर्व सामना: भारताचा बांगलादेशवर १०९-१६ ने विजय.

बेलापूरःबेलापूर बु ग्रामंचायतीच्या उपसरपंच पदावर नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील तसेच जि.प.सदस्य शरद नवले व कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती अभिषेक खंडागळे यांच्या नेतृत्वाखालील गावकरी मंडळाच्या सौ.प्रियंका प्रभात(केशव) कु-हे यांची बिनविरोध निवड झाली.                                  उपसरपंच पदासाठी सरपंच स्वाती अमोलिक यांचे अध्यक्षतेखाली सदस्यांची बैठक संपन्न झाली.बैठकीस मावळत्या उपसरपंच तबसुम बागवान ,अभिषेक खंडागळे,मुश्ताक शेख,चंद्रकांत नवले,उज्वला कुताळ,सुशिलाबाई पवार, मीना साळवी, शिलाताई पोळ,वैभव कु-हे,भरत साळुंके,रमेश अमोलिक आदी सदस्य उपस्थित होते.निर्धारित वेळेत सौ.प्रियका कु-हे यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची उपसरपंच पदावर बिनविरोध निवड झाल्याचे ग्रामविकास अधिकारी निलेश लहारे यांनी जाहीर केले.    निवडीनंतर आभाराच्या सभेत शरद नवले,अभिषेक खंडागळे,जालिंदर कुऱ्हे,भास्करराव खंडागळे,विष्णुपंत डावरे, भाऊसाहेब कुताळ आदिंची भाषणे झाली.याप्रसंगी जालिंदर कु-हे,भाऊसाहेब कुताळ,प्रफुल्ल डावरे,बाळासाहेब दाणी,सुरेश बाबुराव कुऱ्हे,रावसाहेब अमोलिक,सचिन वाघ, रमेश काळे,भाऊसाहेब तेलोरे,अजिज शेख, जब्बार पठाण,अशोक कुऱ्हे,विष्णूपंत कुऱ्हे,शफिक बागवान,बाबुलाल पठाण,प्रशांत मुंडलिक, मास्तर हुडे, हेमंत मुथा,योगेश राकेचा,बाबुराव पवार,महेश कु-हे,विशाल आंबेकर,दादासाहेब कुताळ,रफिक शेख,शशिकांत तेलोरे, सुभाष शेलार,अशोक आंबिलवादे,बाळासाहेब शेलार,पञकार देविदास देसाई,दिलिप दायमा,सोमनाथ शिरसाठ,अभिषेक निर्मळ, नितीन खोसे, प्रकाश साळुंके, राम कुऱ्हे,कान्हा लगे,ग्रामस्थ तसेच यांचेसह गावकरी मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget