Latest Post

बेलापूर 1(प्रतिनीधी) --अहिल्यानगर जिल्हा ग्रंथालय विश्वस्त संस्था म्हणजे अहिल्यानगर जिल्हा वाचनालय संस्था या संस्थेवर संचालक तथा विश्वस्त म्हणून बेलापूर  येथील प्राध्यापक बाबासाहेब शेलार यांची निवड करण्यात आली आहे . अहिल्यानगर जिल्हातील 514 शासनमान्य ग्रंथालय व शेकडो इतर ग्रंथालय यामधुन श्रीरामपूर तालुक्यातील प्रतिनिधी म्हणून प्राध्यापक बाबासाहेब शेलार यांची निवड करण्यात आली आहे. वाचन चळवळ गतिमान व्हावी ग्रंथालय सुसज्ज होऊन वाचनाची आवड निर्माण व्हावी तरुण पिढीला वाचनातून सत्य समजावे व्हाट्सअप फेसबुक ट्वीटर इन्स्टाग्राम यातुन त्यांनी बाहेर यावे यासाठी जिल्हा ग्रंथालय संघ काम करत आहे जिल्हा ग्रंथालय संघाने आजवर अनेक सांस्कृतिक शैक्षणिक उपक्रम राबविलेले आहेत वाचन चळवळ वाढावी यासाठी जिल्ह्यातील हा एकमेव अधिकृत ग्रंथालय संघ आहे आणि या संघावर संचालक म्हणून शेलार यांची बिनविरोध निवड झाली आहे त्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे प्राध्यापक शेलार यांना नुकताच महाराष्ट्र शासनाने त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार देवुन त्यांच्या कामाचा गौरव केला आहे  बेलापूर खुर्द मध्ये जागृती प्रतिष्ठान व सार्वजनिक वाचनालयाच्या माध्यमातून ते सामाजिक व वाचन चळवळ चालवतात.त्याच्या या निवडीबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे


नाशिक (गौरव डेंगळे):- नाशिकचा तलवारबाजीचा  खेळाडू विरल मनोज म्हस्के याची जम्मू - काश्मीर येथे आयोजित राष्ट्रीय शालेय तलवारबाजी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. दिनांक २४ ते २६ ऑक्टोबर, २०२४ दरम्यान छत्रपती संभाजीनगर येथे महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत ईपी या प्रकारात विरलने नाशिक विभागाचे प्रतिनिधित्व केले. या राज्य स्पर्धेत विरलने सुंदर खेळ करून कास्य पदक पटकावले. त्याच्या या कामगिरीची दाखल घेऊन त्याची दिनांक १२ ते १६ नोव्हेंबर, २०२४ दरम्यान जम्मू - काश्मीर येथे आयोजित ६८ व्या राष्ट्रीय शालेय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेत तो महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करेल.  

 याआधी नाशिक येथे झालेल्या जिल्हा शालेय स्पर्धेत विरलने प्रथम क्रमांक मिळविला होता. तर त्यानंतर आयोजित नाशिक विभागीय स्पर्धेतही त्याने हीच लय कायम राखत सुवर्ण पदकाची पुनरावृत्ती केली होती. तर छत्रपती संभाजीनगर  येथे पार पडलेल्या राज्य स्पर्धेतही विरलने अशीच उत्तम कामगिरी करून कास्य पदक मिळविले. 

विरलने अपेक्षेप्रमाणे राज्य स्पर्धेत उत्तम कामगिरी करून कास्य पदक पटकावत राष्ट्रीय स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित केली आहे. या राष्ट्रीय स्पर्धेतही तो सातत्य राखून पदक मिळवेल असा विश्वास त्याचे प्रशिक्षक प्रसाद परदेशी यांनी व्यक्त केला. विरलने याआधी १२ वर्षे वयोगटात महाराष्ट्राच्या संघातर्फे राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेतला आहे. तर बुलढाणा येथे पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेत कांस्यपदक मिळविले होते.  विरल सॅक्रेड हार्ट स्कुलमध्ये  शिकत असून त्याच्या निवडीबद्दल शाळेच्या प्रिन्सिपल सिस्टर ट्रेसी, क्रीडा शिक्षक गणेश राऊत आणि सर्व शिक्षकानी अभिनंदन करून राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.  याचबरोबर नाशिक जिल्हा तलवारबाजी असोसिएशनचे सचिव राजू शिंदे, क्रीडा संघटक अशोक दुधारे, आनंद खरे. दिपक निकम, जय शर्मा, आनंद चकोर, राहुल फडोळ,  यांनी विरलचे अभिनंदन केले आणि राष्ट्रीय स्पर्धेमध्ये विरल अशीच कामगिरी करेल अश्या अपेक्षा व्यक्त केल्या.

संक्रांपुर  (प्रतिनिधी  )-संक्रापूर विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीची  वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन व्हा चेअरमन  सर्व संचालक व सभासदांच्या उपस्थितीत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.या वेळी आनंदाच्या शिधाचेही वितरण करण्यात आले .वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी सेवा संस्थेचे चेअरमन श्री महेबूबभाई शेख हे होते यावेळी  चेअरमन व व्हा चेअरमन संचालक मंडळानी संस्थेला स्वस्त धान्य दुकान सुरु करुन दिल्याबद्दल आभार मानले. या वेळी गौरी गणपती निमित्त शासनाने दिलेल्या आनंदाच्या शिधाचे वितरणही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले .संस्था नफ्यात आणण्यासाठी काय केले पाहीजे यावर चर्चा झाली. सभेला माजी चेअरमन नबाजी जगताप कल्याण जगताप पत्रकार देविदास देसाई दादासाहेब जगताप , भरतरी नाथ सालबंदे जालिंदर सालबंदे बाळासाहेब चोखर ज्ञानदेव होन  अर्जुन होन रामराव होन द्वारकनाथ चव्हाण बाबासाहेब जगताप राजेंद्र जगताप संजय जगताप कादर भाई शेख दावल भाई शेख चांद भाई शेख जालिंदर चव्हाण विजय रोकडे बबनराव खेमनर सिताबाई खेमनर बाळासाहेब बोरावके मिंलींद बोरवके इंद्रभान पांढरे कुंडलिक खेमनर त्र्यंबकराव जगताप पंढरीनाथ जगताप चंद्रभान जगताप भगीरथ रोकडे आदिसह ग्रामस्थ उपस्थित होते.

कोपरगांव (गौरव डेंगळे): 3A साईड व्हॉलिबॉल फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने आत्मा मालक क्रीडा संकुल येथे पहिली राष्ट्रीय 3A साईड राष्ट्रीय व्हॉलिबॉल स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेमध्ये पुरुष विभागात व महिला विभागात तेलंगा संघाने विजेतेपद पटकावून दुहेरी मुकुट संपादन केला.

राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी भारतातून महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक,गुजरात, पंजाब, राजस्थान, छत्तीसगढ, पाँडिचेरी,उत्तर प्रदेश,देहू दमन या राज्यातून १५० खेळाडूंसह २५ स्पर्धा अधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवला होता.

राष्ट्रीय स्पर्धा दोन गटांमध्ये खेळण्यात आली होती.१४ वर्षाखालील मुला-मुलींचा गट तर पुरुष व महिला खुला गट.

तीन दिवस रंगलेल्या या व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये १४ वर्षाच्या मुला मुलींच्या गटांमध्ये दमन संघाने विजेतेपद पटकावले. पुरुष व महिला गटामध्ये तेलंगणा संघाने दुहेरी विजेतेपद पटकावले. राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन कोपरगावचे तहसीलदार श्री महेश सावंत, आत्मा मालिक ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी, पत्रकार श्री स्वामीराज कुलथे,3A साईड व्हॉलिबॉल फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष व्ही एस ए राजू, सचिव श्री मारुती हजारे,नितीन बलराज,शैलेंद्र त्रिपाठी आधीच्या उपस्थितीत संपन्न झाले. स्पर्धेचे पंच प्रमुख म्हणून एस निसंग व योगेश तावडे यांनी काम बघितले.सामना अधिकारी म्हणून श्री लक्ष्मण,बी भरत,जी किरण व एम चंद्र यांनी काम पाहिले. स्पर्धेसाठी तांत्रिक अधिकारी म्हणून रुचन्द्र कुमार  व पंकज वेंगला यांनी जबाबदारी संभाळली. दुसरी राष्ट्रीय 3A साईड व्हॉलीबॉल स्पर्धा ही डिसेंबर महिन्यात तेलंगणा राज्यात रंगणार असल्याची माहिती संघटनेचे सचिव श्री मारुती हजारे यांनी दिली.


*3A राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे:*


*१४ वर्षाखालील मुले:*

प्रथम क्रमांक: दमन 

द्वितीय क्रमांक: कर्नाटक

तृतीय क्रमांक: महाराष्ट्र 


*१४ वर्षाखालील मुली:*

प्रथम क्रमांक: दमन 

द्वितीय क्रमांक: आंध्र प्रदेश

तृतीय क्रमांक: महाराष्ट्र 


*पुरुष:*

प्रथम क्रमांक: तेलंगणा

द्वितीय क्रमांक: पांडिचेरी

तृतीय क्रमांक: पंजाब


*महिला:*

प्रथम क्रमांक: तेलंगणा

द्वितीय क्रमांक: देहू दमन

तृतीय क्रमांक: छत्तीसगड

कोपरगाव ( गौरव डेंगळे): आई-वडिलांनंतर शिक्षक हेच विद्यार्थ्यांचे खरे गुरु असतात. ते विद्यार्थ्यांना ज्ञानाबरोबर जगातील सर्व महत्त्वाच्या गोष्टींबद्दल ज्ञान देत असतात.विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचं कार्य देखील शिक्षक करत असतात. पुस्तकी ज्ञानाबरोबर विद्यार्थ्यांना जगातील प्रत्येक घडामोडीचा ज्ञान अवगत होण्याकरिता शिक्षक कायम प्रयत्नशील असतात आणि यातूनच विद्यार्थी कक्षामध्ये विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास होत असतो असे प्रतिपादन  सर्जेराव मते यांनी श्री शारदा इंग्लिश मीडियम स्कूल येथे व्यक्तिमत्व विकास व्याख्यानादरम्यान बोलताना केले.

श्री शारदा इंग्लिश मिडियम स्कूल नेहमी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नवनवीन उपक्रम राबवता असते. आज इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी व्यक्तिमत्व विकास या विषयावर प्रसिद्ध व्याख्याते सर्जेराव मते यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.मते यांनी आपल्या मधुर वाणीने विद्यार्थ्यांना अभ्यास कसा करावा याविषयी मार्गदर्शन करताना संत तुकारामाच्या अभंगवाणीतून मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण म्हणजे विद्यार्थ्यांनी मन प्रसन्न करून अभ्यास केला पाहिजे तरच आपल्याला चांगले यश मिळेल हे सांगितले त्यासाठी सर्वांनी पहाटे सकाळी लवकर उठून आळस झटकून अभ्यास करावा हे सांगितले तसेच परीक्षेत प्रश्नपत्रिका सोडवताना सुरुवातीला सोपा प्रश्न सोडवावा व नंतर बाकीचे प्रश्न सोडवावेत याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.यावेळी व्याख्याते मते यांचे शाळेच्या वतीने प्राचार्य के एल वाकचौरे यांनी स्वागत केले. 

संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता दहावीतील विद्यार्थिनी अक्षदा ढवळे हिने केले. 

मते यांनी अगदी गमतीदार पद्धतीने व्यक्तिमत्व विकास या विषयावर आपले मुद्दे मांडून विद्यार्थ्यांची उत्सुकता शेवटपर्यंत उत्साही ठेवली.

कोपरगाव (गौरव डेंगळे) : नुकत्याच पॅरिस येथे ऑलिंपिक स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये भारतीय खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत १ रोप्य ५ कास्य पदक पटकावली. यामध्ये नीरज चोप्राने भालाफेक मध्ये रोप्य , तर मनु भाकर, सरबजीत सिंग, स्वप्नील कुसळे,अमन शेरावत तर भारतीय हॉकी संघाने कांस्यपदक पटकावले.हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग सह वरील पाच खेळाडूंचे खडू चित्र श्री शारदा इंग्लिश मिडीयम स्कूलचे चित्रकार श्री मंगेश गायकवाड पाटील यांनी रेखाटले.७८ व्या स्वातंत्र्यदिनी पदक विजेत्या खेळाडूंचे रेखाटलेले चित्र कोपरगाव मध्ये प्रमुख आकर्षण ठरले. प्रत्येक जण या पदक विजेत्या खेळाडूंचे रेखाटलेल्या चित्राबरोबर सेल्फी व फोटो घेऊ लागला.माध्यमांशी बोलताना गायकवाड म्हणाले की पदक विजेते सर्व खेळाडू ग्रामीण भागातले असून युवा विद्यार्थ्यांनी या खेळाकडून प्रेरणा घेऊन मैदानावर मेहनत करून आपल्या राज्याचे व देशाचे नाव उज्वल करावे, जेणेकरून आगामी काळामध्ये आपल्यापैकीही कोणी विद्यार्थी राज्याकडून व देशाकडून खेळताना पदक जिंकेल व मला त्यांचा फोटो काढण्याची संधी मिळेल. पदक विजेते खेळाडू म्हणजे भारताचा गौरव आहे व या खेळाडूंचा छोटासा गौरव मी माझ्या चित्राच्या माध्यमातून करत आहे असे ते पुढे म्हणाले. सुंदर असे रेखाटलेले चित्रांचे कौतुक शाळेचे प्राचार्य के एल वाकचौरे, उप प्राचार्या शुभांगी अमृतकर,सर्व सुपरवायझर प्रज्ञा पहाडे, पल्लवी ससाणे,नैथिलीन फर्नांडिस व सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केले व त्यांना शुभेच्छा दिल्या.

कोपरगाव (गौरव डेंगळे) : आजच्या युगामध्ये सर्वजण आपल्या स्वतःचा स्वार्थ व हितासाठीच लढत आहे.देवाने मनुष्य जीवाला सर्व गोष्टी दिलेल्या असताना देखील मनुष्य दुसऱ्याच्या मदतीला धावताना देखील विचार करायला लागला आहे.पण शारदा शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शाळेचे प्राचार्य के एल वाकचौरे यांनी एक उपक्रम हाती घेतला.या उपक्रमामध्ये लायन्स क्लब संचलित मूकबधिर विद्यालयाला शाळेच्या इयत्ता नववी वर्गाच्या विद्यार्थ्यांनी भेट दिली व या विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

मूकबधिर विद्यालयांमध्ये या विद्यार्थ्यांचं दिनचर्या शारदा शाळेतील विद्यार्थ्यांनी अनुभवली. यामध्ये त्यांच्या मूक बधिर संकेत खुणा,चिन्हाची भाषा हे कसे मूक बधिर विद्यार्थ्यांना शिकवले जाते याचा देखील शाळेतील विद्यार्थ्यांनी अभ्यास केला. हेच नव्हे तर या भेटीतून शाळेतील विद्यार्थ्यांना या मूकबधिर विद्यार्थ्यांप्रती आपुलकी वाटली व त्यांना काहीतरी आपण भेट दिली पाहिजे असे सर्वांच्या मनात आले. मनातच नाही तर या विद्यार्थ्यांनी तसेच शाळेच्या शिक्षकांनी या मूकबधिर शाळेतील विद्यार्थ्यांना स्पोर्ट ड्रेस व क्रीडा साहित्य भेट दिले.१५ ऑगस्ट पूर्वी दिलेल्या हे साहित्य बघितल्यानंतर या मूकबधिर शाळेतील विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला.यावेळी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राचार्य वाकचौरे म्हणाले की समाजातील प्रत्येकाने मूकबधिर विद्यार्थ्यांकडून प्रेरणा घ्यावी.या मूकबधिर विद्यार्थ्यांसाठी मदतीचा हात पुढे असला पाहिजे.सर्वांनीच एक दुसऱ्यांना मदत केलीच पाहिजे. आम्ही केलेली ही सुरुवात असून आम्ही प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या इयत्तेचे वर्ग क्षेत्रभेटीसाठी आपल्याकडे घेऊन येणार असे ते पुढे म्हणाले.यावेळी मूकबधिर शाळेचे मुख्याध्यापक गोलवड, गायकवाड,टिक्कल,डुकरे,पाचोरे,पर्यवेक्षिका प्रज्ञा पहाडे,क्रीडाध्यक्ष धनंजय देवकर, क्षेत्रभेट प्रमुख विशाल आल्हाट

आदी उपस्थित होते.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget