3A साईड राष्ट्रीय व्हॉलिबॉल स्पर्धेमध्ये तेलंगणा संघाला दुहेरी विजेतेपद!

कोपरगांव (गौरव डेंगळे): 3A साईड व्हॉलिबॉल फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने आत्मा मालक क्रीडा संकुल येथे पहिली राष्ट्रीय 3A साईड राष्ट्रीय व्हॉलिबॉल स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेमध्ये पुरुष विभागात व महिला विभागात तेलंगा संघाने विजेतेपद पटकावून दुहेरी मुकुट संपादन केला.

राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी भारतातून महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक,गुजरात, पंजाब, राजस्थान, छत्तीसगढ, पाँडिचेरी,उत्तर प्रदेश,देहू दमन या राज्यातून १५० खेळाडूंसह २५ स्पर्धा अधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवला होता.

राष्ट्रीय स्पर्धा दोन गटांमध्ये खेळण्यात आली होती.१४ वर्षाखालील मुला-मुलींचा गट तर पुरुष व महिला खुला गट.

तीन दिवस रंगलेल्या या व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये १४ वर्षाच्या मुला मुलींच्या गटांमध्ये दमन संघाने विजेतेपद पटकावले. पुरुष व महिला गटामध्ये तेलंगणा संघाने दुहेरी विजेतेपद पटकावले. राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन कोपरगावचे तहसीलदार श्री महेश सावंत, आत्मा मालिक ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी, पत्रकार श्री स्वामीराज कुलथे,3A साईड व्हॉलिबॉल फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष व्ही एस ए राजू, सचिव श्री मारुती हजारे,नितीन बलराज,शैलेंद्र त्रिपाठी आधीच्या उपस्थितीत संपन्न झाले. स्पर्धेचे पंच प्रमुख म्हणून एस निसंग व योगेश तावडे यांनी काम बघितले.सामना अधिकारी म्हणून श्री लक्ष्मण,बी भरत,जी किरण व एम चंद्र यांनी काम पाहिले. स्पर्धेसाठी तांत्रिक अधिकारी म्हणून रुचन्द्र कुमार  व पंकज वेंगला यांनी जबाबदारी संभाळली. दुसरी राष्ट्रीय 3A साईड व्हॉलीबॉल स्पर्धा ही डिसेंबर महिन्यात तेलंगणा राज्यात रंगणार असल्याची माहिती संघटनेचे सचिव श्री मारुती हजारे यांनी दिली.


*3A राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे:*


*१४ वर्षाखालील मुले:*

प्रथम क्रमांक: दमन 

द्वितीय क्रमांक: कर्नाटक

तृतीय क्रमांक: महाराष्ट्र 


*१४ वर्षाखालील मुली:*

प्रथम क्रमांक: दमन 

द्वितीय क्रमांक: आंध्र प्रदेश

तृतीय क्रमांक: महाराष्ट्र 


*पुरुष:*

प्रथम क्रमांक: तेलंगणा

द्वितीय क्रमांक: पांडिचेरी

तृतीय क्रमांक: पंजाब


*महिला:*

प्रथम क्रमांक: तेलंगणा

द्वितीय क्रमांक: देहू दमन

तृतीय क्रमांक: छत्तीसगड

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget