अहील्यानगर जिल्हा ग्रंथालय संघाच्या संचालक पदी बाबासाहेब शेलार यांची निवड
बेलापूर 1(प्रतिनीधी) --अहिल्यानगर जिल्हा ग्रंथालय विश्वस्त संस्था म्हणजे अहिल्यानगर जिल्हा वाचनालय संस्था या संस्थेवर संचालक तथा विश्वस्त म्हणून बेलापूर येथील प्राध्यापक बाबासाहेब शेलार यांची निवड करण्यात आली आहे . अहिल्यानगर जिल्हातील 514 शासनमान्य ग्रंथालय व शेकडो इतर ग्रंथालय यामधुन श्रीरामपूर तालुक्यातील प्रतिनिधी म्हणून प्राध्यापक बाबासाहेब शेलार यांची निवड करण्यात आली आहे. वाचन चळवळ गतिमान व्हावी ग्रंथालय सुसज्ज होऊन वाचनाची आवड निर्माण व्हावी तरुण पिढीला वाचनातून सत्य समजावे व्हाट्सअप फेसबुक ट्वीटर इन्स्टाग्राम यातुन त्यांनी बाहेर यावे यासाठी जिल्हा ग्रंथालय संघ काम करत आहे जिल्हा ग्रंथालय संघाने आजवर अनेक सांस्कृतिक शैक्षणिक उपक्रम राबविलेले आहेत वाचन चळवळ वाढावी यासाठी जिल्ह्यातील हा एकमेव अधिकृत ग्रंथालय संघ आहे आणि या संघावर संचालक म्हणून शेलार यांची बिनविरोध निवड झाली आहे त्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे प्राध्यापक शेलार यांना नुकताच महाराष्ट्र शासनाने त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार देवुन त्यांच्या कामाचा गौरव केला आहे बेलापूर खुर्द मध्ये जागृती प्रतिष्ठान व सार्वजनिक वाचनालयाच्या माध्यमातून ते सामाजिक व वाचन चळवळ चालवतात.त्याच्या या निवडीबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे
Post a Comment