ऑलम्पिकमध्ये भारतीय पदक विजेत्या खेळाडूंचे खडूच्या साह्याने चित्र साकारून चित्रकार गायकवाड यांनी केला त्यांचा गुणगौरव.
कोपरगाव (गौरव डेंगळे) : नुकत्याच पॅरिस येथे ऑलिंपिक स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये भारतीय खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत १ रोप्य ५ कास्य पदक पटकावली. यामध्ये नीरज चोप्राने भालाफेक मध्ये रोप्य , तर मनु भाकर, सरबजीत सिंग, स्वप्नील कुसळे,अमन शेरावत तर भारतीय हॉकी संघाने कांस्यपदक पटकावले.हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग सह वरील पाच खेळाडूंचे खडू चित्र श्री शारदा इंग्लिश मिडीयम स्कूलचे चित्रकार श्री मंगेश गायकवाड पाटील यांनी रेखाटले.७८ व्या स्वातंत्र्यदिनी पदक विजेत्या खेळाडूंचे रेखाटलेले चित्र कोपरगाव मध्ये प्रमुख आकर्षण ठरले. प्रत्येक जण या पदक विजेत्या खेळाडूंचे रेखाटलेल्या चित्राबरोबर सेल्फी व फोटो घेऊ लागला.माध्यमांशी बोलताना गायकवाड म्हणाले की पदक विजेते सर्व खेळाडू ग्रामीण भागातले असून युवा विद्यार्थ्यांनी या खेळाकडून प्रेरणा घेऊन मैदानावर मेहनत करून आपल्या राज्याचे व देशाचे नाव उज्वल करावे, जेणेकरून आगामी काळामध्ये आपल्यापैकीही कोणी विद्यार्थी राज्याकडून व देशाकडून खेळताना पदक जिंकेल व मला त्यांचा फोटो काढण्याची संधी मिळेल. पदक विजेते खेळाडू म्हणजे भारताचा गौरव आहे व या खेळाडूंचा छोटासा गौरव मी माझ्या चित्राच्या माध्यमातून करत आहे असे ते पुढे म्हणाले. सुंदर असे रेखाटलेले चित्रांचे कौतुक शाळेचे प्राचार्य के एल वाकचौरे, उप प्राचार्या शुभांगी अमृतकर,सर्व सुपरवायझर प्रज्ञा पहाडे, पल्लवी ससाणे,नैथिलीन फर्नांडिस व सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केले व त्यांना शुभेच्छा दिल्या.
Post a Comment