मूकबधिर विद्यालयांमध्ये या विद्यार्थ्यांचं दिनचर्या शारदा शाळेतील विद्यार्थ्यांनी अनुभवली. यामध्ये त्यांच्या मूक बधिर संकेत खुणा,चिन्हाची भाषा हे कसे मूक बधिर विद्यार्थ्यांना शिकवले जाते याचा देखील शाळेतील विद्यार्थ्यांनी अभ्यास केला. हेच नव्हे तर या भेटीतून शाळेतील विद्यार्थ्यांना या मूकबधिर विद्यार्थ्यांप्रती आपुलकी वाटली व त्यांना काहीतरी आपण भेट दिली पाहिजे असे सर्वांच्या मनात आले. मनातच नाही तर या विद्यार्थ्यांनी तसेच शाळेच्या शिक्षकांनी या मूकबधिर शाळेतील विद्यार्थ्यांना स्पोर्ट ड्रेस व क्रीडा साहित्य भेट दिले.१५ ऑगस्ट पूर्वी दिलेल्या हे साहित्य बघितल्यानंतर या मूकबधिर शाळेतील विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला.यावेळी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राचार्य वाकचौरे म्हणाले की समाजातील प्रत्येकाने मूकबधिर विद्यार्थ्यांकडून प्रेरणा घ्यावी.या मूकबधिर विद्यार्थ्यांसाठी मदतीचा हात पुढे असला पाहिजे.सर्वांनीच एक दुसऱ्यांना मदत केलीच पाहिजे. आम्ही केलेली ही सुरुवात असून आम्ही प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या इयत्तेचे वर्ग क्षेत्रभेटीसाठी आपल्याकडे घेऊन येणार असे ते पुढे म्हणाले.यावेळी मूकबधिर शाळेचे मुख्याध्यापक गोलवड, गायकवाड,टिक्कल,डुकरे,पाचोरे,पर्यवेक्षिका प्रज्ञा पहाडे,क्रीडाध्यक्ष धनंजय देवकर, क्षेत्रभेट प्रमुख विशाल आल्हाट
आदी उपस्थित होते.
Post a Comment