Latest Post

कोपरगांव (प्रतिनिधी):सोमैया विद्या विहार संचलित,श्री शारदा इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये सलग चौथ्या वर्षी राज्यस्तरीय मराठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे.शालेय विद्यार्थ्यांमध्ये उत्कृष्ट वक्तृत्वाचे गुण वाढीस लागावे म्हणून प्रखर देशभक्त लोकमान्य टिळक यांच्या जयंतीचे औचित्य साधून दरवर्षी दिनांक २२ व २३ जुलै रोजी राज्यस्तरीय भव्य मराठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले जाते.

या ही वर्षी या स्पर्धेचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात येणार आहे.विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा यासाठी या स्पर्धेमध्ये विविध आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आलेली आहेत.प्रथम पारितोषिक रोख रक्कम ५०००/स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र,द्वितीय पारितोषिक रोख रक्कम ३००० /स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र,तृतीय पारितोषिक रोख रक्कम २००० /स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र,तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पुढील सात संघास प्रत्येकी १०००/रुपयाचे पारितोषिक,स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येईल.तसेच प्रत्येक विद्यार्थ्याला सहभागाचे प्रमाणपत्र दिले जाईल 

ही स्पर्धा फक्त शालेय विद्यार्थ्यांसाठी असून इयत्ता ८ ते १०चे विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात.तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी सदर स्पर्धेचे विषय व अधिक माहितीसाठी श्री तुरकणे, सौ होन,श्री नन्नवरे आदींशी लवकरात लवकर संपर्क साधावा.

टीप -सदर स्पर्धेसाठी शाळेमार्फत केलेली नाव नोंदणीच ग्राह्य धरली जाईल.

कोपरगांव (गौरव डेंगळे): दरवर्षी २१ जून रोजी संपूर्ण जग एकत्र येऊन आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करतात.ही जागतिक घटना योगाच्या प्राचीन भारतीय पद्धतीला आणि त्याचा शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक कल्याणावर खोल परिणाम करतात.योग हा शब्द संस्कृत शब्द "युज" वरून आला आहे, ज्याचा अर्थ "सामील होणे" किंवा "एकत्रित होणे" आहे आणि मन, शरीर आणि आत्मा यांच्यात सुसंवाद आणण्याच्या तत्त्वज्ञानाचे प्रतीक आहे.त्याचेच औचित्य साधत विद्याविहार संचलित श्री शारदा इंग्लिश मीडियम स्कूल कोपरगाव येथे आर्ट ऑफ लिव्हिंगच्या योग शिक्षिका सौ सुजाता शेडगे,रुपाली जोंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली १८०० विध्यार्थी व शाळेच्या शिक्षकांनी आंतरराष्ट्रीय योग दिनी एकत्रित योग साधना केली.योग ही आपल्या देशाची प्राचीन परंपरा आहे.हीच प्राचीन परंपरा नविन पिढीला निरोगी ठेवण्यास उपयुक्त ठरेल. म्हणून जगभरात २१ जुन  आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात येतो.स्वत:साठी आणि समाजासाठी योग या थीमसह आंतरराष्ट्रीय योग दिन

 जगभरात साजरा करण्यात आला आहे.यावेळी शाळेचे प्राचार्य के एल वाकचौरे,उप प्राचार्या सौ शुभांगी अमृतकर, हायस्कूल पर्यवेक्षिका सौ प्रज्ञा पहाडे,प्राथमिक पर्यवेक्षिका सौ पल्लवी ससाणे,प्री प्रायमरी पर्यवेक्षिका सौ नाथलीन फर्नांडिस व शाळेतील शिक्षक वृंदानी आंतरराष्ट्रीय योग दिनाचा आनंद घेतला.

बेलापुर (प्रतिनिधी )- महेश नवमी या निमित्ताने बेलापुर माहेश्वरी समाजाच्या वतीने विवीध कार्यक्र‌माचे आयोजन करण्यात आले होते. सर्व प्रथम झेंडा चौक येथे भगवान महेश च्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले, त्यानंतर ग्रामपंचायत बेलापुर येथेही पुजन करण्यात आले त्यावेळेस सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत पद्माधिकारी, वा गावातील सर्व पक्षीय नेते, सर्म समाज बाधंव मोठ्या संख्येने उपस्थीत होते. त्यानंतर गोशाळा रोड येथे वृक्षारोपन करण्यात आले. दुपारी 5 वाजता भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते.शोभायात्रेच्या मार्गावर लिंबू सरबत, थंड पाणी यांचे ग्रामस्थ व समाज बांधवांकडून वाटप करण्यात आले.  शोभायात्रेमध्ये युवा, युवती, महीला व समाज बाधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते, ठिकठिकाणी शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले त्यानंतर महेश्वरी बालाजी मंदीरात भजनाच कार्यक्रम झाला तसेच समाजातील गुणवंतांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर आरती करून समाज बाधवाकरिता महाप्रसादाच्या कार्यक्रम सप्पन्न झाला, तसेच राजस्थानी युवा संघटनेच्या वतीने व जनकल्याण रक्तपेढी आहिल्यानगर यांच्या सहकार्याने आयोजित रक्तदान व हिमोग्लोबिन तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले •या वेळी•६९ बाटली रक्ताचे रक्तदान करण्यात आले. त्यानंतर प्रसाद सेतु कार्यालय याच्या सह‌कार्याने समाज बांधवाच्या विवीध सरकारी कागद पत्राची पुर्तता करून तयार दाखल्याचे  वाटप करण्यात आले: तसेच क्रिकेट सामन्याचेही आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये  महीला  युवक, युवतीनी व समाज बांधवांनी सहभागी होऊन कार्यक्रमाचा आनंद घेतला  सर्व कार्यक्र‌म यशस्वीतेसाठी सर्व समाज बाधंव महीला मंडळ, युवा संघटन आदिंनी विशेष परिश्रम  घेतले.

श्रीरामपुर  (प्रतिनिधी )-श्री महेश नवमी निमित्ताने माहेश्वरी समाजाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते . यामध्ये माहेश्वरी समाजाच्या सर्व व्यक्तींनी पारंपारीक वेशभूषेमध्ये सहभाग घेतला होता . यावेळी जय महेश च्या घोषणांनी वातावरण प्रफुल्लीत झाले. 

श्रीरामपूर शहरात माहेश्वरी समाजाच्या वतीने महीला क्रिकेट लिग चे आयोजन करण्यात आले ज्यामध्ये महिलांनी उस्फुर्तपणे सहभाग घेतला. दर वर्षी प्रमाणे यावर्षीही रक्तदान शिबिराचे आयोजन केले गेले. यामध्ये ४० युनीट रक्त जमा झाले. याबरोबरच सेतू कार्यालयातर्फे शिबिर आयोजित केले गेले. यामध्ये १०० हून अधिक व्यक्तींनी आपले आधार कार्ड,  आयुष्मान कार्ड, रेशन कार्ड ऑनलाईन केले, अद्ययावत केले. महेश नवमी दिवशी शैक्षणिक व  सामाजिक कार्यामध्ये विशेष कामगिरी केलेल्या व्यक्तींचा सन्मान करुन गौरविण्यात आले. नगरसेवक श्री. श्रीनिवासजी बिहाणी व सौ. राखीजी बिहाणी यांच्या सौजन्याने १०० रोपांचे वितरण करण्यात आले. संगठन आपल्या दारी या विषयावर समाजातील बहुतेक व्यक्तींनी आपले मत मांडले व त्यावर चर्चा केली गेली.

श्रीरामपूर शहरातील प्रख्यात डॉ. श्री. आदित्य द्वारकादास दमाणी प्लास्टीक सर्जन यांना समाजगौरव पुरस्कार देवून गौरविण्यात आले. डॉ. दमाणी यांनी तीन वर्षाच्या गरीब मुलीचे मनगटापासून पूर्णपणे कापला गेलेला हात पूर्णपणे व्यवस्थित करून तिला अपंग होण्यापासून वाचवले. 

महिला क्रिकेटच्या विजेत्यांचा यावेळी मेडल्स व ट्रॉफी देवून सन्मान करण्यात आला. सर्व बक्षीस हे महेश नागरी पतसंस्था, श्रीरामपूर यांच्या सौजन्याने दिले गेले.

 बक्षिस वितरणानंतर महेश भगवान ची आरती तसेच महाप्रसादाचा सर्व उपस्थितांनी लाभ घेतला . सर्व कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी श्रीरामपूर माहेश्वरी सभेचे अध्यक्ष संदीप बुब, मंत्री योगेश करवा, जीवन सोमाणी, युवा अध्यक्ष सागर मुंदडा, युवामंत्री कुंदन मुंदडा, रितेश सोनी, कैलास सोमाणी, सौ. पूजा मुंदडा यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी महिला मंडळ अध्यक्षा सौ. शितल भुतडा , माहेश्वरी हरियाली मंच अध्यक्षा सौ. गितांजली  बंग, प्रगती मंडळ अध्यक्ष सोमनाथ मुंदडा, नगरसेवक श्रीनिवासजी बिहाणी, प्रदेश प्रतिनिधी महेश बंग, जिल्हाकोश उपाध्यक्ष चेतन भुतडा, जिल्हा प्रतिनिधी पुरुषोत्तम झंवर,  राजेश राठी, विशाल पोफळे, राकेश न्याती, उषा मुंदडा, डॉ सपना करवा, डॉ .अतूल करवा, डॉ. सतीश भट्टड, अनिल न्याती, शांतीलाल बुब, रविंद्र सोनी, सूरज सोमाणी, गोपाल चांडक, विनित जाजू, अमोल बूब, मुकेश न्याती, मनोज राठी, पुरुषोतम बूब, डॉ. के.डी. मुंदडा, महेश नागरी पतसंस्थेचे कर्मचारी वृंद व  इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.

!२० डिसेंबर २०२२ रोजी भारतीय यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंतचा कार अपघात झाला होता. ज्यामध्ये तो गंभीर जखमी झाला.यामुळे पंत एक वर्षाहून अधिक काळ क्रिकेटपासून दूर राहिला आणि एकदिवसीय विश्वचषक खेळू शकला नाही. आता पंतने सांगितले की तीन चमत्कारांमुळे तो पुन्हा खेळण्याच्या स्थितीत आहे.

२०२२ मध्ये एका भीषण कार अपघातात जखमी झालेल्या ऋषभ पंतने सांगितले की,त्या अपघातानंतर 'तीन चमत्कारांनी' त्याचे आयुष्य आणि करिअर वाचवले.आप की अदालत या कार्यक्रमात ऋषभने हे सांगितले.

पंत म्हणाला,मला बरे होण्यासाठी दोन ते तीन वर्षे लागतील,असे डॉक्टरांनी सांगितले होते. माझ्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर दिनशा पार्डीवाला यांनी खूप छान काम केले.ते माझ्याकडे आला आणि म्हणाले,ऋषभ बघ,तुला ३ चमत्कार हवे आहेत. तु आधीच २ चमत्कार केले आहेत.पहिले म्हणजे,तू अपघातातून वाचलात,दुसरे म्हणजे, तुमचा उजवा गुडघा जो ९० अंश उजवीकडे वळला होता, तो अपघातानंतर लगेचच कोणाच्या तरी मदतीने पुन्हा जागी ठेवण्यात आला.त्याने हे सर्व केले नसते तर तुम्ही अपंग होऊ शकले असते.तु आधीच दोन चमत्कार केले आहेत,आता ACL (Anterior Cruciate Ligament) आणि PCL (Posterior Cruciate Ligament) साठी शस्त्रक्रिया झाली नाही तर हा तिसरा चमत्कार असेल.


#पंत_भाग्यवान_होता!

ऋषभ पुढे म्हणाला,माझे लिगामेंट खराब झाले होते, काहीही राहिले नाही.मी डॉक्टरांना म्हणालो,साहेब काळजी करू नका.मी पण हे करेन.हा तिसरा चमत्कार होता कारण डॉक्टरांनी मला सांगितले की लाखो केसेसपैकी फक्त काही केसेस आहेत ज्यात ACL आणि PCL दोन्ही स्वतःहून बरे होतात. देव खूप दयाळू होता.एसीएल आणि पीसीएल दोन्ही स्वतःहून बरे झाले.पुन्हा क्रिकेट खेळण्याच्या प्रश्नावर पंत म्हणाला, एक-दोनदा मला असे वाटले की मी पुन्हा खेळू शकणार नाही,पण मी ते स्वीकारण्यास मानसिकदृष्ट्या तयार नव्हते.हळूहळू व्यायाम करण्यास सुरुवात केली.शरीर साथ देण्यास सुरुवात झाली एक नवीन आशा पल्लवीत झाली की आता आपण क्रिकेटमध्ये पुन्हा पुनरागमन करू शकतो.जिद्दीने वेदनावर मात करीत क्रिकेटच्या सरावाला सुरुवात केली.असंख्य वेदना होत असताना देखील जिद्द सोडली नाही.हळूहळू क्रिकेटचे सामने खेळण्यास सुरुवात केली.सराव सामन्यांमध्ये प्रदर्शन चांगलं होत गेले. दिल्ली कॅपिटल संघाकडून कर्णधारपद मिळाले.निश्चय केला होता की आयपीएलमध्ये अफलातून प्रदर्शन करायचे व टी ट्वेंटी वर्ल्ड कप मध्ये पाकिस्तान विरुद्ध खेळायचे.डीसी संघाचा कर्णधार म्हणून खेळताना पंतने आयपीएल २०२४ मध्ये शानदार कामगिरी केली आहे.त्याने १० सामन्यांमध्ये ४६.३८ च्या सरासरीने आणि १६०.६० च्या स्ट्राइक रेटने ३७१ धावा केल्या आहेत.ऑरेंज कॅप शर्यतीच्या यादीत डावखुरा फलंदाज सहाव्या क्रमांकावर होता.आयपीएल मधल्या चमकदार कामगिरीच्या जोरावर त्याने T-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघामध्ये स्थान पटकाविले. आयर्लंड विरुद्ध पहिल्या सामन्यात ३६ धावा तर पाकिस्तान विरुद्ध दुसऱ्या सामन्यांमध्ये ४२ धावांची विजयी खेळी केली.

बेलापूरःशानिजयंती निमित्त बेलापूर येथे याञोत्सव संपन्न होत आहे.यानिमित्त गावकरी मंडळ व ग्रामस्थांच्यावतीने 'ग्रामोत्सव २०२४' चे आयोजन करण्यात आले आहे.                                                            शनिजयंतीनिमित्त शनैश्वर देवतेला आज (गुरुवारी)दहावी व बारावीचे गुणवंत विद्यार्थी ओंकार रावताळे,शिवराज नवले,पवन बावचे,अजय चव्हाण यांचे हस्ते अभिषेक करण्याचा अभीनव उपक्रम पार पडला.                                                        शनिवार(ता.८)रोजी   दुपारी ४ वा. जि.प.मराठी शाळेच्या मैदानावर  कुस्त्यांचा हगामा होणार आहे. कुस्त्यांमध्ये सहभागी होणाऱ्या मल्लांना योग्य ती बिदागी आयोजकां कडून देण्यात येणार आहे.अनेक वर्षांनंतर कुस्यांचा हगामा होत असून यात नामांकित मल्ल सहभागी होणार असल्याने  ग्रामस्थांना उत्कंठा आहे.तर सोमवार (ता.१०)रोजी सायं.६ वा. वाबळे पाटील मैदान, अरुण कुमार वैद्य पथ येथे क्रांतीनाना  मळेगावकर(ठाणे)प्रस्तुत होम मिनिस्टर-खेळ पैठणीचा हा महिलांसाठी चा मनोरंजनात्मक  कार्यक्रम संपन्न होणार आहे.या कार्यक्रमात सहभागी होऊन विजेत्या होणाऱ्या महिलांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत.या कार्यक्रमा साठी राजस्थानी गृह उद्योग चे विशेष सहकार्य लाभले आहे.तरी ग्रामस्थ व पंचक्रोशितील भाविकांनी याप्रसंगी उपस्थित राहावे असे आवाहन गावकरी मंडळ  व ग्रामस्थांनी केले आहे.

बेलापुर  (प्रतिनिधी  )-नुकत्याच जाहीर झालेल्या इयत्ता दहावी परिक्षेच्या निकालात अन्वय क्लासेसच्या सर्वच विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले असुन अन्वय क्लासेसचा निकाल हा १०० % लागला असल्याचे क्लासच्या संचालिका सौ  भक्ती गवळी यांनी सांगितले  ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक स्वर्गीय नामदेवराव देसाई यांची कन्या सौ.भक्ति किशोर गवळी यांनी सुरु केलेल्या अन्वय क्लासेसचा निकाल या ही वर्षी शंभर टक्के लागला  नुकत्याच पार पडलेल्या दहावी च्या परिक्षेत ओझर येथील माधवराव बोरस्ते विद्यालयातील अन्वय क्लासेसची विद्यार्थीनी कु.मैथिली प्रदीप घोडेकर विद्यालयात प्रथम आली.तसेच  कु.साक्षी काळे ही हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या शाळेची विद्यार्थिनी केंद्रात प्रथम आली आहे. एअर फोर्स जिथे फक्त एअर फोर्स  कंपनीतील मुलांना ऍडमिशन मिळते असे सर्वात अवघड सीबीसी पॅटर्न मधले विद्यालय म्हणजे केंद्रीय विद्यालय एअर फोर्स चा विद्यार्थी ज्ञानदीप पाटील याने 93% मार्क मिळवुन विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला तसेच  एअरफोर्स विद्यालयातील विद्यार्थी अर्णव श्रीवास्तव याने 92 टक्के गुण मिळवुन द्वितीय क्रमांक पटकावला या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार अन्वय क्लासच्या वतीने  सौ.भक्ती किशोर गवळी यांनी केला  या वेळी क्लासेसच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांना सॅमसंग कंपनीचा टॅब आणि स्मार्ट वॉच देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला .

सौ भक्ती किशोर गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली अन्वय क्लासेसमध्ये  दर वर्षी तीनशे विद्यार्थी शिक्षण घेत असतात.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget